बडबडगीत - पाऊस

Submitted by कविन on 19 June, 2012 - 00:58

आला आला पाऊस आता
मस्त मज्जा करु
पागोळ्यांच्या खाली अपुली
ओंजळ अश्शी धरु

पाण्यामध्धे सोडायाला
केली बघ्घा होडी
होडीत बसुन पहा निघाली
राजा राणीची जोडी

थेंब झेलत खेळायाला
आवडते मज भारी
बेडकांच्याही मागे धावतो
आम्ही मुले सारी

भिजून गेले आई, बघ मी
ह्या पावसात जाता
होईल ना ग सर्दी आणि
तापही येईल आता

नक्को दूध, आलं घालून
देशील का ग चहा?
सर्दी खोकला ताप
कस्सा पळुन जाईल पहा

गुलमोहर: 

नक्को दूध, आलं घालून
चहा देशील का ग?
आल्याने बघ पळून जाईल
सर्दी खोकला ताप>>>>>>>>>>>>>>>>> इथे थोडी गडबड वाटतेय कवे

धन्स लोक्स Happy

लेकीचा हट्ट म्हणून लिहिली. तिलाच आधी वाचून दाखवायची होती, मग इथे टाकायची होती म्हणून नुसतीच टाईप करुन ठेवत होते. पण वेंधळेपणाने प्रकाशीत झाली. Proud

लेकीचा हट्ट म्हणून लिहिली. तिलाच आधी वाचून दाखवायची होती, मग इथे टाकायची होती म्हणून नुसतीच टाईप करुन ठेवत होते. पण वेंधळेपणाने प्रकाशीत झाली.>>>>>>>>

नशीबवान आहे लेक ; स्वतःची गाणी स्वतः लिहिणारी आई भेटलीय तिला तेही खास तिच्यासाठी लिहिणारी........
वाह मन भरून आलं अगदी !!

असो............
तुमचा वेंधळेपणा भेट्ला तर त्याला आमचा धन्यवाद सान्गा !!!.....न विसरता Happy

ए कविता,
खूप्प सुंदर झालंय हे बडबडगीत ...
आणि मुलांचा 'आयडीयाने' चहा मागून घेण्याचा हट्ट मस्त फ्रेम केलास Happy