चिकन १/२ किलो
कांदे २
टॉमेटो १ मोठा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
लसूण १०-१२ पाकळ्या (मोठा असतील तर ७-८)
आलं १/२ इंच
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
लवंगा ५, मिरे ५
पुदिना अर्धी जुडी
पालक ८- १२ पानं
दही २ चमचे
चिकन स्वच्च धुवून मोठ्या भांड्यात ( ज्यात आपल्याला शिजवायचे आहे त्यातच ) ठेवावे.
कांदे बारीक चिरून त्यात घालावेत.
टॉमेटो बारीक चिरून त्यात घालावा.
आता बाकीचे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घावे. ( थोडे जाडसर वाटले तरी छान लागते ) हे वाटण चिकनच्या भांड्यात ओता. चिकन, कांदे, टॉमेटो, मसाला सगळे नीट एकत्र करून २० मिनिटे झाकून ठेवा.
आता झाकणासकट भांडे मंद गॅस वर ठेवा. अधून मधून आवश्यक तर हलवा. अर्ध्या तासात चिकन शिजेल.
याला फार रस्सा नसल्याने फुलकीशी चांगले लागते.
याच प्रकाराने पुलावाही करता येते. वर सांगितल्या प्रमाणे चिकन अर्धेअधिक शिजले की यात धुवून ठेवलेला तांदूळ टाकावा, तांदळाच्या प्रमाणात मीठ, तिखट, पाणी टाकावे, काजू टाकावेत अन पुलावा शिजू द्यावा. तांदूळ शिजले की अर्धा वाटी दुधात केशर खलून पुलाव्याला भोकं पाडून त्यात हे दूध घालावे. झाकण ठेऊन ५ मिनिटे वाफ काढावी. चिकन पुलावा तयार !
छान आहे बिनतेलाचं खाणं... पण
छान आहे बिनतेलाचं खाणं... पण मी चिकन नाही खात, एखाद वेळी भाजी करून पाहीन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगळी वाटते पाककृती. काही
वेगळी वाटते पाककृती. काही प्रश्न आहेत.... कच्या कांद्याचा वास नाही का येत? पाणी अजीबात घालायचे नाही का? तेल नाही, पाणी नाही मग नुसत्या दह्याच्या,टोमॅटो, पालकच्या रसात शिजते का कोंबडी? खाली लागत नाही का?
णिषेध्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
णिषेध्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नाही लागत. मंद गॅसवर पाणी
नाही लागत. मंद गॅसवर पाणी सुटते चिकनला. उलट फारसे हलवावेही लागत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चातक,
अवल, फोटु? रच्याकने, कधी
अवल, फोटु?
रच्याकने, कधी करतेयस?
आशु, आजच केली होती सकाळी.
आशु, आजच केली होती सकाळी. फोटो
संपवली लेकाने ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चल तू येशील तेव्हा करते , ये लवकर
हायला..हे वेगळंच आहे
हायला..हे वेगळंच आहे काहीतरी!
पण झक्कास! करून बघणार आणि वृत्तांत ही देणार!
बादवे, हे रच्याक काय प्रकरण आहे?
रच्याकने : रस्त्याच्या कडे ने
रच्याकने : रस्त्याच्या कडे ने : बाय द वे चे मराठीकरण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल: हायला!!! असं आहे
अवल: हायला!!!
असं आहे व्हय!
धन्स!!!
पुलाव नक्की करून बघेन. तसे
पुलाव नक्की करून बघेन. तसे आम्ही फ्राइड चिकन/ चिकन ६५ वाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, सरप्राईसिंगली मी असेच
अवल,
सरप्राईसिंगली मी असेच चिकन sunday ला केले होते.. टेस्ट छान झाली होती आणि बिन्तेलाचे म्हणून सर्वाना आवडले. फक्त मी कढई ला तेलाचा हात फिरवून घेतला होता आणि कांदे उभे कापले...बिर्याणीला कापतो तसे .थोडे सुके खोबरे ही वाटपात टाकले .
पुलाव करताना तांदूळ नुसते च टाकायचे का? चिकन च्या ग्रेवी मध्ये शिजतात का? नक्कि करुन बघेन
सामी, 'वाईज वुमेन थिंक अलाईक'
सामी, 'वाईज वुमेन थिंक अलाईक'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन हो थॅक्स, बदल केलाय >तांदळाच्या प्रमाणात मीठ, तिखट, पाणी टाकावे<
फोटू टाका आधी... मग
फोटू टाका आधी... मग प्रतिक्रियेच बघू
Thanks अवल , या रविवारी नक्कि
Thanks अवल , या रविवारी नक्कि पुलाव करिन आणि फोटो पण टाकीन
अवले...मस्त दिसतेय रेसिपी! पण
अवले...मस्त दिसतेय रेसिपी!
पण फोटो टाकलास तर तुझ्याघरी धाड टाकणेत येइल्...व्हेज कोंबडी खाण्यासाठी.
अवल अशा प्रकारे इथे हर्बल
अवल अशा प्रकारे इथे हर्बल चीकन प्रकार मिळतो, दिसायला कायतरीच अस्तो पण चव छान असते, आलं, लसणाने मस्त चव येते :)! आणि अगदी मऊ शिजलेले असते पण तरी हाडापासून वेगळे झालेले नसते बहुधा, किती वेळ शेगडीवर ठेवायचे हे महत्वाचे असावे इथे!