एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्याहि मालिकेचा प्रवास त्याचा लेखक, दिग्दर्शक किंवा निर्माता ठरवत नाहि तर मालिका ज्या वाहिनी वरुन प्रसारित होतात त्या वाहिनी चे प्रोग्राम हेड करतात.....

आत्याचा जरा जास्तच करत नाही का ? बिनडोक पणा ?
काय तो आनंदी पणा अमेरिकेला न जाण्याचा..कैच्या कै

हो काल राधाच्या आत्याबाईंना मुलगा आहे हे कळले. तो लांब कुठेतरी राहतो, इमेलने संपर्कात राहतो असे कळले. आता हा मुलगा जर अमेरिकेत असला तर ?

मला पण कळले नाही. इतके विचारी पालक मुलाला पहिले सूट देणार कि तुला जिथे जायचे तिथे जा. तो तिला फार रूडली बोलला पण. मी गप्प नक्कीच बसले नसते. Happy जे लोक कधीच अमेरिकेला गेलेले नसतात ते नेहमी अमेरिका म्हणतात. तिथे राहणारे किंवा जाउन येऊन असणारे स्टेट्स, नैतर यू एस, आपल्या इथे तर उसगाव असे म्हणतात असे माझे निरीक्षण आहे.

मागे एकदा घनाचे बाबा त्याच्या आईला ३२ का ३४ वर्षांनंतर सुध्दा माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे असं म्हणाले होते. आता त्यांचं लव्ह मॅरेज झालं नसेल तर लग्न ३२ ते ३४ वर्षांपूर्वी झालं. बरं घना लग्नानंतरच झाला असणार. म्हणजे तो जास्तीत जास्त ३१ किंवा ३३ वर्षांचा असेल. १५ वर्षांपासून म्हणजे १६ किंवा १८ वर्षांपासून राजेश्री प्रयत्न करताहेत. म्हणजे ह्याला स्टुडन्ट व्हिसाही मिळाला नाही की क्कॉय. एव्हढी सव्यापसव्य करण्यापेक्षा इन्फी, टीसीएस वगैरे कंपनीत लागावं, ऑनसाईट जावं आणि तिथे काही जुगाड करावा. हाय काय नाय काय! Proud

>>आणी जर घना ३० + वयाचा असेल (म्हणजे १५ वर्षाच्या हिशोबाने असायला हवा) तर त्याला हि maturity असलेली दाखवायला हवी होती.

वय आणि मॅच्युरिटी ह्याचा संबंध नसतो. काही लहान वयाचे लोक फार मॅच्युअर्ड असतात. तरी कधीकधी वयाची ऐशी उलटलेले लोकही मॅच्युअर्ड नसतात हे मी पाहिलं आहे. आयुष्यात एखाद्या व्यक्तिला कसे अनुभव येतात आणि त्यावर त्याची/तिची रिअ‍ॅक्शन काय असते ह्यावर ते अवलंबून असतं असं माझं मत आहे

बाकी कालच्या एपिसोडमध्ये घना राधाला फोन करतो तेव्हाचा स्वप्नील जोशीचा अभिनय आवडला.

झंपी, "http://www.apalimarathi.com/" इथे बघा. तुम्हाला दरोरोज भाग ही बघायला मिळतील Happy

घना लग्नानंतरच झाला असणार>>> :-D.... तुमच्यासारख्या व्यक्ती 'दररोज साबण' मालिकांचे खरे भांडवल असतात....

सिरियलवाल्यांना माबोची फार काळजी आहे. माबोवर घनाच्या वयावरुन चर्चा होउन नंतर नेहेमीप्रमाणे वादावादी, भांडणे,अपशब्द, शिविगाळ, धागा बंद करणे, कोणाचीतरी मेंबरशिप डिलिट होणे असे होइल असा दुरवरचा विचार केला आहे सिरियलवाल्यांनी. Proud Proud

आज घनाचा वाढदिवस दाखवुन हे देखील स्पष्ट केले की त्याचे वय ३२ आहे. त्यावर चर्चा हि झाली - ३२ की ३४ ! Proud

महागुरु, धन्यवाद. पण त्या देशीतशन वर वायरस यायची भिती असते.

-------------

मी शेवटी तो फेमस नोकरी गेल्याचा भाग तुनळी बघितला.

मुलाखतीत नापास झाल्यावर खुष झालेली आई पहिल्यांदाच पाहिली.. इतका काय त्रास आहे आईला जर मुलाला बाहेर जायची इच्छा असेल तर. काय कळत नाही.
राधा पण कशाला त्याला परत भाव द्यायला जाते कळत नाही.
आई पण त्या घनाच्या रागाचे इतके कौतुकाने बोलते.. लाडावलेला वाटतो हे पात्र(घना) म्हनून असा असेल.

चिंटू बेक्कार....... दिसायला, बोलायला.. जराही नॅचरल नाही. थोराड वाटतो. मिश्किल जराही नाही.
धन्यवाद!

कालच्या एपिसोडमध्ये घना राधाला फोन करतो तेव्हाचा स्वप्नील जोशीचा अभिनय आवडला.>>> अगदी अगदी.

आजचा भाग अगदीच फालतू होता.
पुढच्या भागात काय तर घनाच्या कमरेत लचक. (खरी - खोटी देव जाणे. ते ही घरी बसून बसून )आता पुन्हा एकदा राधा त्याच्या सेवेत. दोघांना जवळ आणण्यासाठी घनालाच का आजारी पाडतात ? फॉर अ चेंज राधालाही जरा आराम द्या कीहो राजवाडे ! बिचारी सासर, माहेर आणि ऑफीस अश्या तिन्ही आघाड्यांवर लढतेय.

आजची प्रश्नावली

१. आज राधा डोळे बंद करून आणि वर घनाकडे पाठ करून बसली होती - त्याची पाठ चुकूनसुध्दा नजरेस पडू नये म्हणून. तिने एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून डोळ्यावर पट्टी का बांधली नाही?

२.पाठीला, तेही स्वतःच्या, हातांनी, तेही स्वतःच्या, क्रीम लावता येतं हा स्वानुभव आहे. मग घनाचे हात मर्त्य मानवापेक्षा आखूड आहेत का पाठ भीम-बकासुर ह्यांच्यापेक्षा जास्त रूंद आहे? किती ते कवतिक! उद्या हा युएसच्या एला गेला असता आणि पाठदुखी झाली असती तर क्रीम लावायला काय श्रीयुत बरॅक ओबामा येणार होते का सौभाग्यवती हिलरी बिल क्लिंटन?

३. राधाला डोळ्याला पट्टी बांधून/डोळे मिटून आणि gloves घालून त्याच्या पाठीला क्रीम लावता आलं नसतं का?

ते क्रीम मुव्ह होतं हे दिसत होतं. आपलं नशीब एव्हढंच की त्याचं प्रॉडक्ट प्लेसमेन्ट केलं नाही. नाहीतर असा संवाद ऐकायला लागला असता.

घनाचे बाबा: काय झालं?
घनाची आई: घनाची पाठ धरलेय.
घनाचे बाबा: अग, मग मुव्ह लाव ना.
घनाची आई: अहो, तेच सांगतेय मी राधाला. मुव्ह लावलं की दुखणं गायब!
घनाचे बाबा: तर काय? मी लहान असताना माझी पाठ धरली की माझी आई मुव्हच लावायची.
घनाच्या बाबांचे बाबा (फोटोतून): काय झालं?
घनाचे बाबा: घनाची पाठ धरलेय.
घनाच्या बाबांचे बाबा (फोटोतून): अरे मग, मुव्ह लाव ना. मी वर जायच्या आधी माझी पाठ धरली की तुझी आई मुव्हच लावायची.

स्वप्नातै Lol

आता पुन्हा एकदा राधा त्याच्या सेवेत. दोघांना जवळ आणण्यासाठी घनालाच का आजारी पाडतात ? >>
घना आयटी मध्ये आहे ना... त्याला आजारपणानंतर डॉक्टरच्या बिलाची रक्कम परत मिळत असेल ना (reimbursement )
म्हणुन त्याला आजारी पाडत असावेत्त.
बहुदा राधाला नसेल मिळतं.
राजवाडे कृपया प्रकाश पाडा.

घना आयटी मध्ये आहे ना... त्याला आजारपणानंतर डॉक्टरच्या बिलाची रक्कम परत मिळत असेल ना (reimbursement ) >>> घना आय टी मध्ये असला तरी नोकरीत नाहीये, सेल्फ एम्प्लॉईड आहे.
काहीही असो. पण आज एका बेडवर आले म्हणजे सिरीयल संपत आल्याची नांदी समजायची काय ?

ऑ? reimbursement फक्त आयटीवाल्यांनाच असते?

बरंय राजवाडे राधाला आजारी पाडत नाहियेत ते. काही वर्षांनी नव्याची नवलाई (आणि मुव्ह लावायचं की नाही ही द्विधा मनःस्थिती) संपली की राधा करवादून घनाला म्हणेल 'देवाला माहित होतं काळेंच्या घरात मला राबायला यायचं आहे म्हणून. अगदी ठणठणीत प्रकृती दिली आहे. एक पैश्याची सुंठ लागली नाही कधी'. Happy

>>पण आज एका बेडवर आले म्हणजे सिरीयल संपत आल्याची नांदी समजायची काय ?

मला वाटतं घना झोपेत कण्हत असेल. म्हणून राधाने त्याला मुव्ह लावलं असेल. आणि मग तिथेच झोपून गेली असेल. हरे रामा! व्हॉट अ मुव्हींग लव्ह स्टोरी Happy

ऑ? reimbursement फक्त आयटीवाल्यांनाच असते?
>>
नाही
आयटीवाल्यांना मिळतो हे पक्कं माहित आहे
आणि राधाला मिळत नसावा हा माझा अंदाज

मला वाटतं घना झोपेत कण्हत असेल. म्हणून राधाने त्याला मुव्ह लावलं असेल. आणि मग तिथेच झोपून गेली असेल. >>>> मलाही तसंच वाट्लं. तसेही ते दोघेही "ह्यासाठी" निमीत्ताला टेकलेलेच असावेत. कारण सघ्या ' माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत ' हा अध्याय चालू आहे.

ते एवढ्या मोठ्या घोड्याचे औक्षण वगैरे केले तेच फार विनोदी. त्यात ती ओवाळते व मग नमस्कार कर म्हणल्यावर ती म्हणते हो कर ना ते मला जाम आवडले.

आतापर्यंत मराठी चित्रपटांत/ मालिकांत नायिकेला इजा व्हायची , मलम चोळायचा आणि मग दोघे जवळ यायचे.
चटकन आठवलेली दोन उदाहरणे म्हणजे पिंजरा आणि अवंतिका (अवंतिकेच्या स्मृतिभ्रंशानंतर). त्याबाबतीत नायकाला इजा झालेली दाखवणारे एलदुगो ही खरेच 'दुसरी' गोष्ट आहे.

अमेरिकेला जाण्याचे प्रयत्न आणि घनाचे वय (आईवडीलांचं लग्न झालेली वर्षे) यांचा हिशेब लागत नाहीये. प्रत्येक भागात राधाचं पुस्तकी बोलणं ऐकून नको झालय. खरंतर आज मालिका बघायला विसरले. नंतर लक्षात आले. Wink जरा संवाद बरे हवेत बुवा! कंटाळा येतो सगळ्या काकांचा बावळटपणा बघून. एवढ्या लोकांचं खटलं चालवायचं म्हणजे संवादही जरा मोठ्या माणसांना शोभतील असे हवेत.

Pages