Submitted by मृण्मयी on 7 June, 2012 - 22:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मिळतील ती हिरवी वांगी. (आमच्याकडे जास्त पर्याय नाहीत. :P)
कांदा
पातीचा कांदा
लसूण
हिरव्या मिर्च्या
भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट
मीठ
तेल
मोहरी
तीळ
ओवा
जिरं
क्रमवार पाककृती:
*वांगी, मिर्च्या, लसूण फुफाट्यात भाजून घ्यावं. बारक्या वांग्यांना साधारण १०-१२ मिनिटं लागतात.
*फोडणीत मोहरी, जिरं, ओवा आणि तीळ घालून हे सगळं तडतडू लागलं की बारिक चिरलेला कांदा घालावा. (फोटोतला कांदा बारिक चिरलेला नाही याची नम्र जाणीव आहे. :P)
* बारिक चिरलेली कांद्याची पात, दाण्याचा कूट, भाजलेल्या मिर्च्या, लसूण फोडणीत घालून परतावं.
*सालं सोलून कुस्करलेली वांगी आणि मीठ घालून परतून घ्यावं.
वाढणी/प्रमाण:
वांगी आणि इतर जिन्नस यांच्या प्रमाणावर अवलंबून
अधिक टिपा:
*बारक्या वांग्यातल्या बिया कोवळ्या वाटल्या.
*प्रमाण दिलं नाही. अंदाजानं सगळं घेतलं आणि मीठ व्यवस्थीत पडलं की भरीत चांगलं लागतं.
माहितीचा स्रोत:
औरंगाबादेतली मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! छान! (पण अमेरिकेतल्या
वा! छान!
(पण अमेरिकेतल्या वांग्यांनां बिया फार!) (आता सिंडरेला येइल सशल नेहेमी हेच रडगाणं गाते असं म्हणत ..)
वॉव मृ - लव्हड ईट!
वॉव मृ - लव्हड ईट!
यम्मी दिसतय
यम्मी दिसतय
मस्त... माहेरी मिळणार्या
मस्त...
माहेरी मिळणार्या कॄष्णाकाठच्या वांग्याची आठवण झाली. एकदम मस्त, आणी बिया नसलेली हिरवी वांगी..
पण अमेरिकेतल्या वांग्यांनां बिया फार>>>>>> अगदी अगदी
आणी ईथे कुठे मिळायला हिरवी वांगी
हिरव्या वांग्याची चव च
हिरव्या वांग्याची चव च न्यारी.पातीचा कांदा घालुन ती अजुन वाढते..मस्त आहे.पण हळद मुद्दाम नाही घालायची का?
एकदम मस्त फोटो. करून बघणेत
एकदम मस्त फोटो. करून बघणेत येईल. ईतक्या छोट्या वांग्यांचं भरीत करायचा प्रयत्न केला नव्हता.
पण ईथल्या हिरव्या वांग्यात बिया खूपच असतात. तरीही सीमाची लग्नातल्या भाजीची रेसिपी ट्राय केल्यापासून हिरव्या वांग्यांच्या प्रेमात आहे. त्यामुळे भरीत पण करून बघणार.
मृण्मयी, बाप रे कसलं भारी
मृण्मयी, बाप रे कसलं भारी दिसतंय हे.. स्लर्पी!
मस्तच! आम्ही पण कांद्याची पात
मस्तच! आम्ही पण कांद्याची पात घालत असतो भरितात.
मस्त रेसिपी, फोटो. इथे हिरवी
मस्त रेसिपी, फोटो.
इथे हिरवी वांगी बघितल्याची आठवत नाहीत. जांभळी घ्यावीत तरी त्याला भारतातल्यासारखा गर कुठे असतो? चिरता येण्यासारखी असतात. तुम्ही तीच घेता का?
फुफाटा म्हणजे काय?
व्वा मस्त रेसिपी मृ! ़करणार
व्वा मस्त रेसिपी मृ! ़करणार नक्की. इथे अपना बाजार ला हिरवी वांगी नेहमी मिळतात. सायो, बघ तुमच्याकडे पण मिळत असतील.
तोपासु.
तोपासु.
सशल +१ काल आईने चक्क वांगी
सशल +१
काल आईने चक्क वांगी चिरली आणी फेकून दिली का तर म्हणी त्यात बिया होत्या. तिला पण कृष्णाकाठची वांगी खाउन सवय त्यामुळे असेल..
हे करून बघीन.
फोटो जबरी आहेत. खांदेशात
फोटो जबरी आहेत.
खांदेशात लांबुडकी हिरवी वांगी मिळतात. त्याचचं भरीत केलं जातं नेहमी. त्याला भरताची वांगीच म्हटलं जातं.
लै भारी . एशियन ग्रोसरीमधे
लै भारी . एशियन ग्रोसरीमधे बारकी हिरवी वांगी मिळतात आमच्या इथे. ती आणून करून पहाण्यात येइल. मैत्रिणीकडे कोळशाचं ग्रिल घेतलंय नवीन. त्यावर कधीही वांगी भाजून मिळतील असं आश्वासन आहे .
भयंकर तोंपासु दिसतंय भरीत
भयंकर तोंपासु दिसतंय भरीत
सशल, नवीन लेखनात वांग्याची कुठली पण रेसिपी दिसली की मला तुझीच आठवण येते
मस्त दिसतय!!! प्रॅडी, तुला
मस्त दिसतय!!!
प्रॅडी, तुला इथे कुठे हिरवी वांगी मिळाली?
देसी ग्रोसरीत मिळतात अगं.
देसी ग्रोसरीत मिळतात अगं. मोठी नाहीत छोटीच. विंडवर्डला ईंडिया प्लाझा मधे किंवा १४१ वरच्या चेरियन्स कडे पण असतात.
मस्तच मस्त! माझ्याकडे नेहमीच
मस्तच मस्त! माझ्याकडे नेहमीच मिळतात इ.ग्रो मधे हिरवी वान्गी. उद्या वीकान्ताला हाच बेत.
मृ, तू शार्लेटात कधी येतेयस्?
धन्यवाद! इथे फार क्वचित देशी
धन्यवाद!
इथे फार क्वचित देशी दुकानांत, कधीमधी क्यूबन्/मेक्सिकन किंवा व्हिएतनामी दुकानांत हिरवी वांगी मिळतात. सगळी बियाळ. पण एकदा हिरवी लांबुडकी मिळाली त्यात बिया नव्हत्या.
>>हळद मुद्दाम नाही घालायची का?
हो. भरीत पिवळं (किंवा तिखट घालून लाल) दिसायला नको.
तसंच चिंच्-गूळ किंवा तत्सम काही घालायचं नाही.
सु.मॉ., आणखी दोन वर्षांत!
मस्त कृती. आज या पद्धतीने
मस्त कृती. आज या पद्धतीने करुन पाहिले. आवडले.
मस्तय
मस्तय
सायो, "आगीतून फुफाट्यात" वाला
सायो, "आगीतून फुफाट्यात" वाला फुफाटा गं. (खरंच!) वांगी नीट भाजयला फुफाट्यात टाकतात.
मस्त. आमच्यायाकडे मिळत
मस्त. आमच्यायाकडे मिळत नसावीत.. नुसतच फोटो बघत बसते आता.
आमच्याकडे गॅस नाही.
आमच्याकडे गॅस नाही. इलेक्ट्रिक प्लेटवर वांगी नीट भाजली जात नाहीत. म्हणून मी ओवनमध्ये एक मध्यम आकाराचे वांगे ४५० डिग्रीला सधारणपणे पाउण तास ठेवतो. छान रोस्ट होउन निघते.
थँक्स प्रॅडी. चेरीयन मध्ये
थँक्स प्रॅडी. चेरीयन मध्ये जाऊन पांढरी वांगी आणण्यात आली आहेत
रिपीट पोस्ट
रिपीट पोस्ट
अरे वाह !!मी हीच रेसिपी शोधात
अरे वाह !!मी हीच रेसिपी शोधात होते..
दह्याशिवाय भरीत???
दह्याशिवाय भरीत???
विकेंडला भरीत करण्यात आलं
विकेंडला भरीत करण्यात आलं (आणि मृआक्कांची भेटही झाली)
नंबर एक, रापचिक, तोंपासू वगैरे वगैरे झालं होतं.