सातुच्या पिठाची कडबोळी आणि मालपुवा

Submitted by माधवी. on 7 May, 2012 - 02:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कडबोळ्यांसाठी:
१ वाटीभर सातुचे पिठ, १ टी-स्पून जिरे, १ टी-स्पून ओवा, २ चमचे तेल, चवीपुरते मीठ

मालपुव्यासाठी:
१ वाटीभर सातुचे पिठ, अर्धा वाटी गुळ, तुप, थोडसं दुध

क्रमवार पाककृती: 

कडबोळी:
प्रथम सातुचं पीठ, जिरे आणि ओवा एकत्र करुन घ्यावं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं. नंतर थोडं पाणी घालून घट्ट्सर आणि एकजीव भिजवुन घ्यावं.
नंतर एका पॅन मधे एक चमचा तेल घालुन ते संपुर्ण पॅनभर पसरवुन घ्यावं. हवं असल्यास जास्त ही घालू शकता पण एवढं पुरेसं होतं माझ्या अंदाजानुसार.
भिजवलेल्या पिठाची कडबोळी वळुन ती पॅनमधे ठेवा. कडबोळ्यांवर १-२ थेंब तेल घाला. आता गॅस वर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवुन एक वाफ येऊद्या. नंतर एकदा सगळी कडबोळी उलटुन पुन्हा एकदा झाकण ठेवुन एक वाफ आणा. हवं असल्यास पुन्हा थोडसं तेल घाला आणि परतुन घ्या. खमंग कडबोळी तयार!!

मालपुव्यासाठी:
अर्धी वाटी गुळ थोड्या पाण्यात किंवा दुधात पुर्ण विरघळ्वुन घ्या. त्यामध्ये सातुचं पीठ एक्जीव होईल असं एकत्र करा. हे मिश्रण भजीच्या पिठासारखे सरसरित व्हायला हवे.
नंतर एक पॅन गॅसवर ठेवून त्यात २ चमचे तुप घाला. तुप जरा गरम झाले कि त्यामधे पुरीच्या आकाराचा मालपुवा तयार होइल एवढे वरील मिश्रण ओता.
मालपुव्यावर वरुन एक चमचा तुप टाका आणि २ मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊद्या.
नंतर मालपुवा उलट्वून पुन्हा थोडे तुप टाका. जेवढे तुप जास्त टाकाल तेवढा मालपुवा सहज निघुन येइल. तर असा गरम मालपुवा तय्यार!

अधिक टिपा: 

सातुचे पीठ नुसते खायचा जरा कंटाळाच येतो म्हणुन मग हे प्रयोग!
कडबोळ्यांना अगदी कमी तेल लागते. म्हणजे ही एक डाएट रेसिपी म्हणता येइल.
चहा सोबत खायला खुप छान लागतात. Happy
मला हे टाइप करायला जेवढा वेळ लागला त्याहुन कमी वेळ करायला लागेल! Happy

माहितीचा स्रोत: 
कडबोळी: सौ. आई आणि मालपुव्याचा प्रयोग माझा!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरती Happy
माझा खु ....प मोठ्ठा प्रश्न सुटला >> मला ही जेव्हा आईने कड्बोळी सांगितली आणि मालपुवा जमला तेव्हा असेच वाटले!

.