सुप्तनाते
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना
तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना
तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना
चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना'
किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना
कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------
छान
छान आहे....
छान आहे....
चला वापरा एकदा आणि फेका, हवी
चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
छान व नावीन्यपूर्ण ' मेड इन चायना'
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते मेड इन चायना>>
किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना>> वा वा, सुंदर खयाल
कसा आज रस्ता दिशाभूल झाला, निघाला कुठे अन् कुठे पोचला
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना>> खयाल मस्तच, जरा रस्ता दिशाभूल वगैरे असे खटकले. रस्ता दिशाभूल 'करेल', रस्ता दिशाभूल 'होणार' नाही, माणसाची दिशाभूल होईल
===============================
तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
मला कुस्करावेस मर्जीप्रमाणे, शिरोधार्य आहे तुझी भावना>> पहिली ओळ सुंदर, दुसरी ओळ नुसते एक्स्टेंशनसारखे झाले आहे, सुमंदारमालेत अधिक खुलणारा खयाल आला असता असे वाटले
तुला जाण नाही, मला भान नाही, कसा चालणे सांग संसारगाढा
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, न पेक्षा बर्या मग खुल्या यातना>> पहिल्या ओळीत एक गुरू जास्त झाला असावा
शुभेच्छा
मस्त......
मस्त......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेफिकिरजी, संसारगाडा आणि
बेफिकिरजी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संसारगाडा आणि दिशाभूल या शेरात बदल केलेत. ते जमलेत का?
तुला जाण नाही, मला भान नाही,
तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना>>>>>
चां ग ला शे र
असे सफाईदार आणि (हल्लीच्या) लाईफस्टाईलशी निगडीत शेर वाचायला मिळाले की फार मजा येते
कणखरांचा असच एक शेर आहे की 'ती नेहमीच माझे ऐकून घेते' की असे काहीसे
धन्यवाद
अहा........मस्त ! मेड इन
अहा........मस्त !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेड इन चायना......झकास
जमलेली गझल. मेड इन चायना -
जमलेली गझल.
मेड इन चायना - नावीन्यपूर्ण
जुमानेचना हा शेर सर्वाधिक आवडला.
शुभेच्छा!
आवडली
आवडली
मुटेजी, गझल खास वाटली ! धुरा
मुटेजी,
गझल खास वाटली !
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना
वरील संदर्भ पटला ...
सुंदरेश
सुंदरेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर गझल आहे... मोठा बहर
सुंदर गझल आहे...
मोठा बहर मस्त सांभाळला आहे.. याच बहरातील तुमची 'फुले भीम बापू' आठवली...
'तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना'
तसे सगळी गझल छान...पण वरील शेर अधिक आवडला..
बेफिकिरजी, संसारगाडा आणि
बेफिकिरजी,
संसारगाडा आणि दिशाभूल या शेरापाठोपाठ आता किड्यामाकुड्याच्या शेरातही बदल केला आहे.
तुमचे तीनही आदेश शिरोधार्य मानल्यामुळे शिरोधार्य या शब्दाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिरोधार्य या शब्दाला सदर शेरातून डच्चू देण्यात आला आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सबब आता तुमच्या कडून पार्टी घ्यायला मला आणि द्यायला तुम्हाला..... हरकत नसावी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सबब आता तुमच्या कडून पार्टी
सबब आता तुमच्या कडून पार्टी घ्यायला मला आणि द्यायला तुम्हाला..... हरकत नसावी>>>>>
अवश्य, आज पुण्यात असलात तर आजच माझ्यातर्फे पार्टी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवश्य, आज पुण्यात असलात तर
अवश्य, आज पुण्यात असलात तर आजच माझ्यातर्फे पार्टी
मी पुण्यावरून १३ मे लाच परतलो याची खातरजमा केल्यानंतरच ऑफर देताय ना ही?
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ठिक वाटली. २-३ शेर कळले
ठिक वाटली.
२-३ शेर कळले नाहीत.
चांगली गझल!!! मोठ्या बहराबाबत
चांगली गझल!!!
मोठ्या बहराबाबत - दोन्ही ओळी वाचून/ऐकून अर्थापर्यंत जायला जो वेळ जातो त्यामुळे गझल पाहिजे तसा परिणाम साधत नाही असे मला वाटते...
शाम ह्यांनी चांगला मुद्दा
शाम ह्यांनी चांगला मुद्दा मांडलेला आहे.
मी जे शिकलो ते असे की, आपला खयाल मांडण्यासाठी खरोखरच इतक्या मोठ्या वृत्ताची गरज आहे का हे प्रत्येक गझलकाराने तपासले पाहिजे.
दोघांनाही पर्वा नाही संसार कुठे भरकटला
दोघे झालो दोन दिशांना कुणी कुणाचे ऐकेना
संसारगाडा ह्या शेराचाच आशय असलेला असा एक अजून छोट्या वृत्तातला शेर होऊ शकतो असे जाणवले. अशा गोष्टींवर निरंतर विचार केला तरच गोटीबंदता साधली जाऊ शकते असे वाटले.
आंतरजालावर डॉ. अनंत ढवळे, डॉ. समीर चव्हाण आणि वैभव देशमुख ह्या गझलकारांचे शेर छोट्या वृत्तात पण मोठ्या ताकदीचे असतात असे वैयक्तिक मत.
अर्थात मला हे अजून जमलेलेच नाही ह्याची नम्र जाणीव आहे परंतू विचार करण्यासारखा मुद्दा असल्याने मांडला इतकेच!
गैरसमज नसावा मुटेजी.
धन्यवाद!
मस्त आवडली
मस्त आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुटे सर छान आहे ही गझल खूप
मुटे सर छान आहे ही गझल खूप खूप आवड्ली
काहे प्रतिसादही विचार करायला लावणारे आहेत .......... त्या प्रतिसादकान्चे आभार
सर्वांचे मनपूर्वक आभार. एक
सर्वांचे मनपूर्वक आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक विनंती :
मतला फसला असे मला स्पष्टपणे जाणवत आहे.
मतला का फसला या विषयी कुणी आपले मत नोंदवले तर मला आवडेल.
किंवा
जर पर्यायी मतला सुचवला तर त्यातून मला काही शिकायला मिळेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मतला फसला असे मला स्पष्टपणे
मतला फसला असे मला स्पष्टपणे जाणवत आहे.
मतला का फसला या विषयी कुणी आपले मत नोंदवले तर मला आवडेल.
>>
आता तुम्हालाच फसल्यासारखा जाणवत आहे तर रसिक बापुडे काय म्हणणार?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण मला व्यक्तीशः काही अगदीच फसल्यासारखा नाही वाटला, मात्र पहिल्या ओळीचे नुसतेच एलॅबोरेशन दुसर्या ओळीत आल्यासारखे वाटले हे खरे
(अवांतर- बाकी सुमंदारमाला आणि आनंदकंदावरचा लोभ थोडा कमी करून इतरही वजनांना प्रवेश द्या की? )
दिवा व हलके घ्या
किंवा जर पर्यायी मतला सुचवला
किंवा
जर पर्यायी मतला सुचवला तर त्यातून मला काही शिकायला मिळेल>>
तुमचा प्रॉब्लेम आत्ता समजला, सर्व शायरांच्या गझलेवर पर्याय येत असताना माझ्याच का नाही असा काहीसा
दिवे घ्या, केवळ गंमतीने म्हणतोय
पण तरी प्रोफेसर साहेबांना एकदा विचारा, कदाचित चांगली चर्चा होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< सुमंदारमाला आणि
<< सुमंदारमाला आणि आनंदकंदावरचा लोभ थोडा कमी करून इतरही वजनांना प्रवेश द्या की? >>
आदेश शिरसावंद्य. लवकरच नव्या छोट्या/मध्यम पॅकिंगमध्ये माल घेऊन येतोय. वाचायला तयार रहा.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आधी सख्य नाही असे म्हटले आहे
आधी सख्य नाही असे म्हटले आहे मग ते सुप्तनाते आहे असे म्हटले आहे .............
तू खुलासा (करून )मला सांग ना .................करून हा शब्द ओळीत व्यक्त झाला नाहीय ...............
कदाचित ही दोन कारणे असू शकतात सर...............
तुझे आणि माझे अधी सख्य नव्हते अता ओढ का वाटते या मना
कधी जन्मले हे असे सुप्तनाते खुलासा करुन तू मला सांगना
चुभूदेघे !!!
<<तुमचा प्रॉब्लेम आत्ता
<<तुमचा प्रॉब्लेम आत्ता समजला, सर्व शायरांच्या गझलेवर पर्याय येत असताना माझ्याच का नाही असा काहीसा>>>
छ्या. हा माझा प्रॉब्लेम कसा?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्व्तःला ग्रेट समजणारे अनेक गझलकार माझ्या गझलांना शिवायला कचरतात, हा माझा दोन वर्षातला अनुभव आहे. का कचरतात हा त्यांचा प्रॉब्लेम आहे; माझा नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<स्व्तःला ग्रेट समजणारे
<<<स्व्तःला ग्रेट समजणारे अनेक गझलकार माझ्या गझलांना शिवायला कचरतात, हा माझा दोन वर्षातला अनुभव आहे. का कचरतात हा त्यांचा प्रॉब्लेम आहे; माझा नाही. >>>
ती गझल न वाटल्याने कचरत असावेत![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
<<<< ती गझल न वाटल्याने कचरत
<<<< ती गझल न वाटल्याने कचरत असावेत >>>>
हो हो. नक्कीच.
दुसर्याला हीन लेखल्याशिवाय स्वतःचे ग्रेटपण उठून दिसत नाही, असा ज्यांचा ठाम समज असतो, त्यांचा हा प्रॉब्लेम असतोच.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(असे मी म्हणत नाही. असे प्रसिद्ध तत्ववेत्ते झुल्फिकार अली सांगून गेलेय. :))
(No subject)
प्रा. देवपूरकर, मी तुमचा
प्रा. देवपूरकर,
मी तुमचा प्रतिसाद पाहिला पण वाचला नाही.
कृपया आपण हा प्रतिसाद संपादित करून डिलीट करावा. तुमचे जे म्हणणे आहे ते मला मायबोलीवर विपूत लिहा किंवा
ranmewa@gmail.com
या विरोपावर मेल करा. असे केल्यास मला तुमच्याकडून बरेच शिकता येईल आणि तुम्हालाही शिकवता येईल.
भविष्यात मला त्याचा फायदाही होईल.
मी तुमचा येथील हा प्रदिर्घ पर्याय अजिबात वाचणार नाही.... म्हणजे वाचणार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
---------------
मी जे लिहिले ती माझी अनुभूती आहे, अभिव्यक्ती आहे, अभिजात आहे.
ते बोबडे बोल आहेत पण; माझे आहेत.
त्यामूळे तुम्ही माझ्या रचनेचे फक्त धिंडवडे उडवू शकता. माझी अनुभूती माझी असल्याने त्याला चार चांद लावण्याची पात्रता कोणाचीच असू शकत नाही.
---------------
Pages