अगदी सोपी भरली वांगी- फोटोसह

Submitted by दिनेश. on 1 May, 2012 - 07:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मी बरीच वर्षे हि भाजी करतो आहे, नक्की आठवत नाही, पण बहुतेक मंगला बर्वे यांच्या अन्नपूर्णा पुस्तकात वाचली असणार.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी नाही म्हणता येणार. Happy पण कृती मस्तच आहे. फोटो पण छान. वेलची वांग्यात कशी लागेल बघायला पाहिजे.

मी आमच्याकडे करतात ती शेंगदाण्याचा कुट, थोड खोबर घालून (कांदा वगैरे नाही) करतात त्या भाजीची कृती टाकते.

फोटो एकदम किलर आहे दिनेशदा.

सीमा अगं ते "पाककलानिपुण असलेल्यांसाठी" अगदी सोपी भरली वांगी असे लिहीलय की तुला दिसत नाहीये का Proud Light 1
अवांतर तू, मृण्मयी यांनी लिहीलेल्या सोप्या वांग्याचा कृत्यापण "पाककलानिपुण असलेल्यांसाठी सोप्या" अश्याच आहे.

माझी सोपी पद्धत हीच आहे. मी तर कांदा बारीक चिरते किंवा हॅंडी चॉपरमधून काढते.
मसाला (काळा/गोडा/दगडू आणि तिखट) किंवा (कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी). थोडे पाणी आणि लिंबू/चिंच्/आमसूल. ("/" म्हणजे 'किंवा')
मसाल्यात मिसळायला कांदा-कोथिंबीर/दाणे कूट/तीळ कूट/सुके खोबरे भाजून ठेवलेले-असे काहीतरी असले की ते वाटण इ. न करता भरली वांगी होतात.

छान रेसिपी ! मी करताना कांदा किसत नाही, अगदि बारीक चिरते व बटाटे नाही वापरत आता असे करून बघते.

रुनी ... Lol
दिनेशदा सगळ्यात पहिला फोटू मस्तच आहे.. प्लेट पण सुंदर...:)
कांदे किसायला कं आल्यास ब्लेंडरला फिरवले तर?

LOL .रुनी. पाकनिपूण वाल्यांना काय पुरणपोळ्या पण सोप्या वाटतात. Uhoh

ए, मला करता आलं तर(च) ते सोप्पं म्हणायचं... इतका सोप्पा निकष आहे.

करून बघते Happy
(दिनेशदा, धन्यवाद...)

हि भाजी तशी गोडसरच होईल ना? लसूण नसल्याने तसा झणझणीतपणा येणार नाही.
सात्विक म्हणुन वरण भातासोबत छान लागेल Happy

आभार दोस्तांनो. कालची सुट्टी अशी कारणी लावली !
रुनी, ते बारीक अक्षरातलं नाही वाचलं बरं का ! Happy आणि पुरणपोळ्या, काय सोप्प्याच असतात कि. ;-०
दाद, नक्कीच जमतील. किसण्याऐवजी फु.प्रो. मधून काढली तरी चालतील. कांद्याचा रस निघाला पाहिजे.

तृप्ती, हो देठाजवळच. असे मीठ टाकल्याने वांगी लवकर शिजतात आणि चवदार लागतात.
आशु, तिखटाचे प्रमाण वाढवले तर तिखट लागतात. लसणाची गरज नाही.
वरणभाताबरोबर छान लागतात.

पाकनिपूण वाल्यांना काय पुरणपोळ्या पण सोप्या वाटतात.>>>>>>>>:हाहा: अगदी माझ्या मनातलं वाक्य!
बटाटे,मिरी आणि वेलची घालून मी कधी भरली वांगी केली नाहीयेत पण ही कृती नक्की करून बघीन.
दिनेशदा, एक बावळटासारखा प्रश्न...(हसू नका..प्लीज..) ह्याला मोहोरी,हिंग,हळद घालून फोडणी करत नाहीत का?

हो हो दिनेशदा! मी पण मंगला बर्वे यांच्या अन्नपूर्णा पुस्तकात ही रेसिपी वाचली आहे. अगदी हमखास यशस्वी होणारी भाजी. पण त्यांनी पुस्तकात मोहोरी, हिंग, जिर्‍याची फोडणी सांगितली आहे आणि मिरी, वेलची आणि बटाटे सुद्धा सांगितल्याचे काही आठ्वत नाही. तुमच्या पद्धतीने करुन बघेन,
फोटो पाहुनच खावीशी वाटतेय..