Submitted by संदीप पांगारे on 12 June, 2012 - 02:01
सध्या आकाश निरभ्र आहे
पुणे शहरातून किल्ले सिंहगड आणि तोरणा यांचा नजारा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सध्या आकाश निरभ्र आहे
पुणे शहरातून किल्ले सिंहगड आणि तोरणा यांचा नजारा
रामबाग कॉलनीतून काढलाय का
रामबाग कॉलनीतून काढलाय का फोटो?
हे अशक्य वाटतय नाही अशक्यच
हे अशक्य वाटतय नाही अशक्यच आहे! डावीकडे सिंहगड दिस्णे अन समोर तोरणा दिस्णे हे केवळ अशक्यप्राय आहे, अनलेस, फोटो ट्रिक्स केल्या अस्तिल तरच शक्य! हा फोटो/दृष्य फसवे आहे.
पुण्याच्या कोणत्या भागातुन हे छायाचित्र घेतलय?
तोरण्यासारखा जो डोन्गर दिसतोय, त्याचे डावीकडची डोन्गररान्ग जी राजगडाकडे जाते ती का दिसत नाहीये?
अन आकाश फोटोत तरी मला "निरभ्र" दिसत नाहीये, भरपुर ढग आहेत की! तुम्हाला असे म्हणायचे आहे का की पहिला पाऊस पडून गेल्याने हवा धूळविरहित आहे?
असो. मी आपले मला वाटले ते सान्गितले, चू.भू.द्या.घ्या.
(काये ना, लिम्बीला तिच्या शेतावरुन म्हणे सिंहगड दिस्तो ती तसे म्हणाली की त्यावरुन माझे अन तिचे वाद होतात. कारण सिंहगड दिसायला एकतर राजगडच्या बालेकिल्यावर वा संजिवनी माची/पद्मावती माचीवर जावे लागते, सुवेळावरुनही दिसतो पण अन्धुक. गडाच्या पायथ्यापासुन सिंहगड दिसणे ही अशक्य गोष्ट आहे. , तर तसेच काहीसे तुम्हाला पुण्यातुन तोरणा नै ना दिसतेत? )
सध्या आकाश निरभ्र आहे बर मग?
सध्या आकाश निरभ्र आहे
बर मग?
धन्यवाद लिंबू सर . तुम्हाला
धन्यवाद लिंबू सर .
तुम्हाला हे तरी मान्य आहे, का तो तोरणा आहे ?
सरकला असेल थोडा इकडे तिकडे..
सरकला असेल थोडा इकडे तिकडे..
सिंहगड रस्ता
सिंहगड रस्ता
पुण्याच्या कोणत्या भागातुन हे
पुण्याच्या कोणत्या भागातुन हे छायाचित्र घेतलय?>>>>
बंड गार्डन रोड , पुणे
>>>> तुम्हाला हे तरी मान्य
>>>> तुम्हाला हे तरी मान्य आहे, का तो तोरणा आहे ? <<<
कटपेस्टच्या फोटोट्रीक्स केलेल्या असल्याने यातिल काहीच मान्य करायची गरज नाहीये असे माझेमत.
वसईचा किल्ला पण दिसतो ना ?
वसईचा किल्ला पण दिसतो ना ?
डावीकडचा माहीत नाही, पण
डावीकडचा माहीत नाही, पण उजवीकडे दिसणारा गोवळकोंड्याचा किल्ला आहे....
पुणे शहरातुन तोरणा दिसतच
पुणे शहरातुन तोरणा दिसतच नाय.
पाबे घाटातल्या खींडीत गेल्यावरच त्याच प्रथम दर्शन होत.
किंवा मग आकाश क्लीअर असेल तर सिंहगडावरुन किंवा निलकंठेश्वराच्या डोंगरावरुन.
शहरातुन नाय होणार....
टाचा वर केल्यावर पण नाही ?
टाचा वर केल्यावर पण नाही ?
सध्यातरी मला बांधकामाचाच
सध्यातरी मला बांधकामाचाच नजारा दिसतोय!
वरिल सर्व पो ष्टी संदिप भाउं
वरिल सर्व पो ष्टी संदिप भाउं ना उगाच फिरकी घ्यायला केल्यात आस मानून चालतो. तो सिंहगड अन त्या समोर तोरणाच आहे, इथे 'च' लिहिणार आहे कारण ह्यांच्या सनिध्यात मी लहाणाचा मोठा झालोय प्र. ची. छान......
>>> तो सिंहगड अन त्या समोर
>>> तो सिंहगड अन त्या समोर तोरणाच आहे, इथे 'च' लिहिणार आहे
अहो दादाश्री, पण तो पुण्यातुन दिस्तोय असे दाखवलय ते चूक आहे. खोटेपणा आहे. शिवाय तोरणा राजगडाच्या समोर आहे हे प्रत्यक्ष बघुन/अनुभवुन माहिते, सिन्हगडाच्या हा असा समोर तोरणा आहे, अन तो पुण्यातुन तेही बन्डगार्डनवरुन दिस्तो म्हण्जे इकडची दुनिया तिक्डे झाली असच झाल की, कधी झाल हे अस?
>>>> कारण ह्यांच्या सनिध्यात मी लहाणाचा मोठा झालोय <<<
अहो मी पण सिन्हगडाच्या सानिध्यात लहानाचा मोठा झालोय अन मोठा झाल्यावर राजगड/तोरण्याच्या सानिध्यात आता म्हातारा होतोय
येवढ्या मोठ्या कालखन्डात मला नै बोवा फोटुत दाखविल्याप्रमाणे पुण्यातिल बिल्डिन्गाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या आकाराचा सिन्हगड अन तोरणा दिसला! असो.
तुम्ही च लावाच्च!
>>> टाचा वर केल्यावर पण नाही
>>> टाचा वर केल्यावर पण नाही ? <<<
बहुधा टाचा वर करुन च्च लावल्यावर दिसत असेल, नै?
बर्र, फोटुत अजुन काय काय
बर्र, फोटुत अजुन काय काय दिस्तय बघा बर सगळ्यान्नी!
मला मागिल पडदा छान दिस्तोय.
गब्बरसिन्ग पण दिस्तोय.
अन एक वटवाघूळ देखिल दिस्तय
येवढ्या मोठ्या कालखन्डात मला
येवढ्या मोठ्या कालखन्डात मला नै बोवा फोटुत दाखविल्याप्रमाणे पुण्यातिल बिल्डिन्गाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या आकाराचा सिन्हगड अन तोरणा दिसला! असो.
तुम्ही च लावाच्च!>>>>>>
राजाराम पुलावरुन दोन्ही समोर दिसतात गुगलुन पहा भाउ समोर दिसने ये तो नजरोंका खेल हे
पुण्यातून सिंहगड आणि तोरणा
पुण्यातून सिंहगड आणि तोरणा दिसतात हे नक्की. पण ते असे दिसतात की नाही, ते माहित नाही.
सिंहगड रस्त्यावरून आकाश स्वच्छ असेल तर दोन्ही दिसतात. राजगड दिसत नाही.
पाबे खिंड ओल्यांडल्याशिवाय तोरणा दिसत नाही, असं वाटत नाही.
बरोबर, राजाराम व संभाजी?
बरोबर, राजाराम व संभाजी? पुलावरुन सिंहगड आणि त्यामागे तोरणा दिसतो.
सिंहगड आणि तोरणा ........
सिंहगड आणि तोरणा ........ दोन्ही जवळुन पाहावे आणि खात्री करावी
तोरणा चक्क बुधलेपर्यंत
तोरणा चक्क बुधलेपर्यंत दिसतोय. सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड केले तेव्हा पण सिंहगडावरून तोरणा दिसत नव्हता. त्यामध्ये एक कळशीच्या आकाराच्या डोंगराची रांग आहे, ( आता त्या रांगेच नाव विसरलो).
>>> तोरणा चक्क बुधलेपर्यंत
>>> तोरणा चक्क बुधलेपर्यंत दिसतोय. <<< सारन्ग, अगदी बरोबर पोस्ट. फोटोत दाखविलेली बुधला माची दिसण्याकरता राजगड व तोरणा यान्चे दरम्यान कुठेतरी उभारावे लागेल, त्यावेळेस सिन्हगड उजव्या हाताला खूप दूर असेल, अन इथे तर तोरण्याचे ते दृष्य अन डावीकडे सिन्हगड, तो देखिल भल्लाथोरला! हे अशक्य आहे, कटपेस्टचा चावटपणा आहे कुणाचा तरी, बाकी काही नाही. झकोबा म्हणतो ते देखिल बरोबर आहे. पाबेघाटाची भली मोठी आडवी उन्च डोन्गर रान्ग आहे, तिचा मागमुस नाही वरती. उगा पब्लिकला वेडे बनवायचे धन्दे.
संदीप, तुला हा फोटो कुणी दिला? की तूच काढला आहेस? तूच काढला असशील, तर चल, आपण पुन्हा जाऊ बरोबरच तिथे, अन बघु. अन दुसर्या कुणी काढलेला इथे चिकटवला असशील, तर तसे सान्ग, म्हणजे मग मला असल्या फसवेगिरीबद्दल मनमोकळेपणे शिव्या तरी घालता येतील.
वाद कशाला? एक बंड गार्डन रोड
वाद कशाला? एक बंड गार्डन रोड , पुणे गटग करूनच टाका.
टाचा वर केल्यावर पण नाही ? >>>
पुण्यातून सिंहगड आणि तोरणा
पुण्यातून सिंहगड आणि तोरणा दिसतात हे नक्की. पण ते असे दिसतात की नाही, ते माहित नाही. >> आनंद हे बघ... विकिमॅपिया वरुन असे दिसतात. पावसाळ्या पुर्वी आणि नंतर हवेतील बाष्पीभवना मुळे वातावरण स्वच्छ असते त्यामुळे पुण्या वरुन तोरणा - सिंहगड दिसणे शक्य वाटते.
गुगल मॅप नुसार पुणे ते तोरणा अंतर ४६ कि.मी. आहे.
सहज जुने धागे बघत होतो तर हा
सहज जुने धागे बघत होतो तर हा धागा मिळाला ..
समे फोटो माझ्याकडे आहे आणि मी तो रुबी हॉस्पिटल जवळ माझ्या ऑफिसच्या टेरेस वरून काढलेला आहे..
संदीप दा तुम्ही काढलेला फोटो एकदम झकास
माझ्याकडे याचा vidio आहे त्याचा screenshot