नवीन कॉम्पुटर घ्यायचा आहे.

Submitted by तनू on 15 May, 2012 - 06:10

आम्हाला घरी नवीन/सेकंड हॅन्ड कॉम्पुटर घ्यायचा आहे. lcd स्क्रीन आणि latest config चा कॉम्पुटर किती पर्यंत मिळू शकतो? आणि इंटरनेट सुविधेबद्दल पण माहिती हवी आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काम करणार आहात त्यावर configuration ठरवता येते. शक्यतो सेकंड हॅन्ड कॉम्प्युटरसाठी जाऊ नका. बाकी माहिती भ्रमर देईलच.

भ्रमरा, धागा आलाच आहे तर लॅपटॉपविषयी काही माहिती विचारेन म्हणतो.
थोड्या लिन्का गोळा करुन येतो..

सगळ्यात आधी - लॅपटॉप वा डेस्कटॉप ते ठरवा. मग बजेट ठरवा.
मार्केटात अगदी १२०००/- पासून डेस्कटॉप आणि २००००/- पासून लॅपटॉप मिळतात. मी सुचवीन की तुम्ही मध्यम config पहावं म्हणजे ते लगेच १/२ वर्षात ऑबसोलेट होत नाही. अस्लं config लॅपटॉप मधे ३०/३५ हजारापर्यंत तर डेस्कटॉप मधे २०/२५ हजारांपर्यन्त मिळू शकेल.
डेस्कटॉप घेणार असलात तर यूपीएस जरूर घ्यावा, पॉवर जात नसली तरीही!

कुठे राहता त्यावर इंटरनेट चे प्लॅन्स ठरतील. मुंबईत, नवी मुंबईत लोकल केबल ब्रॉडबँड स्वस्त पडतं. एमटीएनलचे पण प्लॅन्स चांगले आहेत, पण जोडणी करता वेळ लागतो + लॅड्लाईन पण घ्यावी लागते त्यामुळे त्याचं पण minimum monthly rental भरावं लागतं.

आधी हे ठरवा ब्रँडेड घेणार आहे की मॉडिफाईड घेणार आहे............ब्रँडेड मधे सर्विस मिळाण्यात वेळ जातो...हे एक प्रोब्लेम आहे जास्त..
c3 processor = 3500-5000 जास्तित जास्त
MOTHERBOARD =2400-3500 कोणात्याही कंपनीचा घ्या
CABINET = 1200 जास्तितजास्त
DVD PLAYER = 1000 शक्यतो एलजी चाच मिळातो यात
RAM DDR3 2GB = 600 डायनेट अथवा किंग्स्टन
LCD = 5000 एस्सार व एल जी
MOUSE+KEYBOARD = 900 मायक्रोसोफ्ट अथवा आयबॉल
..
...
.
.आता विचार करा Happy

खालील बांधणीच्या संगणकाची ढोबळ किंमत किती असावी?
Intel core i5 cpu
intel mbd
16 gb ram
500 gb hdd
dvd writer
piv cab with smps
2 gb pci exp graphic card

hdd ऐवजी 500gb SSD (solid-state drive) वापरता येतो का? किती किंमत?
धन्यवाद!

http://www.flipkart.com/toshiba-satellite-c-series-c665-p5012-laptop/p/i...

वरच्या लिन्कवरचा कसा आहे.
नेट वापरणे, जनरल वापर ह्यासाठी. गेमिन्ग साठीही वापरेन. पण मी खुप डायहार्ड फॅन नाहिये गेमिन्गचा.
चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे असा मल्टिमेडिया वापर होइलच.
फोटोग्राफीत इन्टेरेस्ट असल्याने फोटोशॉपचा वापर देखील होइल.

सुट होइल का?

@ अवंतिका
Core i3 -2310 with Gigabyte H61 MoBo/ 2GB DDR3 Kingston/500 GB Western Digital/LG or Samsung DVD Writer/2.1 Speakers/Acer 20" LED Monitor/Logitech Keyboard +Optial Mosue/ VIP cabinet ... Rs. 25500.00 (incl. One year onsite service support)

@ बित्तुबंगा
Core i5-2400 / Intel D61WW/ 4x 4GB Kingston DDR3/500 GB Western Digital/LG or Samsung DVD Writer/2 GB PCIExpress Graphic Card/ VIP cabinet (no monitor, no kbd/mse) Rs. 29500.00(incl. One year onsite service support). 500 GB SSD??? सोनं घेऊन ठेव त्यापेक्षा! Happy

@ झकासराव
नेट आणि जनरल वापराकरता पुरेसा आहे. अगदी बेसिक गेम्स देखिल चालतील. 3D games नाही चालणार. फोटोशॉप CS5 हळु चालेल. त्यात २ GB Ram टाकुन घे आणि 64-bit OS टाक मग टकाटक चालेल. Happy

500 GB SSD??? सोनं घेऊन ठेव त्यापेक्षा>>> Rofl
हे SSD काय भानगड आहे?

. त्यात २ GB Ram टाकुन घे आणि 64-bit OS टाक मग टकाटक चालेल>> धन्यवाद भ्रमरा. Happy
अजुन मी फक्त विचार करतोय.
अर्थमन्त्री आणि गृहमन्त्री असलेल्या बायकोसमोर प्रस्ताव पास व्हायचाय. Happy

सर्वांना प्रतिसादसाठी धन्स

मला आता फक्त MS-Office, internet साठी हवा आहे.

@ अवंतिका
Core i3 -2310 with Gigabyte H61 MoBo/ 2GB DDR3 Kingston/500 GB Western Digital/LG or Samsung DVD Writer/2.1 Speakers/Acer 20" LED Monitor/Logitech Keyboard +Optial Mosue/ VIP cabinet ... Rs. 25500.00>>> यापेक्शा कमी बजेट मध्ये होउ शकत नाहि का? १८०००-२०००० मध्ये??

अवंतिका - मला वाटत नाही यापेक्षा कमीमध्ये येईल. हीच खूप कमी किंमत आहे. फक्त MS-Office, internet साठी हवा असेल तर मग i3 एवजी कोअर२डुओ घेणे चांगले.

भ्रमर - माझा अगदी सेम संगणक आहे. आत्ता त्यात ईनबिल्ट Intel chipset family 2000 आहे. पण मी ते वाढवून २ जीबी ग्राफिक्स कार्ड टाकायचा विचार करतोय. मला पीसी गेमिंगची आवड आहे. कुठला कार्ड घेऊ?

यापेक्शा कमी बजेट मध्ये होउ शकत नाहि का? १८०००-२०००० मध्ये??
हार्ड डिस्क कमी करा
प्रोसेसेर कमी घ्या
त्यामुळे मदरबोर्ड पण कमी क्वालिटीचा लागेल

एलसीडी ऐवजी मोनिटर घ्या ..झाले तुमचे बजेट पुर्ण

@ आशुचँप : i3 एवजी कोअर२डुओ घेणे चांगले >> Core2Duo बंद झाला आहे.
2 GB Graphic Card-Galaxy-GT 520……3,000/-

@अवंतिका : १८०००-२०००० मध्ये?? >> Intel Dual Core 3.0 Ghz / Gigabyte G41 MoBo/ 2 GB DDR3/ 250 GB Hard Disk/ DVD Writer/ Stereo Speakers/Kbd/Mouse/ CAbinet/16" acer LCD : 19500.00

CRT Monitors are no more available nowadays.

@झकासराव : हे SSD काय भानगड आहे? भानगडीबाबत सविस्तर माहिती Happy http://en.wikipedia.org/wiki/Solid-state_drive

Core2Duo बंद झाला आहे.
अच्छा हो का...हे माहीती नव्हते..मग आता सेकंड जनरेशन आल्यामुळे हे आय-३ पण बंद झाले असेल का.......म्हणजे एखाद्याला साधा कॉम्प घ्यायचा असेल तर सेकंडहँडच घ्यावा लागणार बहुदा...

बाकी - हा Galaxy-GT 520 एन्व्हीडीआ किंवा एटीआय पेक्षा कसा आहे....???

एखाद्याला साधा कॉम्प घ्यायचा असेल तर सेकंडहँडच घ्यावा लागणार बहुदा... >>>>>. आशु अरे किंमती कमी झाल्याना पण इ३-७ प्रोसेसर च्या .. एकुन एकच हिशोब होतो

साधा कॉम्प घ्यायचा असेल तर >>>> Dual Core OR Dual Core 2nd Generation आहे की >> भ्रमरा मला एकदम बेसिक साठी हवा आहे, त्यानुसार config सांगाल का

अवंतिका, मी वर दिलेले config पहा. Intel Dual Core 3.0 Ghz / Gigabyte G41 MoBo/ 2 GB DDR3/ 250 GB Hard Disk/ DVD Writer/ Stereo Speakers/Kbd/Mouse/ CAbinet/16" acer LCD : 19500.00

Atom processor असलेला Nettop आण्खी स्वस्त पडेल पण तो घेऊ नका.

शैलु, Asus चे लॅपटॉप वाईट नसतीलच कारण Asus हा ब्रांड खूप चांगला आहे. परंतु Warranty नंतर कही बिघाड झाला किंवा बॅटरी/चार्जर ई. बदलायचा झाल्यास त्याची उपलब्धता हा मुद्दा लक्षात ठेऊन मगच त्याची निवड करावी. मी अजुन एकही Asus विकलेला नाही. तू Acer, Toshiba यांचा विचार करु शकतेस. Toshiba मधे काही लॅपटॉपवर onsite warranty मिळते.

हा लॅपटॉप कसा आहे? http://www.dell.com/us/p/inspiron-15-intel-n5050/pd
या प्राइसरेंज मध्ये किंवा खाली, याच्यासारखे किंवा चांगले लॅपटॉप कोणते?
शिवाय युएसमधून घेणे स्वस्त की भारतातून घेणे?

खूप रिसर्च करायला वेळ नाहीये त्यामुळे काही रेकमंडेशन्स मिळाली तर बरं होईल. वापर केवळ इमेल्स्/फेसबुक, व्हिडिओ चॅटिंग, कॅमेर्यातले फोटो सेव्ह करणे इतपतच असेल..

माझी आई फक्त फेसबुक, मायबोली ....मेल्स चेक करणे, स्काईप इ. वापरते (थोडक्यात इंटरनेट व एम एक ऑफिस एवढेच वापरते.) तिला नवीन कॉम्प्युटर घ्यायचाय. नवीन कॉम्पची किंमत २५ ते तीस हजार आहे. ह्या सगळ्या गोष्टी फन-पॅड मधे पण असतात ना? त्याची किंमत पण ४-५ हजार एवढी कमी आहे. पण त्याच्यात इतर काही कमतरता आहेत का हे माहीत नाहिये. तर कोणी सांगु शकेल का की तिला कमीत कमी किमतीत कोणते ऑप्शन मिळू शकेल?

फन पॅड म्हणजे टॅबलेटच्या फंदात पडू नका.
नेटबुक १६-१८ पर्यंत मिळेल क्रोमा मधे. असेंबल्ड / डेस्कटॉप कॉम्प्युटर्स १५-२० दरम्यान मिळतील. एसर ई-मशीन नेट्बुक १३-१५ हजार किंमत आहे.

धन्यवाद इब्लीस. नेटबुक/टॅब्लेट/ एसर मशीनच्या फिचर्समधे तुलनात्मक काय फरक असतो?

नेटबुक हे छोटे लॅपटॉप आहेत. यात सीडी/डीव्हीडी ड्राईव्ह नसतो, स्क्रीन छोटा असतो. सुमारे १० इन्ची. यांत प्रोसेसर सहसा कमी क्षमतेचा असतो. पण तो आपल्या नेहेमीच्या कामासाठी पुरेसा - खरं तर पुरून उरेसा असतो. हे अल्ट्रापोर्टेबल आहेत.

टॅबलेट म्हणजे स्मार्टफोन सारखे अँड्रोईडवर चालणारे. स्क्रीन ७ ते १० इन्ची. यांना अंगचा कीबोर्ड नाही, टच-स्क्रीनवर चालतात. वयस्कर व्यक्तींना हे हाताळायची सवय होणे जरा जड जाऊ शकते. तसेच एम.एस. ऑफिस यावर नीट चालत नाही. काही टॅब सिमकार्डवर चालतात. इतरांना डाँगल लावावे लागते. वायफाय सगळ्यांना असते.

म्हणून आईंसाठी नेटबुक सुचविला. घरात वाय-फाय मोडेम बसवून दिलात/डाँगल नेट असली, तर त्या नेटबुक वापरून अपेक्षित असलेली सर्व कामे कुठेही बसून करू शकतील. याची बॅटरी लाईफही ६ तासापर्यंत असते.

एसर कंपनीचे नाव आहे.
यांचे लॅपटॉप, नेटबुक इ. उपलब्ध आहेत.

टॅबमधे सरकारी आकाश जो ११०० रुपयांत मिळाणार आहे, ६-८ हजारात कार्बन, मायक्रोमॅक्स इ. कंपन्यांचे आहेत, तिथपासून चांगले ४०-५० हजारापर्यंत पर्याय आहेत.

चार्जेबल गॅजेट बाबत एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्या बॅटर्‍या चार्जिन्ग सायकल्स्/कपॅसिटी सम्पल्यावर निकामी होतात. हा काळ साधारण दीडेक वर्षापासून सुरू होतो. त्याचा रिकरिंग खर्च असतो. लॅपटॉप् ची बॅटरी ४००० रु च्या दरम्यान बसते. अन्यथा डायरेक्ट मेन्सला जोडावा लागतो. लॅपटोपादि चार्जेबल गॅजेट्स (त्यात मोबाईलही आलेच) हा बॅतरी बदलण्याच्या छुप्या खरचाचा आपण विचार करत नाही....

लेनेवो all in one desktop बघुन आलो. एकात i3 आहे, ५१२ ssd आणि इतर. द्दुसरा Amd ryzen 5 आहे. बाकी सगळे सारखे. ह्या दोन टेक्नॉलॉजित चांगला कुठला?

I3...

The problem with all in ones is if one thing breaks (display or CPU) you have to replace the entire thing. If you buy separate components you can upgrade individually.

One benefit of all in one is space saving. You can decide how important it is for you.

Modular कंप्युटर?
--------
Assembled कंप्युटरमध्ये . . .
अधिकृत माइक्रोसॉफ्ट ओएस ( विंडोज ११ ,होम,स्टडंट वगैरे) टाकता येते का? खर्च किती वाढतो?

अधिकृत माइक्रोसॉफ्ट ओएस ( विंडोज ११ ,होम,स्टडंट वगैरे) टाकता येते का? खर्च किती वाढतो? >>> 3500 मधे विंडोज 10 होम एडिशन - सिंगापोर वर्जन/6500 च्या आसपास इंडियन वर्जन, जवळपास तेव्हढेच विंडोज 11 साठी