Submitted by सुधाकर.. on 19 June, 2012 - 09:37
माझ्यासंगे देव बोलला नाही,
नियतीने तराजू तोलला नाही.
धरावी कोणती वाट आता,
फकीर एकही बोलला नाही.
आत्मपिडा ही घेऊन चाललो.
तुला हुंदका पेलला नाही.
आयुषा दे,हवे तेवढे घाव आता,
मी अजुन आत्मा सोलला नाही.
फुंकून पुंगी गेले,कित्येक गारूडी,
मनाचा भुजंग या डोलला नाही.
सांभाळ नशिबा, तू स्वतःला,
जख्मांचा हिशेब मी ही सोडला नाही.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शिका ना राव लवकर...... गझला
शिका ना राव लवकर...... गझला करायला!!
इतके छानछान खयाल आणि काफिये वाया घालवता तुम्ही याची जाणीव तरी आहे का तुम्हाला?????
एखाद्या पट्टीच्या गझलकारानं सोनं केलं असतं ना!!
छे !!
..........पुन्हा पुन्हा मूड ऑफ करतायराव तुम्ही तेही बारीकसारी़क गोष्टींवरून ; आम्ही................. किती अपेक्षा ठेवून बसलोयत तुमच्याकडून!!
शिका ना राव लवकर..... गझला करायला
..........प्लीsssssssssssssssssज!!!!
________________________________--
असो
तुम्ही फार काही वाईट वाटून घेवू नका
अगदीच लहानसहान त्रुटी आहेत त्या
थोड्या प्रयत्नाअन्ती घालवता येतील ........प्रयत्न करून पहा
शुभेच्छा!!!!:)
_______________________________
गझला करायला शिका म्हणजे तंत्र , भाषा ,शुद्धलेखन इत्यादी बाबी म्हणतोय मी .......
तसा गझल हा विषयच शिकायचा म्हणताना आयुष्यभर शिकत रहावा लागेल असा आहे म्हणा !!
हो अजून एक : माझ्याबाबत असा गैरसमज वगैरे करू घेवू नका की मला गझलेतलं सर्वकाही कळतं वगैरे
गझला कशा करतात ही
मी आजही शिकतो कला
एखाद्या पट्टीच्या गझलकारानं
एखाद्या पट्टीच्या गझलकारानं सोनं केलं असतं ना!!
थांबा थोडा वेळ. ते येतील आनि करतिक दुरुस्त.
देर आये- 'दुरुस्त' आये येतील .
वैभवजी आत्तापर्यंत आपण सगळेच
वैभवजी आत्तापर्यंत आपण सगळेच खयाल आणि काफिये वाया घालवले त्याचं काय?
कृ गै न.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
घबाड............... हिला २
घबाड............... हिला २ दिवस ३ तास झालेयत मबोवर येवून
नक्कीच हा कुणाचातरी ड्यु आय आहे
माबोकरानो सावध असा रे बाबानो !!!
दोन दिवसात सगळ्या गजला आणि
दोन दिवसात सगळ्या गजला आणि परिसंवाद वाचले आहेत. म्हनुन मला ठाउक आहे.
वैभवजी आत्तापर्यंत आपण सगळेच
वैभवजी आत्तापर्यंत आपण सगळेच खयाल आणि काफिये वाया घालवले त्याचं काय?>>>>>>>>>>>>>>>
-तुला अजून क ख ग घ कळत नाही........... पुढचं काय बोलू मी तुझ्या या वाक्यावर?
बोललो तर तुला काही सुधरणार नाही
तसंही हल्ली मी जास्तीतजास्त मवाळ वागायचं ठरवलं आहे.......... घे फायदा घे !!!
घबाड : ओह्............. असय
घबाड :
ओह्............. असय होय ?
असो
आलाच आहात तर या!!
.....................समस्त मायबोलीकरातर्फे हार्दिक स्वागत
हे तर त्या 'शोले'मधल्या
हे तर त्या 'शोले'मधल्या 'असरानी'ची आठवण करून देतायत!
"हमारी इतनी बदलीयों के बाद भी हम नहीं बदलें.. हाहा!"
खुळचट जुन्या मतांप्रमाणे मी
खुळचट जुन्या मतांप्रमाणे मी कधीच बदलत नाही.
छान
छान