आयुष्याला वळण देणारी मायबोली
नातीगोती अनेक तर्हेची असू शकतात.
नातीगोती माणसांची माणसांशीच असतात असेही नाही.
ऋणानुबंध चकोराचे चंद्रकिरणांशी किंवा ....
चातकाचे मृग नक्षत्रात बरसणार्या पहिल्या-पहिल्या टपोर थेंबाशीही असू शकतात.
नाते कधी रक्ताचे तर कधी स्नेहबंधनातून निर्माण झालेले असू असतात.
नात्याचा लौकिक प्रकार कोणताही असला तरी ज्या ॠणानुबंधनातून आत्मिक अलौकिकतेचा आनंद झिरपून मनाला नि:स्पृह निर्माल्यतेची अवस्था प्राप्त होत असते, त्या स्नेहबंधाचे धागे मनामध्ये फार खोलवर गुंतलेले आणि अतूट असतात, शब्दातीत असतात.
माझाही असाच एक धागा जुळलाय मायबोलीशी. शब्दात न सामावू शकणारा.
या कहाणीची सुरुवात तशी फार जुनी नाही. उण्यापुर्या दोन-अडीच वर्षातली; पण माझे अख्खे आयुष्य बदलून टाकणारी. आयुष्याला नवे वळण देऊन कलाटणी देणारी.
तसा मी स्वतःला फार भाग्यवान समजतो कारण जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते फारच चित्रविचित्र विविधतेने नटलेलं आहे. दु:ख, वेदना, यातना मिळाल्यात त्या पराकोटीच्याच; पण सौख्य, आनंद, सन्मान मिळाला तोही पराकोटीचाच. अवहेलना झाली ती पराकोटीची; पण आदरभाव मिळाला तोही पराकोटीचाच. साडेसातीने आयुष्याच्या पूर्वार्धात घेतलेली कसोटी पराकोटीचीच; पण उत्तरार्धात जे छप्परफ़ाड दान दिले तेही पराकोटीचेच. मध्यम किंवा सरासरी स्वरूपाचे जीवन कसे म्हणून माझ्या वाट्याला आलेच नाही. अगदी दैवाने दिला तो रक्तगट सुद्धा अत्यंत तुरळक वर्गवारीत मोडणारा आहे.
मी आज सांगणार आहे त्या कहाणीची सुरुवात झालीय २५ नोव्हेंबर २००९ रोज मंगळवार या दिवशी. रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी मी "औंदाचा पाऊस" ही माझी कविता मायबोलीवर प्रकाशित केली आणि लगेच केवळ ४ मिनिटात 'श्री' यांचा पहिला प्रतिसाद पाहायला मिळाला. माझ्या संबंध आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कवितेला चांगले म्हटले होते. तो माझ्यासाठी अभूतपूर्व क्षण होता. पाठोपाठ चंपक, कौतुक शिरोडकर, मुकुंददादा कर्णिक, गिरीश कुळकर्णी यांचे प्रतिसाद आलेत आणि याच प्रतिसादांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. माझ्यातला आत्मविश्वास जागवला आणि आजपर्यंत माझ्या शरीराच्या कोणत्या तरी कप्प्यात उतानाचीत झोपून असलेला कवी खडबडून जागा झाला.
मी त्यापूर्वी कविता लिहिल्याच नव्हत्या असे नाही. मी मॅट्रिकमध्ये असताना १९७८ मध्ये श्री सती जाणकुमातेवर आणि श्री संत गजानन महाराजांवर काही भजने लिहिली होती. ती भजनी मंडळींना एवढी आवडली होती की त्यांनी वर्गणी करून ”गजानन भजनावली" नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. पहिल्या आवृत्तीत १००० प्रती मुद्रित करण्यात आल्या होत्या. पैकी काही प्रती आपसात वाटून घेतल्यानंतर उरलेल्या सहा-सातशे प्रती शेगाव येथे विक्रीला दिल्या. आश्चर्याची बाब अशी की, त्या सर्व प्रती केवळ एका पंधरवड्यात विकल्या गेल्या. नंतर ”गजानन भजनावली" ची मागणी करणार्या ऑर्डर पोस्टाव्दारे नियमितपणे येतच होत्या. पण दुसरी आवृत्ती काही निघाली नाही आणि तो विषय तेथेच संपला.
त्यानंतर १९८४-८५ च्या सुमारास मी “बरं झालं देवा बाप्पा” ही पहिली कविता लिहिली. ती कविता शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या शेतकरी संघटकच्या “ग्रामीण अनुभूती विशेषांक” (२६ जुलै १९८५) मध्ये प्रकाशित झाल्यानंतर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांकडून त्या कवितेचे थोडेफार वाचन/गायनही झाले. श्री विनय हर्डीकर यांनी लिहिलेल्या “जग बदल घालुनी घाव” आणि “विठोबाची अंगी” या दोन पुस्तकात त्या कवितेचा उल्लेख झाला, दोन वृत्तपत्रीय स्तंभलेखात सुद्धा त्या कवितेचा उल्लेख झाला. आणि महत्त्वाचे म्हणजे मा. शरद जोशींनी “आठवड्याचा ग्यानबा” (०५ ऑक्टोबर १९८७) या साप्ताहिकात लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षकही “बरं झालं देवा बाप्पा” असेच होते. माझ्या पहिल्याच कवितेची एवढी दखल घेतली गेल्यामुळे तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मात्र ही रचना कवितेपेक्षा गीताकडेच अधिक झुकणारी असल्याची मला जाणीव असल्याने मी कविताही लिहू शकतो, असा विश्वास काही मला मिळाला नाही.
त्यानंतरच्या काळात मी १०-१२ कविता लिहिल्या. त्यातील काही कविता लोकमत, लोकसत्ता व तरुण भारत यासारख्या नामांकित वृत्तपत्रात छापूनही आल्यात. ज्यांनी वाचल्यात त्यांनी मला कविता वाचल्याबद्दल आवर्जून सांगितले पण अगदी निर्विकार चेहर्याने. त्यांचा चेहरा वाचताना माझी कविता बरी असावी असा मात्र पुसटसा सुद्धा अंदाज न आल्याने माझी कविता अगदीच सुमार दर्जाची असावी, अशी माझी खात्री पटत गेली. त्यानंतर माझी कविता फुलायच्या आतच करपून गेली कारण भाकरीचा शोध घेण्यातच त्यानंतरचा सर्व काळ खर्ची पडला. आणि काळाच्या वाहत्या प्रवाहाच्या उसळत्या लाटांमध्ये कविता लिहिण्याची प्रेरणा व ऊर्मी कशी दबून गेली ते कळलेच नाही.
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळताना”
आयुष्याची अशी अवस्था चक्क दोन तपापेक्षाही अधिक काळ तशीच कायम होती. मात्र २५ नोव्हेंबर २००९ रोजी “औंदाचा पाऊस” ही कविता ‘मायबोली’ वर प्रकाशित झाली. त्या कवितेवर मिळालेल्या अभूतपूर्व अभिप्रायानेच कदाचित माझ्यातला कवी पुन्हा जागृत झाला असावा आणि इतका प्रदीर्घ काळ कोंडमारा झालेली मनातील भावना शब्दबद्ध होवून कवितेचा आकार घेत अवतरीत झाली असावी. कारण त्यानंतर कविता लिहिण्याचा वेग इतका जास्त होता की...... ते माझ्यापेक्षा माबोकरांनाच जास्त माहीत आहे. नोव्हेंबर २००९ ते ऑगष्ट २०१० या नऊ महिन्याच्या काळात माझ्या हातून ८० पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्यात.....
आणि नोव्हेंबर २०१० मध्ये प्रकाशित झाला माझा पहिलावहिला काव्यसंग्रह - "रानमेवा"
रानमेवाच्या प्रास्ताविकात मायबोली आणि माबोकरांचा मी अगदी प्रांजळपणे ऋणनिर्देश केलेला आहेच.
वयाच्या ४६ व्या वर्षी मी मायबोलीवर आलो, कवितेचा श्रीगणेशा केला आणि ४७ व्या वर्षी अधिकृतपणे कवी झालो.
मायबोलीने मला भाषेची शुद्धता शिकवली, व्याकरण शिकवले, वृत्त शिकवले, गझलेचा आकृतिबंध शिकवला आणि १५ दिवसाच्या कालावधीत मी चक्क गझलकार झालो. गझलेच्या प्रवासात मला सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य नसले तरी छाया देसाई, शरद, चिन्नु, ......... या माबोकरांचे जे भरीव सहकार्य लाभले आणि मिलिंद छत्रे "मिल्या" यांचा मानसिक आधार मिळाला, ते मी विसरायचे ठरवले तरी विसरूच शकणार नाही.
मायबोलीवर माझा झालेला चंचुप्रवेशही थोडा मजेशीरच म्हणावा लागेल. नोव्हेंबर २००९ च्या पहिल्या आठवड्यात मी घरी संगणक आणला, इंटरनेट कनेक्टीव्हीटी घेतली. तेव्हा विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न झालेला होता. आंतरजालावर या संबंधात कुणी काही लिहिले आहे काय? हे शोधायचे म्हणून मी गूगल सर्च बॉक्समध्ये मी "शेतकरी आत्महत्या" हा शब्द टाकला आणि क्लिक केले. मला दोन लेख मिळालेत. पहिला होता ब्लॉगवरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी लिना मेहेंदळे यांचा आणि दुसरा होता मायबोलीवरील लक्ष्मण सोनवणे यांचा. मी दोन्ही लेख वाचले पण समाधान झाले नाही. माझ्या मनात जे खदखदतेय ते व्यक्त करायलाच हवे, या एकमेव प्रेरणेने मायबोलीचे सदस्यत्व घेतले; आणि माबोवर पहिला लेख लिहिला, 'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' .या लेखाची माबोकरांनी दखल घेतली. धमासान चर्चा झाली. आपण वाचकांचे लक्ष वेधून घेण्याइतपत किंवा वाचकांना चर्चेस प्रवृत्त करण्याइतपत चांगले लेखन करू शकतो, असा आत्मविश्वास मला या लेखाने दिला. चर्चेच्या ओघात एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी माझा एक स्वानुभव कथन केला आणि अनपेक्षितपणे जन्माला आला "वांगे अमर रहे!" हा माझ्या जीवनातला पहिला ललितलेख. हाच लेख मला एका स्पर्धेमध्ये पुरस्कार देऊन गेला.
माबोकर नानबा यांनी "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत?" असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर द्यायचे म्हणून मी जे काही खरडले, ती खरड म्हणजे "शेतकरी पात्रता निकष". हा लेख श्री श्रीकांत उमरीकर यांना एवढा आवडला की त्यांनी भरसभेत त्या लेखाचे कौतुक करून "शेतकरी संघटक" मध्ये प्रकाशित केला.
सध्या मी औरंगाबादवरून प्रकाशित होणार्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोचणार्या पाक्षिक "शेतकरी संघटक" मध्ये नियमितपणे "वाङ्मयशेती" या सदराखाली लेखमाला लिहितोय. कोल्हापूरवरून प्रकाशित होणार्या "शेतीप्रगती" या मासिकात, ठाण्यावरून प्रकाशित होणार्या "अमृत कलश" आणि राज्यातल्या इतर ३० दैनिक/साप्ताहिकात माझे लेखन नियमित प्रकाशित होत आहेत.
एका मोठ्या दैनिकाने दिवाळी विशेषांकासाठी पत्र पाठवून माझा लेख मागवून घेतला तर काहींनी कविता. मुद्रित माध्यमातील दिवाळी विशेषांकात माझे साहित्य प्रकाशित झालेली यंदाची माझी पहिली दिवाळी ठरली आहे. यंदाच्या लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, शेतीप्रगती, तरुण भारतच्या दिवाळी अंकात कविता आणि देशोन्नती व शेतीप्रगतीच्या दिवाळी अंकात माझे लेख प्रकाशित झालेले आहेत.
आज मी कवी, गझलकार आणि लेखक म्हणून नावारूपास आलो असेल तर ती केवळ मायबोलीची किमया आहे. मी जर मायबोलीवर आलो नसतो तर काय झाले असते, ठाऊक नाही पण मी कवी, गझलकार आणि लेखक नक्किच झालो नसतो.
- गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
टीप - हा लेख मी ऑक्टोंबर - ११ मध्ये लिहून "मायबोली हितगूज दिवाळी विशेषांका"साठी पाठवला होता. पण मुदत निघून गेल्यावर बराच उशिरा पाठवल्याने संपादक मंडळाला दिवाळी अंकात प्रकाशित करता आला नसावा.
बिरबल आणि आंग्रे, मला सगळे
बिरबल आणि आंग्रे,
मला सगळे कळते असे म्हणत नाही
मुद्दा जरा स्पष्ट लिहितो
मुटे ही व्यक्ती, त्यांचे समाजातील तळागाळाच्या घटकासाठी व खास करून शेतकर्यांसाठीचे कार्य व त्यांचे तडकेबाज नावीन्यपूर्ण काव्य या सर्वांबद्दल मला अतिशय आदर आहे
मात्र गेले तीन दिवस हे महोदय मायबोलीवर , मायबोलीवरील काही (त्यांना जाणवलेल्या, जसे कंपू वगैरे) प्रघातांवर व गझलेसंदर्भात जे काही केले जाते त्यावर मुक्त ताशेरे ओढत होते
ज्या लेखात त्यांनी मायबोलीबाबतची कळकळ , आस्था व ऋण व्यक्त केले आहेत तो लेख हे त्यांच्या ताशेर्यांवर झालेल्या टीकेमुळे निर्माण झालेले पश्चात्तापरुपी बालक आहे हे स्पष्ट दिसत आहे, अन्यथा कोणतेच प्रयोजन नसताना मुटेंनी असा लेख का लिहिला, मायबोलीवर कसा आलो व नंतर काय झाले यासाठी धागा उपलब्ध असताना स्वतंत्र धागा का काढला व त्यांना हे सगळे आजच का सुचले या प्रश्नांना उत्तरे नाहीत
(ते आता उत्तरे देऊ शकतील हे निराळे, पण प्रश्न विचारण्यापूर्वी असे प्रश्न विचारले जातील असे त्यांना वाटले नाही हे स्पष्ट आहे)
हे पहा त्यांचे प्रतिसादः
==================
<<<(माबोकरांना आवडणे/ नावडणे ही काही रचना अस्सल असण्याची/नसण्याची कसोटी नाही. )
>>>
=================
<<तुम्ही गझल करणार/पाडणार नाही म्हटल्यावर इथे लोकांना दु:ख होण्याऐवजी आनंदच होण्याची शक्यता आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
प्रतिसाद लिहिणे बंद करतो म्हटले असते तर बरीच मंडळी जीवाभावातून हळहळली असती.
>>>
=================
<<<माबोवरचे गझलकार उत्कृष्ट असले तरी गझलेच्या प्रांतातील सर्वश्रेष्ठ किंवा एकंदरीतच गझलेचे कर्तेधर्ते नाहीत, याची जाणीव तुम्हाला जसजशी होत जाईल, तसतसा माझ्या म्हणण्यातील गुढार्थ तुम्हाला हळुहळु कळत जाईल
>>>
=================
ही त्यांनी खास रचलेली हझल, जी केवळ मायबोलीवरील गझलचर्चेच्या रागातून त्यांनी रचली आहे
भिणार नाही तुला कुणीही, फुसकी खळबळ म्हणजे तू
पेल्यामध्येच खळवळणारे पुचाट वादळ म्हणजे तू
पराकोटीचा बेशरम तू, लाचार तू, येडपट तू
शेणामधल्या किड्यासारखी, अविरत वळवळ म्हणजे तू
नको तिथे नाक खुपसण्याचे, प्यायलास तू बाळकडू
उथळ पाण्यासारखी खळखळणारी खळखळ म्हणजे तू
ओंगळ तू, वंगाळ तू, जसा मल सांडव्याचा गाळ तू
साचलेल्या डबक्यामधील कुंठलेले जळ म्हणजे तू
राहू-केतू तू, असुरांचे दृष्ट हेवे-दावे तूच
स्मशानभूमीत पिशाच्चांची अशांत वर्दळ म्हणजे तू
छल-कट शिरोमणी शकुनी तू, कळीचा नारद मुनी तू
दुनियेस हैराण करणारी चुगलखोर कळ म्हणजे तू
वात्रट तू, वाह्यात तू, असतो इंद्रियांच्या कह्यात तू
उद्दामपणाच्या वृक्षाला आलेले फळ म्हणजे तू
ना नर तू, ना नारायण तू, दहा मुखाचा रावण तू
सर्व विकारास 'अभय'दाते, सोयीचे तळ म्हणजे तू
===================================
हे त्यांनी दिलेले वरील हझलेचे स्पष्टीकरणः
गंगाधर मुटे | 21 May, 2012 - 09:09
मयुरेश,
ही हगवण नाही, हझल आहे.
काल सायंकाळी उदभवलेल्या स्थितीमुळे जी माझी मानसिक हालत झाली, खरे तर त्याक्षणी कागद हातात घेऊन खरडण्याऐवजी निवांत झोपायला हवे होते. पण असे म्हणतात की मनुष्य जोशात आला की होश गमावून बसतो. त्यावेळी माझे नेमके तेच झाले.
====================================
<<<प्राध्यापक देवपूरकरांच्या रोगाची लागण आजकाल सर्वांनाच झाली आहे काय?
तसा हा रोग संसर्गजन्य आणि लांगटच असतो>>>
========================
<<<एखाद्या रचनेवर आवडल्या/नावडल्याच्या प्रतिक्रियेपेक्षा अवांतर चर्चा करून त्या रचनेचे बारा वाजवणे माबोवर आता सर्रास झालेले दिसत आहे. (हे केवळ माझ्याच बाबतीत नव्हे तर बर्याच निवडक कवींबाबत घडतांना दिसत आहे.)>>>
======================
मी मुटेंच्याच काय, कोणीच कोणाच्याच रचनेवर खरे तर असे तुटून वगैरे पडत नाही. पण जनरायलझेशन करून मायबोलीवर टीका करणे हे मुटेंचे कृत्य मला नाही आवडले म्हणून मी या धाग्यावरील प्रतिसादात तसे लिहिले. हा धागा आज काढायला काही इतर प्रयोजन असल्याचे मला तरी दिसत नाही म्हणून मी तसे लिहिले
धन्यवाद
-'बेफिकीर'!
_________/\__________
_________/\__________![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन मुटेजी. तुमची अशीच
अभिनंदन मुटेजी. तुमची अशीच दिवसोंदिवस प्रगती होवो ही सदिच्छा.
बेफिकिर साहेब, माबोवरील
बेफिकिर साहेब,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबोवरील तुम्ही किंवा तुमच्यासारख्या पाच पंचेविस आयड्या म्हणजे मायबोली नव्हे.
मुटेजी, आपल्यातल्या सूप्त
मुटेजी, आपल्यातल्या सूप्त प्रतिभेला जागृत होण्यातील मायबोलीचा मोलाचा वाटा आपण इथे माण्डलात त्याबद्दल धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन असेच बर्याच प्रमाणात बर्याच जणान्चे बाबतीत येथे घडले आहे/घडते आहे/घडत राहील यात शन्का नाही.
आपल्या शेतीविषयक लेखक म्हणुनच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
माबोवरील तुम्ही किंवा
माबोवरील तुम्ही किंवा तुमच्यासारख्या पाच पंचेविस आयड्या म्हणजे मायबोली नव्हे >>> हे ठरवणारे तुम्ही कोण??
मला वाटतं तुमच्यासारखी नावं बदलून हिंडणारी सगळी जमात म्हणजे मायबोली आहे असं तुम्हाला वाटत असावं .
........................................................
मुटे सर, भावना
मुटे सर, भावना पोहचल्या..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा...!!
>>माबोवरील तुम्ही किंवा
>>माबोवरील तुम्ही किंवा तुमच्यासारख्या पाच पंचेविस आयड्या म्हणजे मायबोली नव्हे.<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अगदि बरोबर, काही स्वंयघोषीत गझल सम्राट आजकाल स्वत:ला जास्तच शहाणे समजायला लागलेत.
स्वंयघोषीत गझल सम्राट आजकाल
स्वंयघोषीत गझल सम्राट आजकाल स्वत:ला जास्तच शहाणे समजायला लागलेत>>>> हो तर ह्या लेखावरून तरी असंच वाटतय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शाम सत्यमेव जयते
शाम
सत्यमेव जयते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काय ही परिस्थिती स्वत:ला
काय ही परिस्थिती स्वत:ला गझलकार आणि कवी म्हणवून घेणार्यांची आप आपसातच झुंपलेय.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ते
निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ते उगाच नाही...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ते
निर्लज्ज सदा सुखी म्हणतात ते उगाच नाही>>> हो ना.. आता तुम्हीच पहा म्हणजे झालं ..
!!
काय ही परिस्थिती स्वत:ला गझलकार आणि कवी म्हणवून घेणार्यांची आप आपसातच झुंपलेय >>> जुंपली वगैरे काहीनाही विजयराव, मुटे आमचे चांगले मित्र आहेत.. माझ्या विपूत मला दिलेला लाख मोलाचा त्यांचा सल्ला आपण बघू शकता... मी फक्त मायबोलीने त्यांच्या आयुष्याला दिलेलं वळण खोलाकडे तर नेत नाही ना हे पहातोय बस्स!
बर समजल...!, चालुद्या तुमचे
बर समजल...!, चालुद्या तुमचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> चांगले मित्र आहेत..
>>>> चांगले मित्र आहेत.. <<<<
जळकुकड्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला. असे काहीसे वाचल्याचे आठवते.
>>मी फक्त मायबोलीने त्यांच्या
>>मी फक्त मायबोलीने त्यांच्या आयुष्याला दिलेलं वळण खोलाकडे तर नेत नाही ना हे पहातोय बस्स!<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता ह्या नसत्या उचापत्या करायला तुम्हाला सांगितले कोणी, नाही म्हणजे ते वळण खोलाकडे गेल्यावर तुमच्या मित्राला त्या खोलात ढकलून नका देवु म्हणजे झाले. काय आहे ते तुमचे चांगले मित्र आहेत असे लिहलय वर तुम्ही म्हणून म्हणतोय..!
>>जळकुकड्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला. असे काहीसे वाचल्याचे आठवते.<< अगदि बरोबर
___________________________________
(शिकारी)ssssk
जळकुकड्या मित्रापेक्षा दिलदार
जळकुकड्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला. असे काहीसे वाचल्याचे आठवते.>>> चांगलं आठवा असं नाहिये ते...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जळक्या लाकडाला अडकून कुत्रा पडला असं आहे...
.
.
.
.
.
.
.
आपणं वाचलेलं पुस्तक एकच असेल तर
आता ह्या नसत्या उचापत्या
आता ह्या नसत्या उचापत्या करायला तुम्हाला सांगितले कोणी>>>. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगितल्याने तुम्ही करत आहात तर... किप अप
>>>जळक्या लाकडाला अडकून
>>>जळक्या लाकडाला अडकून कुत्रा पडला असं आहे...<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होय, तसेच आहे ते.
पण कुणाला कुत्रा म्हणणे आमच्या इभ्रतीला शोभत नाही.
पण कुणाला कुत्रा म्हणणे
पण कुणाला कुत्रा म्हणणे आमच्या इभ्रतीला शोभत नाही >> तुम्ही नका म्हणू हो , पण कुत्र्यालाही बिरबल म्हणणारी लोकं आहेत इथे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चालू द्या.
चालू द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घ्या खुद्द या धाग्याच्या
घ्या खुद्द या धाग्याच्या मालकांचीच परवानगी आली.....
धन्यवाद मुटेसर !!!
मुटे, सगळे डु आयडी तुमच्या
मुटे,
सगळे डु आयडी तुमच्या बाजूचे कसे हो?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला वाट्लं होतं फक्त "मराठी
मला वाट्लं होतं फक्त "मराठी गझल" धाग्यावरच जळजळीत वाचायला मिळतं ...
सगळ्याच धाग्यांवर मातीचा चुली आहेत म्हनायच्या
असो...! जोक्स अपार्ट.... शुभेच्छा मुटे सर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुटे पुढच्या वाटचालीस हा. शु.
मुटे पुढच्या वाटचालीस हा. शु.
सगळे डु आयडी तुमच्या बाजूचे
सगळे डु आयडी तुमच्या बाजूचे कसे हो?>>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विदिपा, कारण दुर्दैवाने मुटेंचा स्वतःचा असा एकही डुआयडी नाहीये
मुटेजी, शीर्षक भावलं.
मुटेजी, शीर्षक भावलं. मायबोलीचे अनेकांवर अनंत उपकार असतील. तुम्ही वाच्यता केलीत. मलाही हे सांगावसं वाटतय की मी आज जो काही आहे आणि माझ्या आयुष्यात आता जे काही उत्तम क्षण मी वारंवार अनुभवू शकतोय, त्यात मायबोलीचा सिंहाचा वाटा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार. तुमच्या सदिच्छा हेच माझे साहित्यिक भांडवल आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
------------------
बेफी,
हीच माझी भुमिका आणि ऋणनिर्देश मुद्रित "रानमेवा" मध्ये व्यक्त केलाय.
निव्वळ आदळआपट करण्यापेक्षा "रानमेवा" काव्यसंग्रहातील माझे प्रास्ताविक जरी तुम्ही वाचण्याची तसदी घेतली असती तरी एवढा गोंधळ टाळणे शक्य होते.
तुमच्याकडे रानमेवा आहेच.
शिवाय डॉ. कैलासजी गायकवाड, मंदार जोशी, कणखर विदिपा यांचेसह अनेक माबोकरांकडे "रानमेवा" आहे. खात्री करून घ्यायला हरकत नसावी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
-------------------
टीप - मी माझ्या देशावर प्रेम करतो, असे म्हणणे म्हणजे भ्रष्टाचारी / बलात्कारी भारतियांनाही मी पाठीशी घातले पाहीजे काय?
मुटेसर
मुटेसर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>> बेफिकिर, कणखर विदिपा
>>>>> बेफिकिर, कणखर विदिपा यांचेसह अनेक माबोकरांकडे "रानमेवा" आहे. <<<<
हे जर खरे असेल तर.....
>>"लेख लिहीण्याचा उद्देश मायबोलीचे ऋणनिर्देश करण्याचा नक्कीच नाही."<< - कणखर
>>"ज्या लेखात त्यांनी मायबोलीबाबतची कळकळ , आस्था व ऋण व्यक्त केले आहेत तो लेख हे त्यांच्या ताशेर्यांवर झालेल्या टीकेमुळे निर्माण झालेले पश्चात्तापरुपी बालक आहे हे स्पष्ट दिसत आहे "<< - बेफिकिर
....... तर कणखर आणि बेफिकिरांना देव सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करावी(च) लागेल.
Pages