आयुष रिसॉर्ट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 May, 2012 - 02:08

मागिल गुरुवारी कंटाळा आला म्हणून ऑफिसला दांडी मारली. मिस्टरांना वेळ होता तसेच मुलीला, भाचे कंपनीला सुट्टी पडलेली. मग दिवस सार्थकी लावू म्हणून कुठेतरी फिरायला जायचा बेत आखत होतो. बेत करता करताच १ वाजला. रोज रोज आसपासची स्विमिंग पुल आणि गार्डन पाहून मुले कंटाळली होती मग म्हटल चला आज पनवेलला जाऊया आयुष रिसॉर्टला.

जेऊन निघता निघता ३ वाजले. गाडी घेतली आणि बच्चे कंपनी सकट आमची स्वारी आयुष रिसॉर्ट कडे वळली. गेट मधून आत गेलो. गुरुवार असल्याने गर्दी आजीबात नव्हती हे पाहून अजून समाधान झाल. मिस्टरांनी जाऊन आधी तिथले चार्जेस भरले. तस ते महागडच आहे. मला वाटत लहान मुलांचे २०० आणि मोठ्यांचे ३०० असा त्यांचा चार्ज आहे. त्या पैशात स्विमींग, आत फिरणे, पक्षी, प्राणि पहाणे हे होते. पण नाश्ता वगैरे लागला तर तो स्वतःच घ्यायचा होता वेगळे पैसे भरून. खरे तर लोकल रिसॉर्टला गेलो असतो तर आम्हाला फक्त स्विमींगचेच पैसे भरावे लागले असते त्यामुळे जरा खर्चिकच झाले हे पण तिथल्या निसर्गाने ही रक्कम भरून काढली. जर सकाळ पासून ह्या आयुष रिसॉर्ट मध्ये गेलो तर १००० रु. बुकींग करून नाश्ता, जेवण वगैरेची सोय होते.

बुकींग होताच मिस्टर, मुलेस्विमींगला पळाली. मी थोडावेळ बसले आणि कॅमेरा घेऊन फेरफटका मारायला गेले. तब्बल एक तास चालून खालील फोटो पटापट काढले.

१) हा आहे रिसॉर्ट मध्ये एन्ट्री केल्यावरचा निसर्गपुर्ण मार्ग.

२) इथून आत गेल्यावर बुकींग होते.

३) स्विमींग पुल अजिबात खोल नाही. ६-७ वर्षाच्या मुलांनाही चालू शकेल.

४) आतील पाणी स्वच्छ होते शिवाय आजुबाजूला झाडे असल्याने दुपारी चांगली सावली होती.

५) स्विमींग पुलच्या आधी मुलांच्या मनोरंजनासाठी छोटे गार्डन आहे.

६) चेंजींग रुम्स.

७) इथले सगले झोपाळे टायरपासुन बनवलेले आहेत.

८) मगर (खोटी)

९) साप

१०) स्विमींग पुलच्या पाठी एक ग्राऊंड आहे. त्याची ही एन्ट्री.

११) मैदानाभोवती असणारी कलाकुसर.

१२)

१३) बाजूला मचाण आहे.

१४) आवारात असणार्‍या छोट्या रुम्स.

१५) लाकडी पुल

आतील देखावे
१६) स्विमींग पुल जवळील

१७) बोट हाऊस. ह्यात पाणी नाही.

१८)

आता जरा आतील वृक्ष संपदा पाहू. आत पुष्कळ प्रकारची झाडे आहेत.

१९) बहावा.

२०) सीता अशोकची भरपूर झाडे आहेत.

२१)

२२) स्पॅथेडीया

२३) पिंक शॉवर ट्री

२४) तामण

२५) पांढरा तामण

२६) घायपात

२७) नोनी

२८)

२९) गुलमोहोर

३०) पितमोहोर

३१) भोकरे

३२) उंबर

३३) आपटा

३४) बांबू

३५) हे वडासारखे झाड नांदरुख

३६) त्याच्या पारंब्या

३७) कर्टन क्रिपर

३८) ही फळे कसली कोणाला माहीत आहेत का ? असतील तर प्लिज सांगा.

३९) झाडाची पाने

४०) ह्याचे नाव माहीत नाही.

आता प्राणी आणि पक्षी पाहू.

४१) रशियन माकड. ह्याचा पिंजरा खुप छोटा आहे आणि जाळीदारही.

४२) येथे ६-७ मोर आहेत.

४३)

४४) Blue yellow macaw

४५) अफ्रिकन काकाकुआ

४६)

४७) टर्की

४८) सारस

४९) इमू

५०)

५१) white deer

५२) हरण

५३) पोपट

५४) कोंबडा

५५) एका ठिकाणी नारळाच्या झाडांमध्येच गच्ची बांधली आहे.

५६) छोटूकल घर.

५७) कुंड्यांचे दगडी चाक.

५८) रिसॉर्टच्या एका बाजूला मोठा महाल आहे. बहुतेक फायबरचा आहे. तिथे शुटींग तसेच समारंभ साजरे केले जातात.

वरील पैकी माहीत नसलेली बरीचशी नावे नि.ग. च्या निसर्गप्रेमींकडून साभार.

आयुष रिसॉर्टचा पत्ता:
Mumbai-Pune National Highway, (NH4)
Between Amol & raigad Petrol Pump, Village Shedung,
Panvel, Raigad 0 410 206, Maharashtra, India.
Tel : 02143 - 239185/86/87/88

जायचे असेल तर आधी फोन करुनच जा म्हणजे तिथले रेट, बुकींग, गर्दी ह्याबद्दल चौकशी करता येईल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागु,

धन्स, घरी बसल्या बसल्या फिरवुन आणलस. आमची आजची सुट्टी (Week End) कारणी लागली,

Vivek

दिनेशदा धन्स. दुरुस्ती केली.

मोनाली, म्हमईकर, बेफिकीर, अश्विनी, विवेक, झकासराव धन्यवाद.

वॉव.. मस्त जागु.. त्या फुटब्रिज वरचा कठडा कलापूर्ण आहे अगदी.. Happy
पशुपक्षी,झाडं ही छान
तुझी अबोली ही आहेच की

अरे हे तर माझ्या पासून अगदी १ ते १.५ किमी अंतरावर आहे...
फोटो आणि वर्णन मस्तच....
एखादा दिवस मि ही नक्की सार्थकी लावेन ...........

जागु,वर्णन छान्च!
पिंक शॉवर ट्री बघण्यासाठी जावेच लागेल. आणि लेकीचे आवडते मोरपण आहेतच.
सो लवकरच व्हिजीट आयुष रिसॉर्ट.

छान आहे रिसॉर्ट. वन डे ट्रीप छान होईल.
जेवण आणि नाष्टा कसं आहे चवीला? आमच्या कडे कुठं जायच म्हटल की ग्रुप मधल्या सगळ्यांचा हाच प्रश्न असतो. नॉनव्हेज आहे का?

Pages