मसुर - एक ते दिड वाटी (साधारण २०० ग्रॅम)
कांदे - २ मध्यम आकाराचे
टोमॅटो - २
लसुण - १० / १२ पाकळ्या
गरम मसाला - १ चमचा (टेबल्स्पुन)
लाल तिखट - १ चमचा (टेबल्स्पुन)
कश्मिरी लाल तिखट - १/२ चमचा (जास्त झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही कारण हे फार तिखट नसतेच)
मीठ - चवीप्रमाणे
जीरे - फोडणीसाठी
तेल
कोथींबीर
मसुर ३ ते ४ तास साधारण कोमट पाण्यात भिजत ठेवावी. (यामुळे शिजण्याचा वेळ वाचतो.)
कांदा, टोमॅटो, बारीक चिरुन घ्या.
लसुन ठेचुन घ्या.
कढईत तेल तापवुन त्यात जीरे, लसुन आणि कांदा घाला.
कांदा शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतुन घ्या.
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
टोमॅटो शिजत आला की मसुर घाला व नीट परतुन घ्या.
नंतर लाल तिखट, कश्मिरी तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथींबीर घाला.
तीन वाटी पाणी (मसुरच्या दुप्पट) घालुन मसुर शिजायला ठेवुन द्या.
मसुर शिजल्यावर सर्विंग बाउल (की बोल ) मधे काढुन कोथींबीर (आणि असल्यास क्रीम) ने सजवा.
आवडत असल्यास यात मसुर शिजवताना १ चमचा दही पण घालु शकतो, पण टोमॅटोचा आंबटपणा असल्याने जास्त दही नको.
चिऊ , ही रेसिपी प्लीज
चिऊ , ही रेसिपी प्लीज सार्वजनिक करशील का? फक्त ग्रूप सभासदांसाठी असल्यावर सर्चमध्ये सापडत नाही .
मस्त!!! मी अशा पद्धतीने पण
मस्त!!! मी अशा पद्धतीने पण टोमॅटो न घालता मूग, मटकि आणि चवळी करते. तेही छान लागते.
चिऊ , ही रेसिपी प्लीज
चिऊ , ही रेसिपी प्लीज सार्वजनिक करशील का? फक्त ग्रूप सभासदांसाठी असल्यावर सर्चमध्ये सापडत नाही .>> सार्वजनिक कशी करायची? प्लिज कोणी तरी सांगा.
चिऊ, तू लिहिलेली मुळा पाककृती
चिऊ, तू लिहिलेली मुळा पाककृती संपादीत कर. खाली माऊसने स्क्रोल करत जा शेवटपर्यंत. तिथे तुला 'सावर्जनिक' करता येईल इथे ही रेसेपी.
केली. धन्यवाद बी.
केली.
धन्यवाद बी.
Pages