रुपयाचे अवमुल्यन. का????

Submitted by ट्रोल on 23 May, 2012 - 11:49

"आज रुपयाचा निच्चांक".
"रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात कमी."
"रुपया ५५ रुपये पर्यंत घसरला"
"आज रुपया परत घसरला, आजचे मुल्य ५६ रु प्रती $"

अरे काय आहे हे, आठ-दहा दिवस झालेत रोज ह्याच बातम्या पाह्तोय. का आणि कश्यामूळे ही घसरण.
आज परत हेच कारण सांगितले ७.५० रु पेट्रोल भाववाढीस. म्हणजे परत सर्व जिवन आवश्याक वस्तु महागणार. व्यापारी, ठेकेदार , दलाल वस्तुंची कृत्रीम टंचाई करून यात भर घालणार.
परत रिक्षावाल्यांचा संप होईल, बसभाडे वाढेल. जलसिंचन प्रकल्प जे आधी ७० - ८० कोटी मधे पुर्ण होणार होते ते कालपर्यंत १००० - १२०० कोटी वर गेले, आता ते २००० - ३००० कोटी होतील. सगळीकडे दरवाढ हाच शब्द फक्त ऐकू येइल.

ह्यात भरडला जाणार तर तो फक्त सामान्य माणुस.

काय वाटते का होतेय ही घसरण ? का आपण स्थैर्य आणू शकत नाहीत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>काय वाटते का होतेय ही घसरण ?

बरीच कारणं आहेत. काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था हे एक प्रमुख. या वर्षाअखेर ६०/$ आणि पांच वर्षांनी ७५/$ बघण्याची तयारी ठेवा.

राज, अजून जरा माहिती देउ शकशील का? काळा पैसा वगैरे अनेक वर्षे आहे पण मधे बरीच वर्षे रूपयाचा उलटा प्रवास चालू होता (डॉलर ला ४३ पर्यंत गेल्याचे आठवते). ते कसे काय मग?

परदेशात माल, सॉफ्टवेअर, सर्विसेस वगैरे निर्यात करणार्‍या कंपन्यांना याचा फायदा होईल का?

परदेशात माल, सॉफ्टवेअर, सर्विसेस वगैरे निर्यात करणार्‍या कंपन्यांना याचा फायदा होईल का?>
फारएण्ड , नक्कीच फायदा होईल .

सध्याची भारताचा आयात निर्यात (साभारः विकी)
Exports $303.7 billion (2011 est.)
Imports $488.6 billion (2011 est.)

आयात गोष्टींमधे मुख्यत्वे पेट्रोल्/डिझेल्/गॅस ई. समावेश. त्यामूळे आयात खर्चात काहीच तडजोड नाही.

लाँग स्टोरी शॉर्ट = काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होत नाहि -> विकास कामात वापरता येत नाहि -> भाववाढिला खतपाणी मिळते..

पैसा हि ये कमोडीटी आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठयाचे नियम त्याला ही लागु होतात. करन्सी ट्रेड नेहमी pair मधे होतो. त्यामुळे पेअर मधली येक करन्सी वाढली तर दुसरि पडणार. रुपया चे मुल्य तेव्हाच वाढेल जेव्हा त्याला बाजारात मागणी जास्त असेल. गेल्या काही काळात शेअर मार्केट मधे घसरण चालु आहे त्यामुळे FII पैसे काढुन घेणार अर्थात रुपयाचि मागणी कमी होणार, अशी अनेक आंतराष्ट्रीय ईकॉनॉमीशी निगडीत कारने असतील, उदा, आपली वाढती ईम्पोर्ट्स .

जनरली डॉलर ही सेफ करन्सि समजली जाते आणि त्यामुळे जेव्हा ईकॉनोमीक डाउन्टर्न,स्लोडाउन , क्रायसिस सारखी परिस्थिति येते त्यावेळी डॉलर मधे पैसे पार्क केले जातात.

अर्थात भाववाड, काळाबाजार इ, कारणानी या घसरणीला हातभार लागतोच.

पाटिल>> सहमत.
मुख्य करण म्हणजे, डॉलरची वाढती मागणी.
भारतात गुंतवणूक असलेली मोठ्मोठी अस्थापने, सध्या डबघाईला आली आहेत. आपली पत वा वार्षिक अंदाजपत्रक सांभाळण्यासाठी त्यांची सद्या मोठ्याप्रमाणात निर्गुंतवणुक चालू आहे. अर्थात डॉलरची मागणी वाढली.

राज - काळ्या पैशाचा बेसिक कन्सेप्ट माहीत आहे Happy पण हे सगळे इतकी वर्षे चालू असताना मग मागच्या दशकात रूपया डॉलरच्या तुलनेत चढत कसा होता?

पण हे सगळे इतकी वर्षे चालू असताना मग मागच्या दशकात रूपया डॉलरच्या तुलनेत चढत कसा होता? >>>
केवळ काळ्या पैशावर रुपया- डॉलरचा भाव अवलंबुन नसतो. आणी काळा पैसा - किती पैसा आहे ह्याचा नक्कि हिशोब नसताना हि आकडेमोड करणे शक्य नाहि.
खालिल गोष्टिंवर अवमुल्यन अवलंबुन आहे
१. त्या दोन देशातील आयात - न्रिर्यात
२. महागाइ न्रिर्देशांक
३. त्या दोन देशातील relative महागाइ न्रिर्देशांक
४. छोट्या आणी दिर्घ मुदतीच्या व्याजातील फरक त्या दोन देशातील
५.गुंतवणुक
६. flow of funds between countries

आधी ४८ आता ५५+
... मग अवमूल्यन कसं म्हणता ? ५५ > ४८ >>>>>> सिरियस आहात असे वाटत नाहि.

>>मागच्या दशकात रूपया डॉलरच्या तुलनेत चढत कसा होता? <<
त्यामागचे ड्रायवर्स वेगळे होते. अमेरीकन अर्थव्यवस्था युध्धामुळे डबघाइला आली होती; त्यात भारताचं काहिहि श्रेय नाहि. आताहि, वी आर नॉट आउट ऑफ द वुड्स यट, बट मेकिंग सम प्रोग्रेस... Happy

महाराष्ट्र टाईम्स मधुन सभार...................

नीरज बोरगांवकर । पुणे

गेले काही दिवस सातत्याने रुपयाची घसरण झाल्याचे दिसत आहे . गेल्या अनेक वर्षांपासून आपण रुपया आणि अमेरिकन डॉलरचा विनिमय दर बघितला तर रुपयाचा आलेख सतत उतरता दिसून येतो . १९५० साली एका डॉलरसाठी ८ ते ९ रुपये असा दर होता . आज हा दर ५६ रुपयांवर येऊन पोहोचला आहे . मुळात , रुपया आणि डॉलर यांचा विनिमय दर सतत बदलता का असतो , याचा आपण विचार केला तर काही अत्यंत साधीसोपी कारणे याच्या मुळाशी असल्याचे लक्षात येते . एक उदाहरण देऊन ही कारणे देता येतील .

समजा , एका बेटावर पाच राज्ये आहेत . बेटावरच्या रहिवाशांच्या सर्व गरजा त्या बेटावर होणाऱ्या उत्पादनांमधे भागतात . कपडेलत्ते , खाणेपिणे आणि इतर सर्व गरजांसाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन हे त्याच पाच राज्यांमधे मिळून होते . सर्व उत्पादन सर्व राज्यांमधे होत नसल्यामुळे या राज्यांना एकमेकांशी व्यापार करावा लागतो . या राज्यांमधील राज्यव्यवस्था सर्वत्र वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक राज्याच्या कार्यक्षमतेमधे वेगळेपणा आहे . ज्या राज्यांची राज्यव्यवस्था जास्त सक्षम आणि व्यापारदक्ष आहे ते राज्य सर्वाधिक व्यापार करेल आणि समृद्ध होईल . ज्या राज्यामधे व्यापारक्षमता तुलनेने कमी आहे तिथे व्यापार वाढणार नाही आणि प्रगती होणार नाही . आता समजू , या बेटावरील राज्य क्रमांक एक सर्वाधिक व्यापारक्षम आहे . या राज्यामधे उत्पादनाचे प्रमाण जास्त आणि त्याच्या उपभोक्त्यांचे प्रमाण कमी आहे . आणि म्हणूनच त्या राज्याची निर्यात आयातीपेक्षा जास्त आहे . यांच्याकडचा १०० नाणी किमतीचा माल हे बाहेर ५०० नाण्यांना विकतात आणि बाहेरचा फक्त ५० नाण्यांचा माल विकत घेतात . त्यामुळे यांचा नफा जास्त आहे आणि म्हणूनच यांच्या चलनाची बेटावरील किंमतही अधिक आहे . याच्या उलट दुसऱ्या राज्यात राज्यव्यवस्था कार्यक्षम नसल्यामुळे उत्पादनाला जास्त वाव नाही . म्हणूनच यांच्याकडे उपभोक्ते जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे . तेव्हा या राज्याला यांच्याकडील चलन खर्चून बाहेरून आयात मोठ्या प्रमाणात करावी लागते . त्यामुळे यांच्या चलनाची किंमतही कमी आहे . आता ही किंमत कमी का ? हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ . समजा , एक माणूस समुद्रातून या बेटावर उतरला , त्याला बेटावर स्थायिक होण्याची इच्छा आहे . याला सर्वप्रथम दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काही वस्तू विकत घ्याव्या लागतील . राज्य क्रमांक एकमध्ये उत्पादन जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त वस्तू या त्या राज्यामधेच बनलेल्या असल्यामुळे त्या वस्तू त्याला खूप स्वस्त मिळतील . राज्य क्रमांक दोनमध्ये सर्वाधिक वस्तू बाहेरून मागवलेल्या असल्याने साहजिक सर्व वस्तूंसाठी त्या माणसाला जास्त किंमत मोजावी लागेल . समजा , राज्य क्रमांक एकमध्ये स्थायिक होण्यासाठी त्या माणसाला १०० किमतीचे चलन लागणार असेल तर तेच राज्य क्रमांक दोनमध्ये त्याला ५०० किमतीचे चलन खर्चावे लागणार असेल तर राज्य क्रमांक एकच्या एका नाण्यासाठी राज्य क्रमांक दोनमधली पाच नाणी असा विनिमय दर सध्या चालू आहे , असा होतो . राज्य क्रमांक दोनमधील सरकार जरा कार्यक्षम झाले आणि काही ठोस निर्णय घेतले गेले तर तेथील अर्थव्यवस्था सुधारेल आणि तिथल्या चलनाची किंमत वाढेल . असा विचार केला की हे बेट म्हणजे पृथ्वी आणि ही राज्य म्हणजे पृथ्वीवरील देश आहेत तर विनिमय दरामधे फरक का आहे , हे लक्षात येते . भारतीय रुपयाचा विचार केला , तर अमेरिका आपल्याहून अधिक कार्यक्षम आहे . आणि त्यांची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत असलेली दिसून येते . त्यामुळे रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ६० वर्षापासून कमीकमीच होत आलेली दिसते . २००८ मधे अमेरिकेत मंदी होती तेव्हा रुपयाचा दर थोडा वाढला होता . नंतर पुन्हा रुपयाची किंमत खालावली व आता सतत खालावत आहे . रुपयाची किंमत वाढायला हवी असेल तर भारतात तेजी येण्याची वाट पहावी लागेल वा अमेरिकेत मंदी !
( लेखक शेअर्स व म्युचुअल फंड ब्रोकर आहेत )

धन्य वाद मित्रानो एक ज्वलंत विषय मांड ल्याबद्दल ,
मला एक जाणून घ्यावेसे वाटते ,

आपल्या वाढ्त्या लोक् संखेचा ह्या घट्कात किती वाटा आहे ?

भारतीयाच्या वाढत्या उंच जीवनमानाचा किती परिणाम होतो ?

काही आठवड्यापूर्वी यशवंत सिन्हा आणि जयंत सिन्हा (मुलगा) यांचा कार्यक्रम आयोजीत केला होता. जयंत सिन्हांनी एक वेगळाच पैलू सांगीतला. ते म्हणाले - गेल्या दहा वर्शात भारताचा चलनवाढीचा दर सातत्याने १०% वा वर राहीला आहे. अमेरिकेत तोच दर साधारण ३ % आहे. म्ह्णजे फरकाच्या हिशोबाने डॉलर रुपया दर ६० ते ७० % खाली गेला पाहीजे. म्हणजे जर ४५ रुपये दर असेल तर १० वर्शात तो ८० रुपये झाला पाहीजे.

- झकास