चिंटूला आणि त्याच्या संवंगड्यांना खट्याळपणा करताना, चेष्टामस्करी करताना आपण नेहमी पाहतो. कधीकधी आपल्या मित्रमंडळींमध्ये किंवा घरी घडलेले संवाद चिंटूच्या मित्रांमध्ये किंवा घरात घडताना दिसतात, तर कधी आपल्या घरी हा प्रसंग घडला असता, तर आपण काय म्हटलं असतं, असा विचार आपण करतो. आणि म्हणूनच 'चिंटू'चं रुपेरी पडद्यावरचं आगमन साजरं करण्यासाठी तुम्हांला मिळते आहे 'चिंटू'चे संवाद लिहिण्याची संधी!
'चिंटू' चित्रपटातलं एक चित्र तुम्हांला दिलं जाईल आणि त्यावर तुम्ही लिहायचाय त्या चित्रातल्या पात्रांमधला चटकदार, खुमासदार संवाद, खास तुमच्या शैलीत! पथ्य फक्त एकच, संवाद लिहिताना जातिवाचक, धार्मिक किंवा कोणालाही दुखावणारं लिखाण टाळायचंय.
१. दिलेल्या चित्राबद्दल त्याच धाग्यावर प्रतिसादात संवाद लिहा.
२. एक आयडी एकापेक्षा जास्त प्रवेशिका देऊ शकतो.
३. विजेत्यांची निवड मतदानाने केली जाईल.
वि. सू. - ही स्पर्धा ’चिंटू’ या व्यक्तिरेखेवर आधारलेली आहे. चिंटूचा खोडकरपणा, त्याची निरागसता, त्याची मित्रमंडळी, त्याचं विश्व या गोष्टी संवादांतून उभ्या राहणं अपेक्षित आहे. चिंटूशी संबंधित नसलेल्या प्रवेशिका, त्यांना कितीही मतं मिळाली असली तरी, ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
या स्पर्धेच्या विजेत्यांना मिळेल 'चिंटू' चित्रपटाच्या गाण्यांची सिडी
चला तर मग... खाली दिलेलं चित्र पाहा, आणि चिंटू त्याच्या आईला काय सांगत असेल, ते लिहा...
![Spardha1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3/chintu01.jpg)
चिंटू: आईबाबा आवडलं ना जेवण?
चिंटू: आईबाबा आवडलं ना जेवण? आजोबांनी सांगितलं की आजच्या दिवशी बाबांनी आईला लग्नाचं विचारलं होतं म्हणून. मग आम्ही दोघांनी तुमचा हा दिवस मज्जेचा करायचं ठरवलं. आजोबांनी संध्याकाळच्या सिनेमाची तिकिटं काढून आणली आणि मी तुमच्याकरता मॅगी आणि चपातीचा बेत केलाय. चपात्या आजोबांनी बनवल्यात हां.
आता अजून काय करतायेत ते स्वैपाकघरात? आजोबा, या ना बाहेर .....
(No subject)
चिंटू: आई बाबा, तुम्हाला एक
चिंटू: आई बाबा, तुम्हाला एक सरप्राईज द्यायचे आहे... आधी जेवण करु मग सांगतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुभा कांदाभजी आणि पोळी खातोय
सुभा कांदाभजी आणि पोळी खातोय असं दिसतंय
मामीला मॅगी कुठे दिसली? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला तर पानात पोळी आणि काहीतरी
मला तर पानात पोळी आणि काहीतरी कुरकुरीत शेव-गाठींपैकी आहे असं वाटतंय.. ते एकत्र कसं खाणार कोण जाणे
तरी असो....
चिंटू : बाबा, आज आईला सुट्टी दिलीये, सकाळच्या पोळ्या होत्या त्याच्याबरोबर खायला हे मी आणलंय. जो कोण आधी संपवेल त्याचा पहिला नंबर, मग त्याला आईने बनवलेला एक स्पेशल खाऊ मिळेल.
बाबा : (मनातल्या मनात) बाप रे!
आई : (हासरा चेहरा ठेऊन पण मनातल्या मनात) स्पेशल खाऊ म्हणजे याने फ्रिजमधलं दुपारीच बनवून ठेवलेलं आइस्क्रिम बघितलेलं दिसतंय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चिंटू: आई बाबा , पानातली भाजी
चिंटू: आई बाबा , पानातली भाजी पोळी नीट संपवलीत तरच माझ्या पुढ्यातला खाऊ शेअर करीन.
आई: चिंटु सुटीत पाक प्रयोग
आई: चिंटु सुटीत पाक प्रयोग करून बघणार आहे. आजचा हा त्याचा पहिला प्रयोग आहे बरं का बाबा!
बाबा: अरे व्वा! आज काय केलंय बरं आमच्या चिंटूने?
चिंटू: ओळखा पाहू! जो आधी फस्त करेल त्याचा पहिला नंबर!
चिंटू : बाबा ! आ़ज मदर डे आहे
चिंटू : बाबा ! आ़ज मदर डे आहे ना! कालच मी टिव्हीवरील सीरीयलमध्ये पाहीले. मग मी आणि आजोबांनी आईला सरप्राईज दयायचे ठरविले. आई बाहेर भाजी आणायला गेली पाहुन मी व आजोबांनी पोळ्या व घट्ट पिठल केल आहे. आईला, ते आवडते. पाहा बघु टेस्ट करुन.
बाबा : (नसत्या उचापती करायला कोण सांगतेय ? कस बनवल आहे कोणास ठाउक !) मनात. व्वा ! झकास बेत दिसतोय.
आई : शाण! माझ बाळ.
चिंटू : मग मीच नंबर वन आहे ना!
आई : हो रे माझ्या राजा. आई साठी एवढ् केलस.
चिंटू : आजोबा आत्ता तरी लवकर याना ! मला भुक लागलीय.
आई : चिंटू तूझा वाढदिवस जवळ
आई : चिंटू तूझा वाढदिवस जवळ आला आहे,काय करायच ह्या वर्षी?
बाबा: सकाळी देवळात जाऊ,मग छानसे कपडे घेऊ आणि मस्त पैकी केक घेऊन घरी येऊ.कशी आहे कल्पना?
चिंटू: आयडीया!!!!!!! ( चुटकी वाजवून ) ह्या वर्षी आपण माझा वाढदिवस अनाथाश्रम मध्ये साजरा करू...आपल्यामुळे छोट्या अनाथ मूलांना १ दिवसाचा का होईना पण खूप आनंद होईल.
आई : किती गुणाचा माझा चिंटू बाळ!!!!!
बाबा : चिंटू मला तूझा खुप अभिमान वाटतो......
चिंटु : आई, एक नंबर आयडीया
चिंटु : आई, एक नंबर आयडीया आहे बाबांची. दुधीभोपळ्यावर शेवयांची खीर फ्री. पडवळावर आमरस फ्री. डेमश्याच्या भाजीवर आईस्क्रीम-मस्तानी फ्री. ठरलं आजपासुन मी भाज्या खाणार.