मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती
मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित !
हा राजू मुळचा सिंधी ! फाळणीनंतर वडील मुंबईला स्थाईक झाले . मग राजूचा जन्म .सुमारे १९५० चा ,राजूने इलेक्ट्रीशियन चे शिक्षण घेवून मुंबईत छोट्या-मोठ्या कंपनीत जॉब केले . १९७८ ला सर्वप्रथम कतार ला आलां , लग्न झाले ,पण बायको मुंबईतच! हा सतत बाहेर .वर्षातून २ वेळा घरी यायचा !त्यानंतर मग अबुधाबी/सौदी/ओमान /बहारीन असे अनेक देशात २-२ /३-३ वर्षे काढत १९९२ ला कतार ला मेकॉन कंपनीत जॉईन झाला ,तो आजही तिथेच आहे .मधल्या काळात प्रचंड बदल झाले , कंपनीचे नावही बदलून मेकॉन चे क्यूकॉन झाले .पण राजूभाई जिथल्या तिथेच आहे ! सुरुवातीला आला तेव्हा पगार ५०० रियाल होता ,आता वाढत वाढत १७०० रियाल झालं, ओवरटाईम धरून ३००० रियाल म्हणजे सुमारे ४०,००० रुपयापर्यंत आहे .
पण राजूची हौस दांडगी! दर ६ महिन्यांनी घरी जाताना निम्मा पगार शॉपिंग वर खर्च करणार ! भारतात शेयर बाजारात खूप उलाढाली केल्या आहेत त्याने ! साधा टेक्निशियन असूनही त्याने शेयर्स मध्ये १० लाख गुंतवले होते .हर्षद मेहता फ्रॉड च्या वेळी बरेच नुकसान झाले ,पण परत जिद्दीने पुन्हा तेवढेच पैसे गुंतवले ! पण शेवटी २००८ च्या जबरदस्त मंदी मध्ये त्याचे पूर्ण १२ लाख गेले ! हाती राहिले फक्त दीड लाख! पण ईश्वराचा न्याय पहा ! नेमका त्याच वेळी कतारला कंपनीत एक स्फोट झाला आणि राजूही त्यात सापडला , ४ महिने हॉस्पिटलमध्ये . कंपनीकडून विम्याचे ९ लाख मिळाले . "वो उपरवाला सब देखता है, एक हाथ से देता है ,और दुसरे हाथ से लेता है, लेकिन आदमी कि नियत हमेशा साफ होनी चाहिये ,तो उपरवाला कभी भी आपको गिरने नही देगा !"-राजूचे जीवनविषयक तत्त्वज्ञान !
या हरफनमौला राजूला १ मुलगा आणि १ मुलगी .दोघानाही व्यवस्थित शिकवले ,लग्ने केली ,मुलगा बॉलीवूड मध्ये असिस्टंट डायरेक्टर आहे ! पण विशेष असे कि त्याने ४ वर्षाच्या दोन अनाथ मुलींना दत्तक घेवून वाढवले ,शिकवले आणि लग्नेही लावून दिली , आणि गेल्याच वर्षी आणखी एका ६ महिन्यांच्या अनाथ मुलीला पुन्हा दत्तक घेतले आहे !
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया".......रफीच्या धुंद स्वरांनी राजूची रास-लफान [कतार] मधली लेबर कॉलनीतील छोटीशी खोली भरून गेली होती , रोज संध्याकाळी २ पेग घेता घेता हिंदी गाणी ऐकणे हा त्याचा विरंगुळा !..................अशा अफलातून माणसाच्या अद्भूत आयुष्याबद्दल काय बोलावे ? कंपनीत मला "साहेब"म्हणणाऱ्या या राजूच्या अद्भूत व्यक्तिमत्त्वाला मी वाकून नमस्कार केला !!!!
मंदार कात्रे .
एवढे सारे केले मग व्यसन कशाला
एवढे सारे केले मग व्यसन कशाला केले?
कुलकर्णी एवढ्या सार्यात
कुलकर्णी एवढ्या सार्यात तुम्हाला फक्त व्यसनच दिसावे ?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सुंदर लेख, खरेच अफलातून
सुंदर लेख, खरेच अफलातून व्यक्तिमत्व...
विशेष असे कि त्याने ४ वर्षाच्या दोन अनाथ मुलींना दत्तक घेवून वाढवले ,शिकवले आणि लग्नेही लावून दिली , आणि गेल्याच वर्षी आणखी एका ६ महिन्यांच्या अनाथ मुलीला पुन्हा दत्तक घेतले आहे !>>> किती मोठी गोष्ट करुन दाखवली - सलाम या व्यक्तिला......
आता माबोवर आलात ना ? इथं
आता माबोवर आलात ना ? इथं भरपूर भेटतील..
कुलकर्णी एवढ्या सार्यात
कुलकर्णी एवढ्या सार्यात तुम्हाला फक्त व्यसनच दिसावे ?
>>व्यसन दिसले नाही , ईतके चांगले काम करतोय म्हटल्यावर यातच रमला असता तो किंवा रमतही असेल मग व्यसन कशाला? एवढाच प्रश्न
सुंदर लेख.एक दुरुस्ती... मै
सुंदर लेख.एक दुरुस्ती...
मै जिंदगी का साथ निभाता चला गया".......किशोरच्या >> हे गाणे रफीचे आहे....
अफलातून
अफलातून व्यक्तिमत्व............सलाम या व्यक्तिला.........
पहिल्या ओळीत "वय ६५" च्या
पहिल्या ओळीत "वय ६५" च्या ठीकाणी ५५/५७ करा. कारण तुम्ही जन्म १९५५ चा लिहिला आहे. व्यक्ती परीचय चांगला आहे, पण अजुन खुलवता आला असता. एखादी आठवण किंवा प्रसंग अॅड करुन.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद प्रतिसादाबद्दल .
छान
छान