Submitted by सिंथेटीक जिनिअस on 13 May, 2012 - 08:37
जगात आपला अनेक व्यक्तींशी संपर्क येतो. काही व्यक्तींचा सहवास अगदी आनंददायी असतो तर काही व्यक्तींच्या संपर्कात आले तरी अस्वस्थ वाटते. असे का होत असावे ? काही व्यक्तींकडे दृष्ट ताकद असावी ईतके ते वाईट असतात. खरेच अश्या वाईट शक्ती असलेली माणसे असतात का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिथे मॅटर तिथे अँटीमॅटर तसेच
जिथे मॅटर तिथे अँटीमॅटर तसेच आहे ते
खरेच अश्या वाईट शक्ती असलेली
खरेच अश्या वाईट शक्ती असलेली माणसे असतात का?>>>>>>>. तु आरशात बघतोस का ?..
आपल्या भोवतालचे जग कसे आहे हे
आपल्या भोवतालचे जग कसे आहे हे आपण ठरवतो. आता इतर लोक दुष्ट आहेत का काय यापेक्षा मी त्याबद्दल काय करावे, माझे नुकसान कसे होऊ न द्यावे, याचा विचार करावा. बोलून चालून, दुष्ट कोण नि चांगले कोण हे आपण ठरवू त्यावर ठरते - म्हणूनच कित्येक लोक एखाद्या नेत्याला नावे ठेवत असली, तो देशाचे वाट्टोळे करेल असे म्हणत असतील तरी इतर अनेक लोक त्याला निवडून का बरे देतात?
स्वतः सोडून बाकीचे वेडे आहेत हा अहंकार?!
असण्याची शक्यता आहे.
असण्याची शक्यता आहे.
कसं काय सुचतं हे ?
कसं काय सुचतं हे ?
या प्रश्नाबाबत नेमके बोलणे
या प्रश्नाबाबत नेमके बोलणे कठीण आहे. पण असे अनुभव येतात/ आलेत ( लोकांची नजर लागू नये म्हणून काय बांधावे, हा माझा धागा त्यातूनच जन्माला आला होता. http://www.maayboli.com/node/26718 )
पण असे आहे की आपला हिंदु धर्म कर्मविपाक शिकवतो. म्हणजे बघा की जे काही आपल्याबाबत होते ते आपल्याच कर्माचे फळ असते... आता एखाद्या व्यक्तीने आपल्याला नजर लावली आणि म्हणून आपले वाटोळे झाले असा त्रागा आपण जेंव्हा करुन घेतो, तेंव्हा मग कर्मविपाकाचा सिध्हांत खोटा ठरत नाही काय? त्याने नजर लावली म्हणून माझे नुकसान झाले की माझ्या कर्मविपाकामुळे माझे नुकसान झाले? यातले नेमके काय खरे?
आपणच आपले मानसिक स्थैर्य वाढवणे उत्तम. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू याना दोषही देऊ नये की त्यांच्याकडून काही अपेक्षाही करु नये या निष्कर्षावर मी आलेलो आहे. अर्थात, तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा सहवास नकोसा होत असेल तर तो टाळावा हे श्रेयस्कर.
आपणच आपले मानसिक स्थैर्य
आपणच आपले मानसिक स्थैर्य वाढवणे उत्तम. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू याना दोषही देऊ नये की त्यांच्याकडून काही अपेक्षाही करु नये या निष्कर्षावर मी आलेलो आहे. अर्थात, तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा सहवास नकोसा होत असेल तर तो टाळावा हे श्रेयस्कर. >>>>>>>>> +१
काही व्यक्तींमध्ये दुष्ट
काही व्यक्तींमध्ये दुष्ट शक्ती असतात का?
<< अस स्वतःलाच विचारुन बघा, तुम्हाला उत्तर मिळेल
<< अस स्वतःलाच विचारुन बघा,
<< अस स्वतःलाच विचारुन बघा, तुम्हाला उत्तर मिळेल
"बुरा जो देखन मैं चला, बुरा मिल्या ना कोय"
"जो मन खोजा आपना तो मुझसे बुरा ना कोए"
कबीर
अॅन्टीमॅटर एकदा तुम्ही
अॅन्टीमॅटर एकदा तुम्ही चाफ्याला भेटा.
तुमच मॅटर अॅन्टिमॅटर सगळ शेटल होउन जाइल./...
काही व्यक्तींमध्ये दुष्ट
काही व्यक्तींमध्ये दुष्ट शक्ती असतात का?>> त्या शक्ती त्या व्य्क्तींच्या विचारांमधून रिफ्लेक्ट होत असाव्यात. व्यक्तीच कशाला, काही जागा, घरे, वास्तू याही त्या त्या ठिकाणच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह लहरींनी भारलेल्या असतात. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे, कातरवेळी, दिवेलागणीला शुभ बोलावे, चांगले विचार करावे. काही काही ठिकाणी गेल्यावरही इथून लवकर बाहेर पडावं असं आपल्याला होतंच की!
आमची आजी आम्हाला विशेष कोणाकडे जेवायला द्यायची नाही... स्वयंपाक रांधणार्या बाईचे विचार त्यात उतरतात आणि त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो असं तिचं आगळंवेगळं मत! मला ते काही फारसं पटायचं नाही! पुढे बर्याच वर्षांनी हॉस्टेलला गेल्यावर तेथील मेसवाल्या बापट काकूंचंही थेट हेच मत निघालं!
नजर लागणे, दृष्ट लागणे हे त्या व्यक्तींच्या विचारांचाच प्रभाव म्हणावा का?
आपणच आपले मानसिक स्थैर्य
आपणच आपले मानसिक स्थैर्य वाढवणे उत्तम. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू याना दोषही देऊ नये की त्यांच्याकडून काही अपेक्षाही करु नये या निष्कर्षावर मी आलेलो आहे. अर्थात, तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा सहवास नकोसा होत असेल तर तो टाळावा हे श्रेयस्कर.>> ह्म्म पटतंय थोडं थोडं!!!
नक्कीच खरं आहे. हे दृष्ट
नक्कीच खरं आहे. हे दृष्ट लागणं वगैरे......मला बर्र्याच सुन्दर मुलीन्ची दृष्ट लागते असं माझे कुटुम्ब म्हणते नेहमी...
भयानक व्यक्ती असु शकतात. माझा
भयानक व्यक्ती असु शकतात. माझा विश्वास आहे. काही व्यक्ती भ्रमित करतात एखाद्याला.
भयानक व्यक्ती असु शकतात.
भयानक व्यक्ती असु शकतात. :)....खरं आहे :)....
प्रतिसाद वाचून निराश
प्रतिसाद वाचून निराश झालो
जामोप्यांनी निवडलेला मार्ग वैयक्तीक चिंतनातून आलेला आहे
या प्रश्नाकडे शास्त्रीयदृष्ट्याही पाहायला हवे असे वाटत आहे
मॅटर (पदार्थ) या प्रकाराची दखल घेतली जायला हवी असे वाटते
============================================
मेंदूमध्ये विचार प्रसवले जातात तेव्हा रासायनिक प्रक्रिया होते व काही रसायने स्त्रवतात असे आपण सगळे जाणतो.
या निर्माण झालेल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी माणूस प्रयत्न करतो व त्यामुळे शेती, बांधकामे, विमान उड्डाणे, सोयीसुविधा या सर्व गोष्टी जन्माला येतात. या सर्व गोष्टी, हे आज दिसणारे सुखसुविधांनी ओतप्रोत भरलेले जग हे त्या मॅटरमुळे, त्या रसायनामुळे व त्याने दिलेल्या प्रोत्साहनातून केलेल्या कृतीमुळे निर्माण झालेले आहे.
मानवाच्या मेंदूत अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात. प्रेम, राग, मत्सर, अपमान, अभिमान, मैत्री, शतृत्व, भीती, वेदना हे त्याचे काही ठळक प्रकार आहेत
यातील मत्सर व अभिमान या भावनांवर इतरांचे नियंत्रण नसते. म्हणजे आईबद्दल मुलाच्या मनात प्रेम निर्माण व्हावे यासाठी आईने मुलावर खूप माया केलेली असणे हे आवश्यक असते. जामोप्या म्हणतात त्याप्रमाणे 'आपण केलेल्या कृत्याचा परिणाम म्हणून दुसर्याच्या मनात निर्माण झालेली भावना' या सदरात असे प्रेम येते व याच सदरात (सहसा) मत्सर व अभिमान सोडून इतर सर्व भावना येतात
पण मत्सर आणि अभिमान (येथील प्रतिसादातील अर्थ 'इगो') या अशा दोन भावना आहेत ज्या दुसर्याने आपल्याबाबतीत काही नाही केले तरीही निर्माण होऊ शकतात
(जसे अचानक एखाद्या फंक्शनमध्ये एक अतिशय सुंदर स्त्री नटून थटून आली की इतर बायका तिला न्याहाळताना मनात विचार करतात की मोठी पुढे पुढे करतीय ही, इतके काही नखरे करायला नको आहेत. यात त्या नुकत्याच आलेल्या स्त्रीने इतर बायकांच्या बाबतीत काहीही केलेले नसते.पण तरीही ती भावना निर्माण होते)
या मत्सर व अभिमान या भावना दुसर्याने आपल्यासंदर्भात काहीही केले नसतानाही निर्माण होतात. (काहीतरी केले तर, तर होतातच).
या भावना निर्माण होतानाही रासायनिक प्रक्रिया होते व ते ते रसायन स्त्रवते
मात्र त्या रसायनाकडून मिळालेल्या प्रोत्साहनातून माणूस नेहमिच काही कृती कसतो असे नाही, तर बरेचदा काही कृती करतच नाही. जसे ऑफीसमधील सहकार्याला बढती मिळाली आणि एखाद्याला हेवा वाटला तरी तो काही लगेच सर्वांदेखत त्याला म्हणत नाही की तुझी पात्रता नसताना तुला बढती मिळालेली आहे. तो विचार मनातच ठेवतो (व स्त्रवलेले रसायन तातुरते निष्क्रीय करतो).
रसायन तात्पुरते निष्क्रीय झालेले असले तरी ते मॅटर म्हणून अस्तित्वात असतेच (ट्रान्स्फॉर्म झालेले असेल, पण रुपांतरीत अवस्था अस्तित्वात राहतेच) आणि त्याचे परिणाम नंतर, वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळू शकतात
असा मत्सर वाटणारा माणूस अनेकदा ज्याचा मत्सर वाटतो त्याच्या पाठीमागे त्याच्यावर टीका करतो, चहाड्या करतो, त्याचे काहीतरी वाईट होईल हे बघतो
आणि असे केल्याने त्या माणसाचे काहीतरी वाईट होऊही शकते, जसे साहेबाकडून शिव्या बसल्या इत्यादी
मात्र जे लोक आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत किंवा आपल्याशी तितकेसे ( / मुळीच ) संबंधीतही नसतात त्यांना वाटणार्या मत्सराचे काय होते?
तो साठत राहतो. त्याचे मॅटर वाढत राहते. वातावरणातील नकारात्मक शक्ती वाढत राहते. असा माणूस जेव्हा एखादी इच्छा व्यक्त करतो तेव्हा वातावरणात असलेल्या सकारात्मक, चांगल्या मॅटरपेक्षा जर नकारात्मक, वाईट मॅटर अधिक सामर्थ्यवान ठरले तर खरंच काहीतरी वाईट होऊ शकते व हा निसर्ग असून ते त्या वाईट माणसाला प्रत्यक्षात स्वतःहून करावे लागतच नाही. ते वातावरणामुळे आपोआप होते.
सूर्य सायंकाळी लाल का दिसतो आणि दिवसा आकाश निळे का दिसते यांच्या उत्तरावरून आपल्याला लक्षात यावे की आपल्या इंद्रियांच्या मर्यादेपलीकडे अनेक माध्यमातून अनेक प्रकार होत असतात
(मागे एकदा भारतात झालेला एक भूकंप कोलकात्याच्या कसाईखान्यातील जनावरांच्या आर्त किंकाळ्यांच्या लहरींमुळे झाला असे जर्मनीतील एका शास्त्रज्ञ शिष्टमंडळाने नोंदवले व त्याची पेपरमध्ये बातमी आली होती)
आता अशी वाईट माणसे मुळात निर्माण होण्यामागे अनेक कारणे असतात व ती कोटीच्या संख्येतही जातील
पण प्रमुख कारणांपैकी:
१. अन्नावरची वासना
२. मुळातच स्वतःचे सर्व हक्क कोणीतरी हिरावून घेतल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याची वासना
३. पिढ्यानपिढ्यांची गरीबी
४. शारिरीक वासना
५. स्वतःचा छळ झालेला असणे
इत्यादी
या इच्छा मॅटरच्या स्वरुपात वातावरणात जाऊन सक्रीय होतात व एकंदर सकारात्मक इच्छांसमोर युद्ध हारत राहतात, पण कधीतरी अधिक प्रबळ झाल्या तर आपले रुपांतर एखाद्या वाईट घटनेच्या स्वरुपात करून दाखवतात.
यावर उपाय म्हणजे आपली जेथे (ज्या देवावर /देवीवर / धर्मावर) श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करणे
यामुळे आपल्यातून सद्विचार व आपल्याकडून सत्कृत्ये असे वातावरण आपल्या शरीराभोवती कवचाप्रमाणे तयार होते
श्री स्वामी समर्थ
-'बेफिकीर'!
स्वयंपाक रांधणार्या बाईचे
स्वयंपाक रांधणार्या बाईचे विचार त्यात उतरतात आणि त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो असं तिचं आगळंवेगळं मत!>>>माझेही हेच मत आहे आणि मला तसा अनुभव आला आहे.
या इच्छा मॅटरच्या स्वरुपात
या इच्छा मॅटरच्या स्वरुपात वातावरणात जाऊन सक्रीय होतात व एकंदर सकारात्मक इच्छांसमोर युद्ध हारत राहतात, पण कधीतरी अधिक प्रबळ झाल्या तर आपले रुपांतर एखाद्या वाईट घटनेच्या स्वरुपात करून दाखवतात.
हे मान्य आहे.. पण समजा माझ्याबाबतीत अशा काही वाइट लोकांमुळे एखादी वाइट घटना घडली, तरी माझा जुना कर्मविपाक ती घटना घडण्यास कारणीभूत असतो, म्हणूनच ती घटना घडते ना? समजा माझे पूर्व संचित व्यवस्थीत असेल तर या लोकांचा माझ्यावर परिणाम होणारच नाही... म्हणजे वाइट घडायला नेमके कारण काय? आपले संचित की इतरांची वाइट नजर?
आपल्या कृत्यामुळेच आपले दैव
आपल्या कृत्यामुळेच आपले दैव ठरते ही शिकवण 'माणसाने चांगले वागावे' यासाठी असते.
ती शिकवण शिरोधार्य मानली की माणूस सहसा चांगला वागणार हे खचित. (चांगले आणि वाईट याच्या कल्पना तूर्त सापेक्ष नाहीत असे गृहीत धरून हा प्रतिसाद)
आपण चांगले वागलो तरी आपल्याबाबतीत वाईट घडते अशी खूप उदाहरणे पुराणात व आजही दिसतात
- रामाचा वनवास
- पांडवांचा अज्ञातवास
- द्रौपदीला पाच पती स्वीकारावे लागणे
- द्रौपदी वस्त्रहरण
- ज्ञानेश्वरांचा छळ
- गांधींची हत्या ( राजकीय भाग बाजूला ठेवून)
इत्यादी
जामोप्या, आपण आपल्या अनेक
जामोप्या,
आपण आपल्या अनेक स्नेह्यांच्या घरी जातो. आपल्याला असा एक अनुभव येतो बघा, असे कधी वाटले का तुम्हाला
की एखाद्याचे झोपडेही आनंदी वातावरणाचे असते आणि एखाद्याचा बंगलाही भकास वाटतो
ती बाब आपल्या आवडीनिवडीनुसार आपण ठरवत नसून तिथे गेल्या गेल्याच आपल्याला हे एकदम जाणवते बघा
होय. हे मान्य आहे. पण माझे
होय. हे मान्य आहे. पण माझे कवच ( म्हणजे पुन्हा संचितच) चांगले असेल तर त्याचा मला त्रास होणार नाही.
होय, ज्याचे कवच सामर्थ्यवान व
होय, ज्याचे कवच सामर्थ्यवान व (खरे तर शास्त्रीय, पण) श्रद्धेवर अधिष्ठित असेल त्याला त्रास होणार नाही
उलट तो आल्यामुळे त्या वास्तूत सकारात्मक इच्छा थोड्या वाढतील
तुम्ही आत्ता कंसात संचित हा
तुम्ही आत्ता कंसात संचित हा शब्द लिहिल्यामुळे हा प्रतिसादः
तुमचे संचित हे तुमचे कवच असू शकत नाही. ती तुमची जनमानसातील प्रतिमा असते. एखादा माणूस निर्व्यसनी असणे हे त्याचे सत्कृत्य. याचे दोन भिन्न परिणाम होतात. एक म्हणजे त्याच्या प्रकृतीवर घातक परिणाम होत नाहीत आणि दुसरे म्हणजे प्रतिमा चांगली राहते / होते
पण त्यामुळे त्या माणसावर इतरांच्या लहरींचे परिणाम होणार नाहीत हे अविश्वसनीय वाटते
याचे कारण (तो माणूस तसे समजत नसला तरीही) तो निसर्गापुढे मुळातच शरण असतो व निसर्ग आपला प्रभाव पाडतो (च)
नामस्मरणावर श्रद्धा
नामस्मरणावर श्रद्धा ठेवल्यामुळे संचित सुधारत राहते हे मान्य आहे का?
(याचा अर्थ माझ्याबाबतीत असे होत आहे असे मला म्हणायचे नाही आहे)
पण त्यामुळे त्या माणसावर
पण त्यामुळे त्या माणसावर इतरांच्या लहरींचे परिणाम होणार नाहीत हे अविश्वसनीय वाटते
हो. पण तेदेखील ' माझ्या' नशिबात लिहिलेले असते म्हणूनच घडते ना?
समजा माझ्या एखाद्या मित्राने मला दुष्ट हेतूने शाप दिला.. तुझा पाय मोडेल.
आता दैव योगाने काही घटनाच अशा घडल्या आणि समजा माझा पाय खरोखरच मोडला..
आता माझा पाय मोडल याचं कारण काय? तर माझं संचित/ माझं नशीब हेच ना?
समजा त्या मित्राने अपशब्द नसते बोलले तरी माझ्या नशिबात जे व्हायचं ते होणारच असतं.
टी व्ही वरुन घोषणा झाली की आज पाऊस पडेल. समजा खरोखरच पडला.. तर त्याला कारण टी व्ही मानायचे का की हा बोलला आणि लगेच ते खरे झाले? त्याने केवळ भविष्यातील घटनेचा उच्चार केला.. पण घटना घडायला जे कार्यकारण चक्र असते, त्याचा तो कुठेच भाग नसतो... तसेच आपल्याला नजर लावणारी व्यक्ती आपल्याबाबत अभद्रवाणी करते. पण जे घडते, त्याला ती कारण होऊ शकत नाही , त्याला कारण असतो आपलाच कर्मविपाक.
नामस्मरणावर श्रद्धा
नामस्मरणावर श्रद्धा ठेवल्यामुळे संचित सुधारत राहते हे मान्य आहे का?
नामस्मरण करुन आचार विचार यात सकारात्मक बदल घडत असेल तर होय... मूळ वृत्तीतच फरक होणार नसेल तर फारसा फरक पडणार नाही.
निसर्ग हे (प्रामुख्याने) गणित
निसर्ग हे (प्रामुख्याने) गणित व पदार्थविज्ञान आहे
निसर्गात तयार झालेल्या सजीवाचे काय होणार हे (लक्षावधी असले तरी पुन्हा प्रामुख्याने) :
१. त्याने केलेल्या कृती
२. भोवतालची परिस्थिती
३. आलेली संकटे
४. शारिरीक ताकद व मानसिक ठामपणा
अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते
एखाद्याचे 'नशीब' असे काही नसते. म्हणजे कल्पना चावला मरणार आहे हे ठरलेले होते असे नव्हते
आता हा युक्तिवाद खोडताच येणार नाही की नशीबच असते, कारण 'जे झाले ते होणारच होते व त्यामुळेच तशी परिस्थिती निर्माण झाली' या वाक्यावर कोणीच प्रतिवाद करू शकत नाही
मात्र क्षणभर तो युक्तिवाद (मानवाचे वर्तन सुधारण्यासाठी मुद्दाम निर्माण केलेला) खोटा युक्तिवाद आहे असे गृहीत धरले तर लक्षात यावे की केवळ प्रयत्न, वर्तन, परिस्थिती व नशीब याबाहेरही काही शक्ती कार्यरत असतात आणि त्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे माणसाने कोणतीही तांत्रिक प्रगती करण्याआधी शुद्ध गणित व विज्ञानावर आधारीत विश्वाचे अस्तित्व
श्रद्धा व श्रद्धा हवी यामागची
श्रद्धा व श्रद्धा हवी यामागची सांगितली गेलेली कारणे यात अद्वितीय तफावत आहे
श्रद्धा असल्यास 'जे झाले ते वाईट असले तरी ईश्वराचे आभार मानायची ताकद' येते तर श्रद्धा ठेवण्याच्या सांगितल्या गेलेल्या कारणांमध्ये 'असे असे केले नाहीत तर फार वाईट होईल' या मानवनिर्मीत आणि घातक समजूती आहेत
<<त्याला कारण असतो आपलाच
<<त्याला कारण असतो आपलाच कर्मविपाक.
>>
हा युक्तिवाद खोडता येणारच नाही, पण उदाहरणे देता येतील
आई वडिलांची आज्ञा म्हणून श्रीरामाने वनवास स्वीकारला व सम्राटपदाचा एकमेव वारस असण्याची भूमिका गमावली
श्रीरामाने सतःच्या आयुष्यात कायम सत्कृत्ये केली
मात्र त्याला पत्नीवियोग सहन करावा लागला व मोठे युद्ध झाले ज्यात स्वतःच्या पत्नीसाठी आपण आरंभलेल्या युद्धात इतर जीव नाहक मरत आहेत हे पाहावे लागले
हे त्याचे संचित कसे?
(यावरून माणूस पुनर्जन्माकडे वळू शकेल, पण मला असे वाटते की तो विषय या विषयाच्या व्याप्तीत आणण्यापेक्षा नवीन धागा उचित)
हा युक्तिवाद खोडता येणारच
हा युक्तिवाद खोडता येणारच नाही,
तोच तर प्रश्न आहे! हा युक्तीवाद कसा खोडायचा तेच समजत नाही , त्यामुळे नाइलाज म्हणून तो गळ्यात घालून घ्यावाच लागतो.
लिंबु भाऊ कुठे आहात? धावा.. तुमची या धाग्याला गरज आहे.
Pages