Submitted by अभय आर्वीकर on 25 May, 2012 - 01:54
स्वातंत्र्य का नासले?
भारताला कुणी ग्रासले?
सांग स्वातंत्र्य का नासले?
विंचवाच्या विषा सारखे
बोलणे का तुझे भासले?
पिंड माझा पळपुटा नव्हे
मस्तकाला निवे घासले
प्रश्न साधाच मी मांडता
सर्व ज्ञानी मला त्रासले
मार्ग माझाच मी चाललो
दात त्याने जरी वासले
त्यागले काल जे तेच तू
'अभय' का आज जोपासले
- गंगाधर मुटे
------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
नावडल्यास नावडली म्हणा, टीका
नावडल्यास नावडली म्हणा, टीका करा, समिक्षा, रसग्रहण करा.
किंवा अनुल्लेखाने मारा.
पण; कृपया दुरुस्त्या-सुचवण्या सुचवू नयेत, अशी विनंती आहे. बाकी प्रतिसादकांची मर्जी.
-गंगाधर मुटे
सुंदर गझल... तोंड वासले ऐकले
सुंदर गझल...
तोंड वासले ऐकले होते.. दात वासणे प्रथमच...
.............................
पु.ले.शू!!
भारताला कुणी ग्रासले? सांग
भारताला कुणी ग्रासले?
सांग स्वातंत्र्य का नासले?..............सुंदर
मतला आणि मक्ता सोडल्यास इतर
मतला आणि मक्ता सोडल्यास इतर शेरांमधले खयाल पाहिले तर रचनाकार त्यांच्याशी अत्यंत प्रामाणिक आहे असे जाणवते
पण मराठीत आजवर न पाहिलेली ऐकलेली भाषिक वैशिष्ठ्ये पाहून निव्वळ गम्मत वाटून घेण्यापलीकडे काहीही करता येत नाही आहे
क्षमस्व
आपल्या अशा हगवण लागलेल्या रचना वारंवार पाहून पु ले शु म्हणावे की नको हाही मोठा प्रश्न आहे तरी म्हणतोच............
.........पुलेशु !!