प्रार्थना म्हणजे नेमकं काय ?

Submitted by जादुगर on 28 April, 2012 - 16:31

प्रार्थना
प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? प्रार्थना केल्याने खरोखर देव खुश होतो का?
माझा देवावर पुर्ण विश्वास आहे पण देवाला मी एखादी वस्तु मागितली तर ती वस्तु तो मला कधीच देत नाही (मिळु देत नाही ) आणि एखादि गोष्ट एका प्रयत्नात मिळुन जाते ती गोष्ट मिळण्यासाठी कुठल्या देवाला मी प्रार्थना पण केलेली नसते म्हणुन कधीकधी मनात शंका निर्माण होते की प्रार्थना नावाची काही गोष्ट आहे का नाही?.
प्रार्थना आणि चमत्कार एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. का ? तुम्हाला काय वाटतं !!!!!!!!!!!!

गुलमोहर: 

मूळात काही मागण्यासाठी "प्रार्थना" हा गैरसमज मनातुन काढून टाकावा. केवळ सतत काही मागण्यासाठीच जे केले जाते ती "याचना" असते, भले ती माणसाकडे करा वा देवाकडे.
प्रार्थना ही कोणास उद्देशून कोणत्यातरी कारणाने केली जाते व अगदी मूळ स्वरुपात बघितले तर जो उद्देश ज्याकोणत्या कारणाने ज्याला कुणाला कळवावयाचा असतो, तिकडे त्याचे लक्ष वेधून घेण्यास मूलतः प्राथमिक प्रास्ताविक केले जाते ती प्रार्थना व त्याअन्तर्गतच सकारणऊद्देश प्रार्थनेत गुम्फला जातो.
आधीच म्हणल्याप्रमाणे, प्रार्थना म्हणजे केवळ याचना नव्हे तर क्षमापन, स्तुती, आभार, पुरश्चरण/आठवण करुन घेणे/जागृती, इत्यादी अनेक उद्देशान्नी अनेकान्करता प्रार्थना करता येते
अगदी सकाळी उठल्या उठल्या हाताचे पन्जे समोर बघुन म्हणायची "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविन्दम, प्रभाते करदर्शन" यात कुठली याचना आली?
नन्तर अन्थरुणावरुन उठून जमिनीवर पाय लावयच्या आधी म्हणायची "समुद्र वसने देवि पर्वतः स्तन मन्डले, विष्णुपत्नी नमःस्तुभ्यं पादस्पर्षं क्षमस्व मे" यात कुठली वस्तु वगैरेची याचना आली? यात प्रथम स्तुती करुन मग क्षमा मागितली आहे.
जेवताना म्हणायची "वदनी कवळ घेता...." यातही कुठेही याचना नाही.
अन याचना केली म्हणजे लगेच ती पुरवायला देव काही कुणाचा "नोकर" वा हुकमाचा ताबेदार नाही!
अर्थात, (कोणत्यातरी हिन्दी म्हणी/वाक्प्रचाराप्रमाणे) शिक्षा देण्याकरताची त्याची काठी जशी अदृष्य असते, तसाच त्याचा "देता हातही" अदृष्यच अस्तो, पण बहुतेक वेळा त्याने पुरवलेली बाब, मनुष्य "स्वकर्तुत्वाची" असे वृथा अहंभावाने समजुन चालतो. असो.
हल्ली "भारत माझा देश आहे...." ही प्रतिज्ञा किन्वा "जनगणमन...." वा "वन्देमातरम..." यान्ची सक्तिच होत नाही, पण या देखिल मातृभूमीकरताच्या प्रार्थनाच आहेत.

ढोबळ मानाने प्रार्थनेमधे देवाची/श्रद्धेयाची .....
१ स्तुति
२ क्षमायाचना
३ त्याचेप्रति स्वतःच्या कर्तव्याची आठवण जागवणे
३ गुणवैशिष्ट्यान्चे वर्णन व त्यान्ची मागणी
४ संऱक्षणाची, सुख शांती समृद्धी यान्ची कामना
५ बुद्धि धन वैभव इत्यादिकान्ची कामना
व्यक्त केली जाते.

ज्यांच्या मनगटात जोर नसतो आणि ज्यांची Victim mentalityअसते ते प्रार्थनेला महत्व देत बसतात .आपल्या देशात हजारोवर्षे हजारो देवांच्या करोडो प्रार्थना झाल्या असतील तरीही देशाची अवस्था बघा काय झाली ?

>>>> ज्यांच्या मनगटात जोर नसतो आणि ज्यांची Victim mentalityअसते ते प्रार्थनेला महत्व देत बसतात <<<<
मनगटातील जोर वा व्हिक्टिम मेन्ट्यालिटी (मराठीत बोला हो!) याचा अन प्रार्थना करण्याचा कसलाही संबंध नाही. उलट असलाच तर "मनगटातील असलेल्या जोराद्वारे" दुसर्‍यावर "अन्याय" करण्याची भावनाच जागृत होऊ नये ही प्रार्थना! सरदारजी (शिख संप्रदाय) लोक तर प्रार्थनेसोबतच, ती आठवण सतत रहावी म्हणून उजव्या हातात "कडे" घालतात.
पण असो.
केवळ एका वाक्यात तुम्ही उल्लेखिलेला विषय हा एका स्वतन्त्र धगधगत्या बीबीचा (धाग्याचा) विषय होऊ शकतो, व इथे अप्रस्तुत ठरेल म्हणून त्यावर लिहीत नाही. Happy

माणसाला आयुष्यात अनेक दु:खांचा, संकटांचा सामना करावा लागतो. मानवनिर्मीत साधने (जसे वैद्यकीय ज्ञान, आर्थिक सक्षमता इत्यादी) दुबळी पडणार / पडू शकतील याची भीती मनात असते. इतरांनी दिलेला मानसिक आधराही कुचकामी वाटू लागण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी व तसेच पुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एका अज्ञात शक्तीसमोर हात जोडावेसे वाटतात. प्रार्थनेचे महत्व स्वतःची चित्तशुद्धी इतपत मर्यादीत आहे असे गृहीत धरल्यास अपेक्षा राहात नाहीत. माणूस रस्त्यातून जाताना गाय दिसली तर तिला स्पर्श करून नमस्कार करतो याचेही कारण हेच आहे की 'माझ्याकडून पाप होऊ नये' ही इच्छा मनात निर्माण व्हावी.

प्रार्थना अनेक धर्मात केली जाताना दिसतेच. माणूस अगतीक आहे, बद्ध आहे, दुबळा आहे व माणसाहूनही खूप मोठे असे काहीतरी किंवा ज्याच्या हातात हे सर्व विश्व आहे असे कोणीतरी अस्तित्वात आहे या धारणेतून माणूस प्रार्थना करताना दिसतो. माणसाहून अधिक श्रेष्ठ असे काही अस्तित्वातच नाही असे मत असणारे सहसा नास्तिक म्हणवले जातात अथवा प्रार्थना करताना दिसत नाहीत. पण कोणत्यातरी पातळीवर ते स्वकर्तृत्वावर पूर्णतः न विसंबता नशीबाने काहीतरी 'खास एक्स्ट्रॉ' करावे अशी इच्छा मनी धरताना दिसतात. त्यांच्या त्या पातळीवर ते एक प्रकारची प्रार्थनाच करत असतात असे म्हणता यावे.

प्रार्थनेतून काही मिळते असे तत्व असते तर माणसाने कर्तबगारी दाखवली नसती. सर्वजण तप अथवा प्रार्थना करत राहिले असते. देव किंवा ती जी कोण हे सगळे नियंत्रीत करणारी शक्ती आहे ती माणसाला कर्तबगार बनवून त्याची मजा पाहात असते की हा स्वतःला माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ समजायला लागतो की नाही आणि तसे समजायला लागल्यावर मी त्याचे गर्वहरण केल्यावर त्याचा चेहरा कसा होतो. त्यामुळे प्रार्थनेमुळे 'मी फार मोठा नाही' ही भावना निर्माण होण्यास मदत होऊ शकेल.

अनेकदा प्रार्थनेच्या वेळी आजूबाजूचे वातावरण पवित्र केले जाते. जसे धूप, कापूर, उदबत्ती, निरांजन, फुले इत्यादींचा वापर करून मुळातच एक मनस्थिती निर्माण करणारे वातावरण तयार केले जाते. याचा उपयोग आपल्या मनातील चुकीचे विचार नष्ट होण्यास होतो असा ठाम मुद्दा मांडता येईल. जसे घर पसरलेले असले की मूड जातो तसेच पवित्र वातावरण केले की मनात आपोआप चांगले विचार येऊ शकतात / शकतील.

प्रार्थना हेच आपले ध्येय आहे व प्रार्थनेतून आणखीन काहीच वेगळे नको आहे असा विचार केला तर असे प्रश्न पडू नयेत असे मत मांडतो.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

बेफि.. छान लिहले आहे .. Wink
प्रार्थनेचा मुळ उद्देश हा याचना नसुन देवाची स्मृती आहे. सुख असुदे अथवा दुख्ख मी देवाला विसरलो नाही ही सदैव कृतज्ञतेची भावना असावी हा प्रार्थनेमागील खरा उद्देश..
पण माझ्यामते साधुसंत सोडले तर बाकीच्या लोकाना मनाच्या सांसारीक गुंतवणीकीमुळे हे जमणे शक्य होत नाही.. त्यामुळेच सर्वसामान्यलोकांची प्रार्थना ही याचना होउन जाते.. मी सुखात आहे मला असेच सुखात ठेव किंवा मी आत्ता दुख्खात आहे मला वाचव याच आणी केवळ याच कारणामुळे प्रार्थना केली जाते..
अशा प्रार्थनेचा काही उपयोग आहे का?? देव म्हणजे प्रार्थना किंवा पुजा अर्चा यांच्याबदल्यात सुख किंवा दुख्ख देणारा व्यापारी आहे का? या प्रष्णांचा समग्र विचार स्वताच्या मनाशीच केला पाहीजे..
मुळात आपण कुठल्या उद्देशाने प्रार्थना करतो आहे? नेमकी काय प्रार्थना करतो आहे? कुठल्यातरी ज्योतीशाने, पुजार्‍याने किंवा घरातील वडीलधार्‍या मंडळीनी सांगीतले म्हणुन अर्थ समजुन न घेता स्वताच्या स्वार्थासाठी घोकमपट्टी करुन एखाद्या मंत्राच्या चार ओळी नित्यनेमाने पुटपुटणे किंवा म्हणणे म्हणजे प्रार्थना आहे का?
आजकाल आजुबाजुला पाहिले तर बहुतांशी लोक दुर्दैवाने असेच दिसतात..:(

बेफिकीर,

>> प्रार्थना हेच आपले ध्येय आहे व प्रार्थनेतून आणखीन काहीच वेगळे नको आहे असा विचार केला
>> तर असे प्रश्न पडू नयेत असे मत मांडतो.

हीच निष्काम प्रार्थना आहे. हेच प्रार्थनेचे मूळ स्वरूप आहे.

आ.न.,
-गा.पै.

छान

............. सुविचार ...........
डॉ कैलास गायकवाड,=सात्विक वातावरणनिर्मिती व्हावी हा प्रार्थनेचा उद्देश आहे.
लिम्लु टिंबु ,= प्रार्थना म्हणजे त्याचेप्रति स्वतःच्या कर्तव्याची आठवण जागवणे.
राम = प्रार्थनेचा मुळ उद्देश हा याचना नसुन देवाची स्मृती आहे.
बेफिकिर, मामा पैलवान , आर्या१२३ , इर रोहित , जिल्लेइलाहि, चिंगी , सर्वाचे धन्यवाद आणी
इब्लिसजी मि तुम्हाला उपदेश करायला नाही सांगितल ( तुम्हाला ३ इडियट मधिल आमिर माहित असेल तो आपल्या कमजोर स्टुडन का हात कभी नही छोडता हू!अस म्हणतो मग तुम्ही - (माबोवर कुणालाही उपदेश करणे सोडून दिलेला) इब्लिस अस का बोलता ) एक्मेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ . काय मग बोला काही तरी .सर्वाचे पुन्हा धन्यवाद.

डॉ. गायकवाड, लिंबूटिंबू, बेफिकीर, राम, सर्वांची मते पटली.
गामा पैलवान यांनी दिलेली धोक्याची सूचना अत्यंत महत्वाची आहे.

ज्यांच्या मनगटात जोर नसतो आणि ज्यांची Victim mentalityअसते ते प्रार्थनेला महत्व देत बसतात .आपल्या देशात हजारोवर्षे हजारो देवांच्या करोडो प्रार्थना झाल्या असतील तरीही देशाची अवस्था बघा काय झाली ?
व्वा, क्या बात है! मनगटात जोर असलेले नि विजिगिषू वृत्ति असलेले लोकहि प्रार्थना करतातच! आणि नंतर काहीतरी उपयुक्त कार्य करतात जगात!!
शेवटी कशाचा संबंध कशाशी, कशाला किती महत्व द्यायचे हे समजायला अक्कल लागते हो!
मायबोलीवर लिहिण्याइतकाच फक्त मनगटात जोर, नि केवळ लोक म्हणतात त्याच्या विरुद्ध लिहायचे एव्हढीच अक्कल असलेल्या लोक काय कामाचे?

>>शेवटी कशाचा संबंध कशाशी, कशाला किती महत्व द्यायचे हे समजायला अक्कल लागते हो!
मायबोलीवर लिहिण्याइतकाच फक्त मनगटात जोर, नि केवळ लोक म्हणतात त्याच्या विरुद्ध लिहायचे एव्हढीच अक्कल असलेल्या लोक काय कामाच>>>>
झक्की +१

मायबोलीवर लिहिण्याइतकाच फक्त मनगटात जोर, नि केवळ लोक म्हणतात त्याच्या विरुद्ध लिहायचे एव्हढीच अक्कल असलेल्या लोक काय कामाचे?>>>>झक्की, बहुतांश लोक काय म्हणतात याचा विचार करु नये, आपली अक्कल चालवावी. मध्ययुगात युरोपात पृथ्वीभोवती विश्व फिरते असे बहुतांश लोक मानायचे ,परंतु या मताला अनेकांनी प्रयोगांती फोल ठरवले." बहुमताच्या विरोधात न बोलता गप्प बसावे" ही आपली फिलोसॉफी युरोपात आचरणात आणली गेली असती, तर कसलीही प्रगती झाली नसती.

आक्षेप बहुमताविरुद्ध बोलण्यास नाही,

पण परत एकदा भौतिक शास्त्राच्या सिद्धांतावरून अध्यात्म, भक्ति इ. गोष्टी समजण्याचा अयशस्वी प्रयत्न असावा . असे वाटते.
अहो भौतिक शास्त्रात देखील प्रकाशाबद्दल कधी पार्टिकल समजून तर कधी वेव्ह समजून विचार केला जातो, कारण पार्टिकल म्हंटले तर काही गोष्टींचे स्पष्टीकरण देता येत नाही तर कधी वेव्ह म्हंटले तर.

काही गोष्टी न्यूटनच्या नियमाने सिद्ध करता येत नाहीत, तिथे रिलेटीव्हिटीचे नियम लागतात.
आणि काही गोष्टींसाठी तर क्वांटम मेकॅनिक्स च उपयोगी पडते.

आता रक्ताभिसरण म्हंटले तर त्यात हायड्रॉलिक्स् चे बरेचसे नियम लागू पडतात, पण सगळेच काही फक्त इंजिनियर लोकांना समजते असे नाही, त्याला पुनः वैद्यकी विद्येची गरज पडतेच.
आता ज्यांना धड भौतिक शास्त्र माहित नाही नि अध्यात्म नि भक्ती याबद्दल तर अजिबात अक्कल नाही अश्या लोकांचे ठीक आहे. त्यांना काय बहुमत, स्वानुभव इ. ची पर्वा नसते. आपले लिहीत सुटायचे!

केवळ सतत काही मागण्यासाठीच जे केले जाते ती "याचना" असते, भले ती माणसाकडे करा वा देवाकडे.

प्रार्थना हेच आपले ध्येय आहे व प्रार्थनेतून आणखीन काहीच वेगळे नको आहे असा विचार केला तर असे प्रश्न पडू नयेत

प्रार्थनेचा मुळ उद्देश हा याचना नसुन देवाची स्मृती आहे.

हे मुद्दे पटले.
आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा अज्ञात आणि काल्पनिक तत्वापुढे नतमस्तक होणे, हा एक उदात्त विचार आहे असे म्हणता येईल. असे नतमस्तक होऊन अनेकांना मनःशांती मिळत असणार. अशी प्रार्थना ही अगदी खाजगी आणि निरुपद्रवी बाब असल्याने, तीवर कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. या माध्यमातून मनःशांती मिळवण्याचे श्रद्धाळू लोकांना स्वातंत्र्य आहे, त्याचा इतरांनी आदर केला पाहिजे.
याचप्रमाणे ज्या लोकांना अशा प्रकारच्या उपचारांतून मनःशांती मिळवण्याची गरज वाटत नाही, सर्वश्रेष्ठ अशा अज्ञात आणि काल्पनिक शक्तीच्या अस्तित्वावर ज्यास विश्वास नाही अथवा शंका आहे, ज्याला प्रार्थनेची मुळातच गरज वाटत नाही आणि जो चाललंय त्यात सुखी आहे- त्याच्याही स्वातंत्र्याचा श्रद्धाळूंनी तितकाच आदर केला पाहिजे. मग त्याला अहंकार झालाय किंवा देवाची न दिसणारी काठी त्याला धडा शिकवेल किंवा नियती त्याचे गर्वहरण करून मजा पाहिल वगैरे वगैरे शिव्याशाप देणे / सुचवणे हे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.

ही सगळी उत्तरं 'विश्वास असेल तरच' लागू आहेत. Happy
------------
१. प्रार्थना म्हणजे देवावरच प्रेम व्यक्त करणं (असल्यास)
२. प्रार्थना म्हणजे मनाची अंघोळ..
प्रार्थना करताना/केल्यानंतर, देवापुढे बसल्यानं आपल्यातल्या वीकनेस वर, वाईट विचारांवर पुनर्विचार करून बदल घडवायची इच्छा निर्माण होते, ताकद मिळते (प्रत्येकाचं वेगळं असू शकतं). When I am sitting in front of god, I want to be better human being than I am currently.
३. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाला मिळणारा आधार (अर्थातच विश्वास असला तरच ): मनानं बळकट माणसांना ह्याची गरज पडणार नाही कदाचित. पण गरज आणि विश्वास असेल तर प्रार्थना नक्कीच मदत करते.
४. मदतीसाठी प्रार्थना करणं सर्वस्वी वाईट आहे असं नाही वाटत मला. आपण मागावं आणि देवाला 'तुला योग्य वाटे तेही देई' असं सांगावं..
--------------
माझा देवावर पुर्ण विश्वास आहे पण देवाला मी एखादी वस्तु मागितली तर ती वस्तु तो मला कधीच देत नाही (मिळु देत नाही ) आणि एखादि गोष्ट एका प्रयत्नात मिळुन जाते
>> आपल्याला साधनं दिली आहेत (डोकं, शरीर) - तर आपण प्रयत्न करायलाच पाहिजेत. जर गोष्टी आवाक्याच्या बाहेर असतील तर/मानसिक आधाराकरता/कॉन्फिडन्स येण्याकरता/ थोडासा पुश मिळण्याकरता प्रार्थना करावी..
देव लाख द्यायला निघाला तरी आपलीही लायकी आणि तयारी असायला पाहिजे ना ती मदत घेण्याची.
(उदा. उद्या कुणीतरी तुम्हाला खूप चांगली नोकरी द्यायला निघालं. ही नोकरी देण्याची त्या व्यक्तीची कपॅसिटी आहे, पण तुम्ही १० वी पासच नाही झालेलात, तर मदत अ‍ॅवेलेबल असूनही तुम्ही ती घेऊ शकणार नाही)
असं म्हणतात की आपण जन्माला येताना काय उपभोगायचं, काय भोगायचं हे ठरवून आलेलो असतो. त्यात फेरफार घडू शकतात, पण ते घडण्याकरता अ. आपल्या soul ची तयारी असावी लागते ब. आपल्याला मदत मिळण्याइतकी आपली ओळख असावी लागते क. प्रयत्न करावे लागतात.
त्यामुळे प्रार्थना केली आणि मिळालं, इतकं सोपं असेलच असं नाही.

'' प्रार्थणा '' हा विषय डोळ्या समोर ठेवुन जी शब्द सुमन तुम्ही येथे सांडलीत त्या बद्दल ............. झक्की , रेच्यु , किरण , इरोहित , ज्ञानेश , नताशा , नानबा , सर्वाचे धन्यवाद.

आपण मागावं आणि देवाला 'तुला योग्य वाटे तेही देई' असं सांगावं..

देवाला योग्य वाटेल तेच होणार असेल तर आपण मागायची आणि प्रार्थनेची तरी गरज काय आहे?