साल्सा

Submitted by prady on 31 May, 2012 - 11:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६-७ रोमा टोमॅटोज
६ पातीचे कांदे
४ सेरॅनो पेपर्स
१ बनाना पेपर
१-२ हाबेनेरो पेपर (ह्या मिरच्या अतिशय तिखट असतात. काळजीपूर्वक हाताळाव्यात. ह्याची वर्गवारी पुढील प्रमाणे करता येईल. हिरव्या- माईल्ड, पिवळी/ केशरी - मॉडरेट, लाल- हॉट )
३-४ नेहेमीच्या साध्या हिरव्या मिरच्या.
१ जुडी कोथिंबीर
१ टीस्पून ताजी कुटलेली काळी मिरी.
१ टीस्पून गार्लिक सॉल्ट
१५ आउन्सचा टोमॅटो सॉसचा टिन

वर उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या मिरच्या लोकल फार्मर्स मार्केट मधे मिळतील. जवळपास क्रोगर असेल तर तिथेही मिळतील.
banana pepper.jpg बनाना पेपर्स

habanero pepper.jpg हाबेनेरो पेपर्स

serrano pepper.jpg सेरानो पेपर्स

क्रमवार पाककृती: 

१) पातीचा कांदा बारीक चिरून घ्या. (पात वगळून)
२) सर्व मिरच्या धुवून रफली चॉप करून घ्या.
३) टोमॅटोच्या बिया काढून त्याचेही मोठे तुकडे करून घ्या.
४) कोथिंबीर धुवून बारीक चिरून ठेवा.
५) आता सर्व मिरच्या , पातीचा कांदा चॉपर मधून फिरवून घ्या. एका बोल मधे काढा.
६) टोमॅटो देखील चॉपरमधून काढा. चंकी राहिले पाहिजेत. पेस्ट नको.
७) मिरच्या, टोमॅटो, पातीचा कांदा, कोथिंबीर नीट मिसळून घ्या.
८) ह्यात आता टोमॅटो सॉस मिसळा.
९) चवीप्रमाणे मीठ, गार्लिक सॉल्ट, मिरपूड घाला.
१०) सर्व मिसळून टॉर्टिया चिप्स बरोबर साल्सा सर्व करा.

salsa.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

हा साल्सा बराच तिखट होतो त्यामुळे जर फार तिखट खात नसाल तर जरा जपूनच.मिरच्या देखील फार जपून हाताळाव्यात. तिखटपणा कमी करण्यासाठी मिरच्यांमधील बिया काढून टाकता येतील.

माहितीचा स्रोत: 
नवरा.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाण्याच्या कल्पनेनेच घाम फुटू शकतो. Wink करुन बघणार.

तिखटपणा कमी करायचा असेल तर त्या मिरच्या ग्रिल करुनही घालता येतील. ग्रिल्ड् पाब्लानोपण चांगल्या लागतील.

चांगली तिखट रेसिपी आहे .. कॅन मधले टोमॅटो सॉस वापरल्याने कधीही कमी होणार नाही असा आंबटपणा येत नाही का?

वरच्या चित्रातल्या सेरानो पेपर्स हॅलापिनो सारख्या दिसतायत ..

सशल अजिबात नाही होत इतका आंबट. सेरानो हॅलापिनो सारख्याच दिसतात जवळपास. थोड्या कमी ढब्बू.
सिंडी जमा नही मेरेको. (टे चॅ Wink )

बारा गटगला हाSSSत म्हणून लावला नाही बायांनी.:फिदी: तेव्हा कळलं नसतं किती तिखट लागतो ते? जौद्या झालं. Proud

मस्त!!

प्रॅडी, फोटो असलेली पोस्ट एडीट कर, तिथला सगळा मजकूर (फोटोच्या जागी लिंका असतील, त्याच्यासकट) कट कर, त्या पेजमधून बाहेर पड, मग ही पाककृती एडीट कर, जिथे फोटो हवेत तिथे कट केलेला मजकूर पेस्ट कर, सेव कर, झालं काम.
हे स्टेप बाय स्टेप - http://www.maayboli.com/node/27484

भारतात काय वापरता येइल याकरता? हायपरसिटीतून एकदा आणला होता. लै महाग अन लै ब्येकार होता.

धन्यवाद सर्वांना.
माधव वर उल्लेखलेले सर्व जिन्नस भारतात मिळतात का ह्याची कल्पना नाही. काही स्पेशॅलिटी ग्रोसरी स्टोअर्स असतील तर तिथे मिळतात का बघा.

छान कृति.

माधव, साधारण भाजीबाजारात अनेक प्रकारच्या मिरच्या दिसतात. अनुभवाने त्यातल्या जास्त तिखट, कमी तिखट माहित असतात. आपल्याला हव्या त्या वापरता येतात. भारतात टोमॅटोला मात्र जास्त रस सूटतो. त्यामूळे त्यातल्या बिया काढून वापरल्या तर चांगल्या.

अगदी अलिकडे वाचले त्याप्रमाणे, मिरच्यांचा तिखटपणा बियात नसून आतल्या पांढर्‍या पापुद्र्यात जास्त असतो. तो पण काढावा लागेल.