म्युझिक सिस्टिम कुठली घ्यावी?

Submitted by योकु on 14 May, 2012 - 04:20

म्युझिक सिस्टिम कुठली घ्यावी? कृपया सुचवा. २.१ सिस्टिम चालेल. टिवी ला कनेक्ट होणारी. मी बोस कंपनीची पाहीलिय पण ती माझ्या बजेट बाहेर वाटतेय. बोस स्टोर मधे प्राईस आहे ४२०००/- !!!
कोणी वापरलीय का? मी असं पाहीलय की यूएस मधे स्वस्त आहेत. हे खर आहे का? बोस स्टोर शिवाय मुंबईत कुठे मिळू शकेल?
मला त्या डिवाईस कडून अतिशय उत्तम दर्जाच्या आवाजाची अपेक्शा आहे. जास्त पीएमपीओ, वॅटस... धाड धूडुम आवाज वगरे नको.

In short, the system must give THE BEST sound with the minimum audible volume!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोस च्या क्वालीटीच्या मानाने किमती खुपच जास्त असतात. तितक्याच किमतित इतर चांगले ब्रँड बाजारत उप्लब्ध आहेत ते ट्राय करा.

कुठ्ल्याही म्युझिक सिस्टीम चे दोन मुख्य भाग असतात.

१) ऑडीओ/व्हिडीओ रीसीव्हर - जो आवाज प्रोसेस करतो (अ‍ॅम्पलीफिकेशन/ ट्युनींग वगैरे)
२) स्पिकर - जे आवज प्रोड्युस करतात.

तुमच्या गरजे प्रमाणे तुम्ही हे भाग वेगवेगळे विकत घेऊन एकत्र केल्यास एक चांगली म्युझिक सिस्टीम तयार करु शकता. अर्थात ते एक दुसर्‍याला पुरक असले पाहिजेत.

मी खालील भाग सजेस्ट करीन

१) ऑडीओ/व्हिडीओ रीसीव्हर - Onkyo TX-SR313
http://www.intl.onkyo.com/products/av_components/av_receivers/tx-sr313/i...

२) स्पिकर - Klipsch HD Theater 500 Home Theater System
http://www.klipsch.com/high-definition-theater-500-home-theater-system

योगेश अतिशय उत्तम दर्जाच्या आवाजासाठी ५.१ का नाही बघत आहात? व्यवस्थित स्पिकर लावले तर अफलातुन इफेक्ट येतो. माझ्याकडे यामाहाची एक होती आधी लावलेली. इथे सोनीच्याही चांगल्या वाटल्या होत्या. जाऊन आवाज ऐकला नाही अजुन.

मधे प्राईस आहे ४२०००/- >>>>>>>>>>. सोनी ची घ्या........... छान आहे..माझ्या कडे आहे .. आवाज दणादणीत आहेत... ३५०००/- पर्यंत आहे

फिलिप्सच्या सिस्टीम्स पण चांगल्या आहेत... किमतीच्या दृष्टीने बहुतेक टॉप ब्रँडस मध्ये सगळ्यात कमी किमतीत मिळतील.. सोनी त्यांच्या व्हिडिओ साठी जास्त प्रसिद्ध आहे..

ऑडिओ मध्ये नंबर एक बोस आहे...

तुम्ही सिस्टीमचा उपयोग कशासाठी करणार आहात त्यावर कुठली घ्यायची ते ठरेल..

कुठल्याही दुकानात गेलात की तिथे मोठ्ठा आवाज करूनच ऐकवतात.. त्यापेक्षा आपल्याला ज्या आवाजात ऐकायला आवडते त्या आवाजात ऐकायचे... तसेच बास अजिबात वाढवू द्यायचा नाही.. उगाच ढुम ढुम ऐकवत बसतात...

integrated system बघताय का?

बोसची integrated system (म्हणजे सिडी प्लेअर, अ‍ॅम्प्लि. आणि स्पिकर हे सगळे असलेली) ४२००० असेल आणि तुमचे बजेट असेल तर नक्कीच विचार करा.

आवाजातील सुस्पष्टता हवी असेल तर सोनीवर फुली मारा. त्यांचा नुसताच दणदणीत आवाज असतो पण सुस्पष्ट नसतो.

नाहीतर चांगला amplifier, स्पिकर आणि सिडी प्लेअर हे वेगवेगळे निवडलेले बरे. थोडे कष्ट पडतील आणि बजेटही वाढेल पण integrated system आणि असे कॉम्पोनन्ट यांच्या आवाजात जमीन आस्मानाचा फरक असतो.

amplifier / receiver - kenwood, yamaha

speakers - JBL, Bose

बोस ओव्हरहाईप्ड आहे. भारतीय बानवटिच्या सिस्ट्म मधे ( अ‍ॅम्प्+स्पिकर) सोनोडाईन बघा
http://www.sonodyne.com/

पॅन्डम चे स्पिकर्स उत्तम आहेत , ते yamaha / norge च्या अ‍ॅम्प बरोबर वापरले तर थोडे स्वस्तात पड्ते. http://www.pandamaudio.com/ पॅन्ड्म चे माहिमला डेमो रुम्/शोरुम आहे

टेलोम चे प्रॉड्क्ट सुद्धा उत्तम आहेत
http://www.telomeaudio.com/

धन्स!! एक छोटासा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जागेचा... कारण मुंबई! म्हणूनच फक्त २.१ चाच विचार. घरी सोनी चा टीवी + फिलिप्स चा डिव्हीडी प्ल्येयर आहेच. सिस्टिम मी शक्यतो टीवी वरच वापरेन.

अजून एक- मी एकलयं की बोस सिनेमेट चं प्रॉडक्शन बंद झालय! तीच एक होती ४२ हजार वाली आणि थोडं बजेट ताणलं अस्त तर बसणारी!

ही लिंक- http://www.boseindia.com/retail/bose-product-detail.aspx?Prd_Id=99&Cat_I...

सोनी चा बास जरा जास्तच अस्तो + बीटस क्लिअर नसतात!

धन्स!! एक छोटासा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जागेचा... कारण मुंबई!>>
आमचा पण हाच प्रॉब्लेम होता. त्यावर सोल्युशन म्हणुन शेवटी फिलीप्सचा वायरलेस साउंड बार - वुफर घेतला. मस्त प्रोडक्ट आहे. त्यावर आइ-पॉड पण डॉक फ्री मिळाला. वुफर प्रेक्षकांच्या बाजुला ठेवल आहे. आणि साउंडबार टिव्हीच्या खाली वॉलमाउंट केला आहे.

http://www.philips.co.in/c/home-theater-systems/soundbar-dvd-playback-ht...

'बास जरा जास्तच असतो' आणि 'बीटस क्लिअर नसतात' ही परस्परविरोधी वाक्य आहेत. बास जास्त असला तर सगळ्यात जास्त बीट्सच चांगल्या ऐकू येतात.

योगेश,
जागेचा प्रॉब्लेम असला तरी वॉल माउंट वाले छोटे स्पिकर मिळतात ना? माझ्याकडे जपानमधे घेतलेले आहेत.
त्याचा वुफर तेव्हा आम्ही शोकेसच्या वर ठेवला होता.

मला पण अप्ग्रेड करायची आहे. बोसची ऐपत नक्कीच नाही. पण सोनीची सध्याची सिस्टिम जुनी झाली आहे. एक करेक्ट कॉन्फिगरेशन सांगा. जरूर घेणार. मला जास्त बास आवड्तो.

योगेश,

जर हाय एंड मुझिक सिस्टीम हवी असेल तर हारमन कारडन सिस्टीम व जेबीएल स्पीकर ट्राय कर.

HARMON KARDON & JBL SPEAKERS is World Leaders in Music Amplifiers and System.

फिनिक्स मील मध्ये जेबीएल एंटरटेंमेंट लांऊज आहे त्यात तुला बघता येईल.

रीमा- फिलिप्स चा पर्याय चांगला वाटतोय.
विवेक- हार्मन कार्डन पहायला हवी.
सावली- बोस च्या २.१ ला जे स्पिकर्स आहेत ते पण वॉल माऊंट होतात.

पाहूयात - बोस / फिलिप्स / हार्मन कार्डन / सो सो ... आणि मगच ठरवेन! Happy

रीमा- फिलिप्स चा पर्याय चांगला वाटतोय.>
योगेश वर जी सिस्ट्म मी वापरत आहे तो जागेचा पुर्ण विचार करुनच घेतली. एल सि डी च्या खाली एकतर तो साउंडबार पुरतो आणि वुफरची ऊंची पण १ फुट असेल. पण मेन फायदा आहे वायरलेस.

धन्यवाद रीमा. मला एक सांगा, की जर वूफर कुठेही ठेवला तर चालतो का? वायरलेस चा फायदा तर आहेच. जरा कॉस्ट पण कमी आहे. पण मला फिलिप्स वायरलेस सिस्टिम्स कुठल्याही मॉल मध्ये दिसल्या नाहीत. दुकानाचा पत्ता देऊ शकाल क?

(बोस सिस्टिम वूफर कुठेही चालतो कारण त्यांच तंत्रज्ञान ! त्यामुळे वूफर कुठेही लपवला/ ठेवला खोलीत तर असं वाटतं की बास सुद्धा दोन छोट्या स्पिकर्स मधून येतोय. थोडक्यात काय तर तुम्ही बास कुठून येतोय हे नाही ओ़ळ्खू शकत पण तो जाणवतो)

बोस सिस्टिम वूफर कुठेही चालतो कारण त्यांच तंत्रज्ञान >> बोसचे तंत्रज्ञान नव्हे ते. कमी वारंवारीतेच्या लहरींचा अचूक उगम कानांना कळत नाही. त्यामुळे कोणत्याही ब्रँडचा वूफर असला तरी हेच तत्व लागू होते.

चला त्या निमित्ताने मला ही थोडं मार्गदर्शन करा...
माझ्याकडे फिलिप्सची जुनी व्हिसिडी/ऑडियो/कॅसेट प्लेयर अशी ४६०० watts ची म्युझिक सिस्टिम आहे. ही सिस्टिम मी २००१ साली खरेदी केली होती २५००० ला. १० वर्षं उत्तम चालली, सध्या तिचा फक्त रेडिओ ऐकण्यासाठी उपयोग होतो, शिवाय स्पिकर्स दणदणित असल्याने एक सेपरेट डिव्हिडी प्लेयर आहे (फिलिप्सचाच) त्याला जोडले आहेत. मला सगळं एकत्र करून टिव्हीला स्पिकर्स जोडायचे असतील तर मी नक्की काय करू? Uhoh

योगेश आम्ही क्रोमा ला घेतलेली.

की जर वूफर कुठेही ठेवला तर चालतो का?> सिस्ट्म इनस्टॉल करायला आलेल्या माणसाने तसा ठेवला. आणि तो तेव्हा म्हणालेला की अस केल्याने इफेक्ट चांगला येतो.

दक्षिणा त्या सिस्टीमला AUx ऑडिओ इनपुट आहे का? टिव्हीला ऑडीओ आउट असेल तर ते किंवा हेडफोन आणि हे AUx ऑडिओ इनपुट हे जोड. झाले काम. सिस्टीममधे AUx मोड निवड चालू केल्यावर.

माधव तशी सोय आहे, पण पुर्वी जुना टिव्ही होता त्याला यशस्वी पणे जोडू शकले नविन टिव्हीला जोडू शकलेले नाही. Sad शिवाय ही सिस्टिम बरिच धबडगा आहे. अवास्तव जागा व्यापली आहे हिने. डिस्कार्ड करून घ्यायची झाली तर नविन टिव्हि (सॅमसन्ग एलईडी) आणि फिलिप्स डिव्हिडी प्लेयरशी कंपायटेबल अशी कोणती सिस्टिम घ्यावी? किती वॅट्स ची घ्यावी? किंमत साधारणपणे किती पडेल?

बोस ही कमी जागेत मावते, चांगली वाजते, व सगळे भाग एका Box मधे असतात. Receivers/speakers/wires/wireless links सगळे सोबत येतात. पण हेही खरे की ती overpriced आहे.
Onkyo receivers famous आहेत. Plok speakers are good. Make sure system has all ports so that it goes with all devices you have. Like TV has optical out, make sure system has optical in. Bose ची २ स्पीकरची system with surround sounds येते.
Take something with DLNP and ethernet connection + USB.

खास महामहीन राष्ट्रपतीसाठी बनवलेल्या Mercedes Benz S600 (W221) Pullman Guard crafted in
Stuttgart, Germany. मध्येही Harmon-Kardon Logic 7 stereo sound system लावलेली असते.

स्त्रोतः http://timesofindia.indiatimes.com/india/Presidents-wagon-From-Ambassado...
Mercdes/articleshow/15090003.cms

योगेश कुठली सिस्टीम घेतली ?

विवेक छान माहीती...

दिलेली लिंक सिलेक्ट केल्यावर ४०४ एरर येतेय... बहुतेक मी आयपॅड वरून वापरल्यामुळे तर होत नसावं??

Sad पाऊण लाखाची बाइक घेतल्यानी बजेट बोंबलय सध्या... आता जरा हात मो़कळा होईस्तोवर थांबावच लागेल!

मला एक छान आय पॅड / एम पी थ्री इअर फोन घ्यायचा आहे. कंफर्टेबल इअर फोन्स पाहीजेत. आणि हेअर बँड प्रमाणेच फक्त डोक्यावर फिट व्हायला हवा....हातात अथवा पॉकेट मधे प्लेअर नको . गाणी पुढे मागे करायची सोय हवी. इन बिल्ट असलेलीही चालतील.
चालायला जाताना अथवा एक्सर साईज करताना वापरायला हवा आहे. Happy
प्लीज सजेस्ट करा.

आंगो, चांगल्या प्रतीचा ब्लूटूथ ऑन इअर हेडफोन पाहा. जेबीएल, सोनी; जरा वरच्या प्राईसरेंज मध्ये बोस, बीट्स वगैरे येतील. प्रत्यक्ष स्टोर मध्ये जाऊन आपल्या डिवाईस ला कनेक्ट करून अनुभव घ्यावा.
यामध्ये जर नॉईज कॅन्सलिंग पाहात असाल तर बराच महागात जाईल.

नाही..मला नुसता हेड फोन नकोय. प्लेअर पण पाहीजे. पेन ड्राईव्ह सारखे असतात ना..ते. हेड फोन्स मधेच बिल्ट इन. फक्त आवाजाचे, गाणी सिलेक्ट करण्याचे कंट्रोल्स असलेले.

भरत, मला वॉकिंग साठी हवी आहे. एकदम काँपॅक्ट, एम पीथ्री. हेड फोन्स व त्यातच स्टोरेज, प्लेअर असलेली सिस्टीम. खिशात काही ठेवण्याची भानगड नको.

सोनी चा घ्या खुप छान आहे, माझ्याकडे २००८ पासुन आहे, आता स्मार्ट फोन आल्यापासुन वापरत नाही, पण अजुनही चालु आहे. क्वॉलिटी, बॅटरी लाइफ खुप छान, ह्याच्याबरोबर येणारे हेडफोन्स ही ठिक ठाक आहे, पण तुम्ही तुमच्या चॉइसचे वापरु शकता.

आमच्याकडे़
"जेबीएल" चि " सीनेमा' सीस्टीम आहे, ब्लू-टूथ वर चालते...खुप छान आहे, टी.वी ला पन कनेक्ट होते...
वोल्योम = १ वर पन घर हालते Happy

हो मी घेतलंय. सोबत त्यांची म्युझिक कार्ड्सही पहा.
एक लिहायचं राहिलं. - चार्जेबल बॅटरी आणि त्यामुळे पोर्टेबल.

Carvaan बद्दल मलाही डिटेल्ड माहिती हवी होती. आईला गिफ्ट करायचा आहे.

Carvaan ची किंमत नक्की किती आहे? वेबसाईट वर $159 प्लस टॅक्स दिले आहे.

म्हणजे 10 ते 12 हजारात गेला. त्यात 5000 गाणी आहेत असे लिहिले आहे. म्हणजे स्टोरड असावीत. ही फक्त हिंदी आहेत का ? की हिंदी मराठी दोन्ही आहेत ? आमच्या घरी दोन्ही हवी असतात. ती म्युजिक कार्ड्स 15 डॉलरला आहेत म्हणजे त्यात अजून खर्च वाढणार. एकंदर प्रकरण पंधरा हजाराच्या घरात जाणार.

पण मग मार्केट मध्ये भरपूर पोर्टेबल स्पीकर/रेडिओ आहेत त्याला usb लावला की सर्व काम होऊ शकते.

Carvaan चे नक्की फायदे काय आहेत ? सिनियर सिटीझन्स साठी वापरायला सोप्पे? साऊंड क्वालिटी ? गाण्यांचे सिलेक्शन ? रेडिओ प्लस usb, bt ?

ज्यांच्याकडे आहे त्यांनी जरा डिटेल मध्ये लिहा प्लिज.

मला ७,०००(त्यातले १५०० टॅक्स) ला पडलंय. दोन मॉडेल्स ६००० च्या मागेपुढे आहेत.
नाट्यसंगीताचं कार्ड घेतलंय २०० गाणी ६९० रुपये. बालगंधर्वांपासून बकुल पंडितपर्यंत.
स्टोर्ड ५,००० गाणी हिंदी आहेत. लता, आशा, रफी, तलत, किशोर, मुकेश ; नौशाद, ओपी, एस डी, आर डी, एल पी,
साहिर, कैफी-जावेद अख्तर ; जगजीत सिंग. यांची गाणी आहेत. अमीन सायानीच्या गीतमाला आहेत.
शास्त्रीय वाद्य संगीत, सूफी, गझला हेही आहे.
गाण्यांचं सिलेक्शन जरा जास्त अलीकडचं आहे असं माझं मत. लताची अगदी नाइन्टीजची ही गाणी आहेत. त्यांच्या यादीत फिफ्टीजपासून दिसलीत. पण मला अलीकडचीच जास्त ऐकू आलीत. रँडमली वाजतात. स्किप करायची सोय आहेच.
रिमोट अगदी खेळाण्यातला वाटतो. पण काम करतो.
साउंड क्वालिटी टु इन वन किंवा थ्री इन वन ची असावी तशीच आहे.
ब्लू टूथ वापरलेलं नाही.
माझ्याकडच्या कॅसेट्स आता अर्थातच जुन्या झाल्यात, कॅसेट प्लेयर्स बंद पडतात, दुरुस्त करून देणारे लोक दुर्मिळ झालेत. म्युझिक सिस्टमही मेलीय. या तिघांनाही तिलांजली द्यायचीय. त्यामुळे सहा-सात हजार रुपये गाण्यांच्या किंमतीसकट जास्त वाटलं नाहीत. गाणी डाउनलोड करून किंवा ऑनलाइन ऐकायच्या काळात मी अजून पोचलेलो नाही.

धन्यवाद भरत,

अजून काही शंका आहेत. Happy

लिस्टमध्ये, म्युझिक कार्ड्स मध्ये मला मराठी भावगीते, भक्तिगीते सापडली नाही. त्याची सोय आहे का ? Usb चा पर्याय आहेच पण प्लेलिस्ट मध्ये असल्यास सोप्पे पडले असते.

म्युजिक कार्ड म्हणजे काय छोटा पेन ड्राइव्ह आहे का फक्त?

प्लेलिस्ट मधले एखादे विशिष्ठ गाणे शोधून लावता येते का ? तसे करणे सोप्पे आहे का ? की फक्त रँडम प्ले होणारी गाणी ऐकायची नाही आवडले तर पुढचे निवडायचे ?

रेडिओ चॅनल ते गोल बटन फिरवून सेट करायचे आहेत असे दिसते. रेडिओ चॅनल सेव्ह करता येतात का ?

आमच्या घरचे ज्ये.ना. फारसे टेक सॅव्ही नाहीत, त्यामुळे खूप प्रश्न पडतात.

मराठी भावगीतांचे म्युझिक कार्ड नाही
विशिष्ट गाणे शोधून लावता येत नाही.
गोल बटणाखाली स्किप, रिव्हर्स वाली बटणे < > आहेत तीही वापरून चॅनेल/गाणे शोधता येतात.
तिथेच मिनी कॅरवान दिसलं. २५१ लोडेड गाणी . २२९० रु.
नुकतंच तमिळ कॅरवान लाँच झालंय. मराठीसाठी चळवळ उभारावी लागेल Happy

नानाकळा, जितेंद्र आणि अरुणा इराणीचा कारवां पिक्चर. पण तो हिंदी उच्चार आहे. इकडे कॅरावॅनच म्हटलेलं ऐकलं आहे.
ह्या पर्टिक्युलर केसमध्ये कारवां बरोबर वाटतंय.

>>विशिष्ट गाणे शोधून लावता येत नाही.<<
हे डील ब्रेकर ठरु शकतं.

तो कार्ड काय प्रकार आहे; एस्डी कार्ड का? अस्ल्यास नुस्त कार्ड विकत घेऊन मराठी गाणी आपल्या आवडिच्या एम्पी३ प्लेयरवर टाकु शकतो का?..

"सारेगामा कारवां" अशी जाहिरात करत आहेत ते. त्यांच्यापुढे (खुद्द निर्मात्यापुढे) कोण काय म्हणतंय हे जास्त महत्त्वाचे ठरु नये.

https://www.youtube.com/watch?v=sHIVY21RJkg

Pages