ध्यान धारना

Submitted by मस्त कलन्दर on 17 February, 2012 - 14:20

09-Feb-12
ध्यानामध्ये ध्यान अस लागतच नाही . काल थोडीशी तंद्री लागली ,
मनात नक्की शिवशंकर आले पण स्वामींचा भास ,.... आजूबाजूला भुतावळ !
म्हनाले, म्हणजे मनातूनच फीलीन्ग्स आली - हि भुतावळ माझ्हीच लेकरं,
हिडीस फिडीस दचकवनारे चेहेरे बघून थोडी भीती वाटली.
अरे ह्या बिचार्यांना काय घाबरायचं? त्यांना मुक्तीची वाट दाखवायची कि आपणच घाबरायचं?
आयुष, आर्या मुखवटा घालून भौ: करतायत असं वाटलं . खूप वाईट वाटलं . आपल्या मुलांचा चेहरा असा असता तर ?
स्वामींना करुणासागर का म्हणतात हे कळलं. अफाट करुणा, कणव . ह्या फिलिंगनेच, डोळ्यातून अश्रू आले.....
सगळा बिन शब्दांचा २ मिनिटांचा कारभार पण बराच काही शिकवून गेला
स्वामी ओम !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नेमके कसे ध्यान करता? किती वर्षे झाली? कुणी अनुग्रह दिला की आपणच सुरु केले? दिवसातून किती वेळ करता? जरा डिटेल्स सांगा.

जागो मोहन प्यारे,
आता कुठे सुरवात झली आहे,
साधा संसारी माणूस मी, सकाळी मोर्निंग walk ला गेल्यावर उघड्या माळरानावर बसतो. सहसा कोणी येत नाही तिकडे.
स्वस्थ बसून डोळे मिटून समोर बघायचं.....पूर्वी असं रात्री बसल्यावर डुलकी लागायची म्हणून सकाळची वेळ पकडतो Happy

अनुग्रह असं काही नाही स्वामींच नाव घ्यायचो पूर्वी पासून . तेच मार्ग दाखवतील, दाखवतात
most recommended- लेखक जगनाथ कुंटे --नित्य निरंजन बुक.

विनय,
ध्यान धारणा करायची ती मनःशांती आणि शरीर स्वास्थ्या साठी. येणार्‍या दिवसाला नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने सामोरं जाण्याचं पाठबळ मिळावं म्हणुन.

डोळे मिटल्यावर नजरे समोर काहिबाही तळणारच.. त्या वर जास्त विचार करण्यात अर्थ नाही.

एक लक्षात ठेव, स्वत:चा मार्ग स्वत:च ठरवायचा असतो. त्या वर येणारे खाच खळगे पण आपलेच आणि यश पण आपलच. कुठलिही श्रध्द्धा तुला फक्त तु आखलेल्या मार्गावर चालण्याची शक्ती देते, तुला तुझ्या ध्येयावर नेऊन ठेवत नाही.

एस गंधर्व साहेब , तुमचा म्हणण बरोबर आहे , काही तरी तरळनारच , हीच तर माया . ह्या मध्ये अडकायला नको . आपल्याच मनाचा आवाज . पण तो तरी कधी आपण शांतपने ऐकतो का रे ?
थोडासा वेळ काढून शांत बसल्यावर picture सुरु होतो , सब पुराणी यादे याद आती है , कोणाशी काय बोलायला नको होतं ते सुधा कळत. आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे दिवस फ्रेश जातो
भ्रमर,
hmm अनुभव share केल्यामुळे अहंकारची भानगड येते, ध्यानाला बसल्यावर कोणाचा काय feedback आला आहे ह्या भोवतीच मन घुटमळत राहत. मन शांत होण्या एवजी विचार माळेची गाडी सुसाट सुटते . मी थोडासा अडाणी आहे माबो वर , actually मला नवीन discussion चालू करायचे आहे , ज्यामध्ये मला अपेक्षित होतं कि, जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. जर हे तुमच्या मदतीने करू शकलो तर नवनवीन माहिती मिळेल. असं होतना कि आपल्या बाजूला बसणारी व्यक्ती चांगली तबला वादक आहे हे अचानक function ला बघितल्या नंतरच कळत .
प्रतिसदा बद्द्ल धन्यवाद !