इडलीचे वाटलेले मिश्रण.
३:१ तांदुळ व उडिद डाळ्.इथे मी साधा तांदुळ व उकडी तांदुळ अर्धा-अर्धा भाग घेतला आहे.उकडीच्या तांदुळामुळे इडली छान फुगते व आतुन मऊ-लुसलुशीत होते.दोन्ही तांदुळ वेगवेगळे भिजवुन ठेवायचे.भिजवताना त्यात अर्धा चमचा मेथीदाणा घालायचा.मेथीदाण्यामुळे इडलीला छान चव येते.मिक्सर मधे वाटताना थोडे रवाळ वाटायचे आहेत.तसेच उडिद डाळ अगदी बारीक वाटुन घ्यायची .दोन्ही एकत्र करुन ५-६ तास ठेवायचे.
मसाला-
२ चमचे प्रत्येकी चणाडाळ,मुगडाळ
१ चमचा उडिद डाळ.
२ चमचे तीळ,
१ चमचा जिरे.
पाव चमचा हिंग.
कढीलिंबाची पाने.५-६.
१/२ चमचा काळे मिरे.
१ चमचा लाल तिखट/लाल सुक्या मिरच्या.
मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी २ चमचे तेल व पाव चमचा जिरे.
इडली पिठाला खमीरा आला कि त्यात मीठ घालुन मिनी इडली पात्रातुन इडल्या तयार करुन घ्याव्या.किंवा नेहमीच्या इडल्या करुन एकाचे चार तुकडे सुरीने कापुन घ्यावे.
ह्या पहा तयार मिनी इडल्या.
आता मसाला करायचा.त्यासाठी कढईत चणाडाळ्,मुगडाळ व उडिद डाळ खमंग भाजुन घ्यावी.तीळ भाजुन घ्यावे.जिरे थोडेसे गरम करावे.
मिक्सर मधे भाजलेल्या डाळी,तीळ,जिरे,मिरे,कढीलिंबाची पाने ,हिंग किंचित रवेदार वाटुन घ्या.अगदी पिठी नको.[लाल सुक्या मिरच्या घालणार असाल तर त्याही बरोबर वाटुन घ्या.]हे मिश्रण एका बाऊल मधे काढुन त्यात आवडीप्रमाणे तिखट,मीठ घाला.मसाला तयार आहे.
आता कढईत तेलाची फोडणी करुन पाव चमचा जिरे घाला.गॅस बंद करा.त्यात मिनी इडल्या घाला .वरुन अंदाजाने थोडा-थोडा मसाला पसरवा आणि झार्याने हळुवार,इडल्या मोडणार नाहीत व मसाला सर्व इडल्यांना लागेल अशा रितीने हलवा.
मसाला इडली तयार आहे.
अशा मसाला इडल्यांमधे पाण्याचा वापर नाही त्यामुळे प्रवासासाठी टिकाऊ.थंड मसाला इडली जास्त छान लागते.स्टार्टर,मुलांची पार्टी,डबा,पिकनिक साठी उत्तम.
हा मसाला पराठा,ब्रेड वर पसरुन खाता येतो,दह्यात कालवुन चटणी /रायते करता येते.
प्रत्येक वेळी ताजा केलेला मसाला जास्त छान लागतो.जास्त केला तर घट्ट झाकणाच्या डब्यात/बाटलीत ठेवावा.
मस्त. उरलेल्या इडल्या खपवायला
मस्त. उरलेल्या इडल्या खपवायला छान युक्ती आहे.
मस्तय
मस्तय
छान मसाला. भातात घालून पण
छान मसाला. भातात घालून पण चांगला लागतो.
मस्त..पटकन उचलुन २ खाल्या...
मस्त..पटकन उचलुन २ खाल्या...
मसाला इडल्या सही दिसतायत !
मसाला इडल्या सही दिसतायत !
मस्त दिसतायेत.
मस्त दिसतायेत.
मस्त.. उद्याच करून पाहते.
मस्त.. उद्याच करून पाहते. सकाळीच डाळ-तांदूळ भिजवून आलेय.
ह्हा!!!! अश्श्श्याच्याअश्श्या
ह्हा!!!! अश्श्श्याच्याअश्श्या उचलून खाव्याश्या वाटतायेत..... सुलेखा!!!!
वॉव काय मस्त दिसत आहेत
वॉव काय मस्त दिसत आहेत इडल्या...
यम्मी!!! मस्त दिसतायत इडल्या
यम्मी!!!
मस्त दिसतायत इडल्या आणि मसाला इडल्या
मसाला दह्यात, तेलात कालवून पण मस्त लागेल
इडली आवडता प्रकार. त्यात
इडली आवडता प्रकार. त्यात उरलेल्या इडलीचे शक्यतो इडली फ्रायच ट्राय केले जाते प्रत्येक वेळी. आता हा प्रकार करून पाहिला पाहिजे.
तोंपासु दिसतायंत अगदी
तोंपासु दिसतायंत अगदी
तोंपासू दिसतायेत इडल्या
तोंपासू दिसतायेत इडल्या
मस्तच! करुन पहायलाच हव्या
मस्तच! करुन पहायलाच हव्या
मिनि मसाला इडल्या फारच
मिनि मसाला इडल्या फारच आवडल्या.
मस्त दिसतायत. उकडीचा तांदूळ
मस्त दिसतायत. उकडीचा तांदूळ म्हणजे 'पार बॉईल्ड' ना?
मस्त दिसत आहेत!
मस्त दिसत आहेत!
सायो,उकडीचा तांदुळ=पार
सायो,उकडीचा तांदुळ=पार बॉईल्ड.
लाजो,दह्यात/ताकात/तेलात तसेच पाण्यात पेस्ट करुन त्यावर लिंबु पिळुन्,तसेच वरुन फोडणी घालुन मसाला छान लागतो.प्रवासात बरोबर ठेवण्याजोगा आहे.मऊ भातावर मेतकुटासारखा पसरुन तर मस्त चव येते.पापडावर मसाला पसरुन त्यावर बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो घातला तर मसाला पापड अप्रतिम लागतो.
सुलेखा: तुझ्या रेसिपी मस्तच
सुलेखा:
तुझ्या रेसिपी मस्तच असतात ग! हि पण करून बघणार-सोप्पी आणि खास दिसतेय.
आहाहा दिसतय... जळला जीव
आहाहा दिसतय...
जळला जीव माझा...
पापडावर मसाला पसरुन त्यावर
पापडावर मसाला पसरुन त्यावर बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो घातला तर मसाला पापड अप्रतिम लागतो<< भारी आयड्या... आजच्च करणार
मस्तच ! नक्की करून बघणार .
मस्तच ! नक्की करून बघणार .
सही
सही
समस्त इडली-प्रेमींना धन्यवाद
समस्त इडली-प्रेमींना धन्यवाद !!
मस्त प्रकार आहे, करून बघणार
मस्त प्रकार आहे, करून बघणार नक्की!
आवडली रेसिपी!
आवडली रेसिपी!
हो मसाला इडली आवडलीच.
हो मसाला इडली आवडलीच.
मस्त दिसतीय मसाला इडली
मस्त दिसतीय मसाला इडली
सुलेखा, इडली तर छान दिसतेच
सुलेखा,
इडली तर छान दिसतेच आहे आणी क्रोशाचा रूमाल पण अगदी सुरेख दिसतोय...
सुंदर! अश्या प्रकाराला इकडे
सुंदर!
अश्या प्रकाराला इकडे गुंटुर इडली म्हणतात. यात मात्र इडल्या मोठ्या असतात. त्यावर पोडीबरोबर तूप घातलेले असते.
Pages