जा, मी तुझ्याशी बोलणार नाही

Submitted by पुरंदरे शशांक on 25 June, 2012 - 00:48

जा, मी तुझ्याशी बोलणार नाही
यंदा पावसात खेळणार नाही...

सारे म्हण्तात आला आला
छत्र्या रेनकोट काढा काढा
तुझा तर अजून पत्ताच नाही
जा, मी तुझ्याशी बोलणार नाही...

गाणे कित्ती म्हणून झाले
आकाशात कितीदा बघून झाले
तुला जर त्याचे काहीच नाही
मी ही तुझ्याशी बोलणार नाही....

येतोस जेव्हा धाव्वत धाव्वत
आम्हीही सगळे असतो नाचत
तुझा जर मूड गेलाय तर
मलाही मग इंटरेस्ट नाही
जा, मी तुझ्याशी बोलणार नाही....

"आज सूर्य कुठे उगवला ?
छत्री- रेनकोट दोन्ही कशाला ??"
"तुला तर आई कळतंच नाही
अजून बट्टी झाली नाही
मी काही पावसात खेळणार नाही......"

महिनाभर जर हा पडेल मस्त
तरच आपला खराखुरा दोस्त
नाही तर आपला रेनकोट घालणार
माझीही कट्टी तशीच असणार
मलाही खूप आलाय राग
जा, मी याच्याशी बोलणार नाही
यंदा पावसात खेळणार नाही... नाही... नाही.......

गुलमोहर: 

.

कविता छान आहे,

विशेष : हि कविता माझ्या मुलिने शाळेत सादर केलि , आम्हि कवितेला चाल लावलि , कविचे नाव : शशांक पुरंदरे
सागितले
अजुन स्पध्रेचा निकाल नाहि पण ब़क्षिसाचि अपेक्षा आहे.

सादर धन्यवाद !!!!

विकु

सुरेख कविता. मोठ्यांनाही आवडेलशी.

बालकविता म्हणून तर प्रश्नच नाही.
फक्त

सारे म्हण्तात आला आला
केरळ ओलांडून पुढे गेला

या ओळीत केरळ ओलांडून हे बालकवितेत येईल का याबद्दल साशंक आहे.

शाम, वर्षा, गीता, संघमित्रा, विकु२०००, शोभा - सर्वांचे मनापासून आभार...

किरण (इंग्रजी) यांचे विशेष आभार - अशाच त्रुटी, गडबड जरुर दाखवणे - आता सुधारणा केलीये ती कशी वाटत्ये जरुर सांगणे...