एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम +१

पूनम + १
काल ईला भाटे बरोबरच्या प्रसंगात तर फारच भारी अ‍ॅक्टिंग होती मुक्ताची.

कालचं घानचं वागणं हे एका टिपीकल फ्रस्ट्रेटेड लूजर चं वागणं वाटलं.
ईला भाटे छान.
अतिशयोक्ती वाटेल, पण माझ्या साबा काहीश अशाच आहेत. म्हणजे स्वयंपाक करताना माझा होणारा वेंधळेपणा/ उरक कमी असणं, नाती जपताना करावी लागणारी कसरत....अनेको गोष्टीत त्या मला समजून घेतात. वेळ आली तर हक्काने रागावतात, पण त्यांच्याशी बोलताना सासू म्हणून फीलिंग कधीच येत नाही मला.
काही सवयी आम्हाला एकमेकींच्या पटत/ आवडत नाहीत, पण त्याला सासू-सून असा रंग येत नाही कधीच. मला नोकरी शोधायची होती तेव्हा त्यांनीपण खूप जाहिराती पेपरात शोधल्या होत्या!

अतिशयोक्ती वाटेल, पण माझ्या साबा काहीश अशाच आहेत. म्हणजे स्वयंपाक करताना माझा होणारा वेंधळेपणा/ उरक कमी असणं, नाती जपताना करावी लागणारी कसरत....अनेको गोष्टीत त्या मला समजून घेतात. वेळ आली तर हक्काने रागावतात, पण त्यांच्याशी बोलताना सासू म्हणून फीलिंग कधीच येत नाही मला. >>>> माझीही सासु अशीच.. खुप बरं वाटत.. आणि ते ढॅण ढॅण करणार पार्श्वसंगीत नाही, कुणाची उगाचच कुरापत काढणं नाही.. या आणि अशाच अनेक गोष्टींसाठी मला ही मालिका आवडते.. खुप प्रॅक्टिकल आहे.. जे काही दाखवताएत ते इतर कुणाच्याही घरात होउ शकतं..

पौर्णिमा, अनुमोदन Happy

<< मलाही नाही आवडला हा चिंटू

खरंय Sad . काल स्टार माझावर शुभंकर अत्रेची मुलाखत पाहिली, कित्ती मस्त मुलगा आहे. पण त्या विगने अगदीच विचित्र दिसतोय तो Sad . मुलांना सिनेमा बघताना मात्र तो विग एव्हढा विचित्र वाटला नसेल :).

त्यांनी आवर्जून घनाला, म्हणजेच मालिकेच्या हीरोला एक नॉर्मल माणसासारखं दाखवलं हेच आधी कौतुकास्पद.

येस +१
घनाच्या बाजुने विचार केला तर मला असेही वाटते की त्याला जर एवढी पॅशन होती तर त्याच्या आईबाबांनीही ते समजुन घ्यायला हवे होते. कदाचित त्यांच्या या नकारात्मक वागणुकीमुळेही त्याला कदाचित संधी मिळाल्यावर तो संभ्रमात अडकुन संधी गेली असावी. अर्थात मालिकेत तो फेल होतोय हेच दाखवलेय, संधीपर्यंत पोचुन मग तो हो/नाही करत अडकला आणि संधी हुकली हे दाखवले नाहीय.

पाखरांना पंख फुटल्यावर त्यांनी त्या पंखांचा उपयोगही करायला हवा हे पालकांनी समजुन घ्यायला हवे. आणि त्या पाखरांनी खुप दुर जायचे ठरवले तर ते स्विकारायलाही हवे. केवळ आपल्याला मुले कायम घरात हवीत म्हणुन त्यांना बाहेर जायला अडवायचे आणि वर 'तो असाच आहे, चिडचिडा इ.इ.' हे म्हणणे योग्य नाही, चिडचिडे का होतात हा विचारही करा एकदा.

राधा-आईचा प्रसंगही खुप छान होता, आईने किती सुंदररित्या राधाचा मुड ठिक केला. आणि हे सगळे ती मनापासुन करतेय हेही दिसत होते अभिनयातुन.

पूनम+१.
राखुडे लक्की गल्स बाई तुम्ही Happy
आयेम जेलस टू! बाकी कालचा राधा आणि सासू मधला संवाद ऐकून-पाहून खरच असं वाटल की आपल्यालाही अशीच सासू हवी होती. बट अपना तो ब्याडलक भी खराब हय Proud

हैद्राबादच्या नावाखाली जीम जॉईन करायला गेलेला का हा? Uhoh
तो काल म्हणाला की जाडीवरुन टोमणे मारु नकोस म्हणुन.:हाहा: कित्ती तो गेम खेळत असतो नै, आनंदी असला आणि दु:खी असला तरीही. बरय स्ट्रेस रिलिफ Happy
पण जरा रंगत येतीये आता. सगळे संवाद ओढुन ताणुन आणल्यासारखे वाटत नाहियेत आता. अगदी नॅचरल.
त्याच्या नसत्या आकांडतांदवावर मुक्ताने गप्प बसणं मला नाही आवडल. तिला आई नाहिये म्हणुन तिने त्याच्या आईबद्दल त्याला काहीही बोलायचा अधिकार नाही हे त्याचे अनुमान तर हास्यास्पद होते. Sad
पण नंतरचा सासु-सुनेतला संवाद मात्र छानच. असा निखळ संवाद ज्यांच्याघरी होत असेल ते खरच भाग्यवान. अन्यथा मुलाचीच री ओढणार्‍या माताच जास्ती असतात प्रत्यक्षात.

शुकु+१

मालिका खूप सिम्पल वाटतेय..

म्हणूनच आवडतेय.. जास्त टेक्निकल चुका कशाला काढाव्यात ?

पशा (म्हणजे मीच ) म्हणे उगी राहावे , जे जे दाखवतील ते ते पाहावे

घनाला बिचार्‍याला लगेच लूझर, नोकरीत सेटल नसलेला वगैरे नका ग म्हणू.. ईथली नोकरी चांगली असेल त्याची पण अमेरिकेची संधी चुकत असेल सारखी Happy
आणि खरच आहे त्याचा पॅशन अमेरिकेला जाण्याची तर काय चूक आहे त्यात..१० वर्षापूर्वी खरेतर आतासुध्धा किती तरी जणांची तीव्र इच्छा किंवा गोलच असते अमेरिकेत जाउन सेटल होण्याचे..
तो काही अगदिच काहितरी नवीन गोष्ट करत नाहिये.. आणि जर ते काही कारणाने वारंवार हातचे सुटत असेल तर चिडचिड होणारच..फक्त ती व्यक्त करायची पद्धत चुकली.. पण शेवटी मालिका आहे ..आणि त्यालाही तो राधाच्या प्रेमात पडलाय हे कळायला काहितरी त्याचे चुकायला पाहिजेच ना Happy

मालिकांमध्ये एक तर काळी नाहीतर गोरीच पात्र असतात. त्यांनी आवर्जून घनाला, म्हणजेच मालिकेच्या हीरोला एक नॉर्मल माणसासारखं दाखवलं हेच आधी कौतुकास्पद. >> +१००

आयेम जेलस टू! बाकी कालचा राधा आणि सासू मधला संवाद ऐकून-पाहून खरच असं वाटल की आपल्यालाही अशीच सासू हवी होती. बट अपना तो ब्याडलक भी खराब हय >>>>>> +१
राधाचा व सासूचा संवाद चालू असताना माझ्यापण डोळ्यांना धारा लागल्या होत्या, नॉरमली अस कधीच होत नाही त्यामुळे डोळ्यातल पाणी कसं लपवाव तेच समजेना Sad

>>>राधाचा व सासूचा संवाद चालू असताना माझ्यापण डोळ्यांना धारा लागल्या होत्या, >>>
माझ्या पण. आणि सासूच्या बाबतीत मी पण एक भाग्यवान आहे. Happy
माझ्या सासूबाई पण खूप प्रेमळ आणि खरच चांगल्या आहेत.

चिंटू मुळीच नाही आवडला. चिंटूच्या टिम बद्दल पण हेच मत. तिकडे त्या बाफ वर सविस्तर लिहिते.

चिंटु मलाही नाही आवडला...
भाताने चिकटवलेली केसांची बट वगैरे अपिअरन्स अगदीच अर्टिफिशिअल Proud
कार्टुन मधला चिंटु कसा खोडकर्-मिष्किल् दिसतो तसा नाही वाटला.

बाकी स्वप्नील च्या अमेरिका पॅशन डॉयलॉग्ज मुळे सिरिअल मधे मधे फार फन्नी होते.. आई बाबा तरी काय असे दाखवलेत मुलाच्या प्रोग्रेस विरुध्द Uhoh
जाउ दे, पण इला भाटे मुळीच आवडत नव्हती ती या सिरिअल मधल्या काही एपिसोड्स पासून चांगली वाटतेय चक्क, चांगलं करतेय अ‍ॅक्टिंग सध्या.

प्रज्ञा९ आणि राखीदि माझी आई आणि वाहिनी ह्या दोघींचं नात सुधा अगदी राधा आणि तिच्या सासुबाईन सारखच आहे अगदी द्रूष्ट लागण्या सारख. एरवी मला महिन्यातून एक दोन वेळा फोन करणारी माझी वाहिनी फार लब्बाड आहे........ आई आली माझ्या कडे की हिचे रोजचे फोन सुरु होतात. काय चालू असते त्या दोघींचं खुसुर फुसुर ते त्यांनाच माहीत. वाहिनीच चालू असत......"Mother लवकर ये ना. मला कंटाळा येतो आहे. संध्याकाळी ऑफिस नंतर घरी यायलाच नको वाटत"......वगेरे वगेरे. त्या दोघींच्या गट्टी मुळे त्या भांडल्या तरी एका दिवसा पेक्षा जास्त दिवस त्या एकमेकींपासून दूर नाही राहू शकत.

मला ही मालिका त्या घरातील नाते संबंधान मुळे आवडते. सासू सूनेच नात. सुनेचा सासऱ्यान बरोबर असलेला मुक्त संवाद. सूनेच घरातील बच्चे मंडळींबरोबर असलेला खेळकर संवाद. नणंद आणि वाहिनीच मैत्रीच नात. सतत नवीन सुनेच्या मागेपुढे असणाऱ्या मदत करणाऱ्या काकू सासूबाई. घरात सगळ्यात वयाने मोठ्या पण तेवढ्याच मिश्कील आणि उत्साही आजी सासूबाई. कस सगळ अगदी स्वप्नांतल्या सारख............

खर सांगू का.........अग टोकूरिका, विनार्च, धनश्री आणि शुभांगीदी लीसन न.........आपल्याला जी गोष्ट जे प्रेंम मिळत नाही न त्याचीच ओढ आपल्याला जास्त असते.

आई बाबा तरी काय असे दाखवलेत मुलाच्या प्रोग्रेस विरुध्द >>>>>> हो नं ...मला पण सेम असंच वाटतं.

पाखरांना पंख फुटल्यावर त्यांनी त्या पंखांचा उपयोगही करायला हवा हे पालकांनी समजुन घ्यायला हवे. आणि त्या पाखरांनी खुप दुर जायचे ठरवले तर ते स्विकारायलाही हवे. केवळ आपल्याला मुले कायम घरात हवीत म्हणुन त्यांना बाहेर जायला अडवायचे आणि वर 'तो असाच आहे, चिडचिडा इ.इ.' हे म्हणणे योग्य नाही.. >>>>> अनुमोदन !

<पाखरांना पंख फुटल्यावर त्यांनी त्या पंखांचा उपयोगही करायला हवा हे पालकांनी समजुन घ्यायला हवे<> आपल्या पंखांत किती दम आहे हे पाखरालाही कळायला नको का? पंधरा वर्षांनंतर तरी? लांबचा पल्ला गाठायची कुवत नाही म्हणून घरट्यात बसून कुढत रहायचं आणि इतरांना चोची मारायच्या यापेक्षा पंखांत जितकी ताकद आहे तितके अभाळ कवेत घ्यायचा प्रयत्न करावा. बरं, सारखे गेम्स खेळून पंखातली ताकद कशी वाढेल? सॉफ्टवेअर इंजिनियरिंग ही पॅशन असेल तर असं पाखरू सतत त्याचा अभ्यास करताना, नवीन काही करून बघताना दिसेल. गेम खेळण्याऐवजी गेम स्वतः डेव्हलप करेल.
म्हणूनच आमचं पाखरू गुड फॉर नथिंग, लुजर. मालिकेचा नायक असा दाखविण्याचे धाडस दाखविल्याबद्दल एलदुगोच्या चमुचे अभिनंदन. असा नायक साकार करणार्‍या स्वप्नील जोशीचेही अभिनंदन.

आपल्या पंखांत किती दम आहे हे पाखरालाही कळायला नको का? पंधरा वर्षांनंतर तरी? लांबचा पल्ला गाठायची कुवत नाही म्हणून घरट्यात बसून कुढत रहायचं आणि इतरांना चोची मारायच्या यापेक्षा पंखांत जितकी ताकद आहे तितके अभाळ कवेत घ्यायचा प्रयत्न करावा. >>> +१

आणी जर घना ३० + वयाचा असेल (म्हणजे १५ वर्षाच्या हिशोबाने असायला हवा) तर त्याला हि maturity असलेली दाखवायला हवी होती. घनाचे जे dialogues होते ते टिपिकल टीन एजच्या वयाच्या मुलांचे dialogues असतात.

म्हणूनच आमचं पाखरू गुड फॉर नथिंग, लुजर. मालिकेचा नायक असा दाखविण्याचे धाडस दाखविल्याबद्दल एलदुगोच्या चमुचे अभिनंदन

हेही बरोबरच आहे.. इंटरव्युमध्ये फेल झाल्यावर आपले काय चुकले हे पाहण्याऐवजी तो परत मोबाईल गेम खेळत बसलाय. आता घरच्यानी वर्गणी काढुन त्याला चार दिवसांची अमेरीकावारी घडवावी म्हणजे त्यालाही बरे वाटेल आणि आईबाबांची तो तिथेच राहिल ही भितीही नाहिशी होईल.

कुठ बघ्ता ही सिरियल ? मला एक दोन वेळा तुनळी वर मिळाले ते बघितले मग सलग मिळत न्हवते नाद सोडला.

अमेरीकेतील लोकं कुठली लिंक बघता?

Pages