Submitted by पुरंदरे शशांक on 28 June, 2012 - 02:15
टॉम आणि जेरी निघाले चंद्रावर....
(पेशल पेशल थँक्स - रुणुझुणुच्या लेकाला..... ज्याच्यामुळे टॉम आणि जेरी यानात दिसले )
टॉम आणि जेरी एकदा बसले छान यानात
दोघे मिळून निघाले की चंद्रावर थाटात
एक दाबतो हिरवे बटण, दुसरा दाबतो लाल
यानाखाली दिसली त्यांना आग पिवळी लाल
घाबरुन बसले दोघे आपल्या खुर्चीत चिडीचूप्प
यान निघाले होते आता अग्दी अग्दी जोरात खूप
खिडकीतून बघताना आली मज्जा फार
आख्खी पृथ्वीच चालली होते मागेमागे पार
भूक लागता दोघांना खुडबुड खुडबुड किती
खाऊ शोधता एकच आला क्रिमरोल हाती
ओढाताण करताना दोघे पडले धाडकन
बटण कुठले दाबले गेले यान फिरले गरर्कन...
क्रीमरोल खाता खाता बघतात दोघे खिडकीतून
चंद्र तिकडे लांब नि यान आले पृथ्वीवर फिरुन
सुरु झाली मारामारी - "तुझ्यामुळे हे तुझ्यामुळे"
टॉम जेव्हा लागतो मागे, जेरी त्याच्या बिळात पळे....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
..
..
अजुन एक गोड कविता.
अजुन एक गोड कविता.
मस्त आहे.
मस्त आहे.
कसली गोड कविता आहे ही.
कसली गोड कविता आहे ही. रुणुच्या लेकाला एकदम शोभून दिसेल.
एकदम गोड. आत्ता शाळेत गेलाय,
एकदम गोड.
आत्ता शाळेत गेलाय, आल्यावर वाचून दाखवते. मज्जा वाटेल त्याला.
टॉम आणि जेरी एकदम आवडते आहेत.
एम.कर्णिक ह्यांनी लिहिलेल्या 'मिकीभाऊ मिकीभाऊ' कवितेतल्या "जेरी उंदीर पळतोय तसाच पळतोय टॉम बोका" ह्या ओळीसुद्धा बर्याचदा पुटपुटत असतो.
मस्तच.action packed एकदम.
मस्तच.action packed एकदम.
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.........
खूप गूड पोयम आहे गं ममा, आय
खूप गूड पोयम आहे गं ममा, आय लाईक ईट्.........हा प्रतिसाद माझ्या जय कडुन शशांक तुझ्यासाठी........
तुझे नाव सांगितल्यावर त्याला आठवले की लास्ट टाईम स्कूल कॉम्पिटीशन मध्ये त्याने तुझीच कविता म्हटलेली आणि मराठी ईतके छान पाठांतर म्हनुन प्राईज मिळालेले .......
सुंदर कविता आणि धन्यवाद माझ्याकडुनही......
खूप गूड पोयम आहे गं ममा, आय
खूप गूड पोयम आहे गं ममा, आय लाईक ईट्.........हा प्रतिसाद माझ्या जय कडुन शशांक तुझ्यासाठी........ >>> जयला माझ्याकडून एक हात उंचावत दिलेली टाळी.......