थालीपीठाची भाजणी ( 2 वाट्या ) किंवा ज्वारी +गहू+ बेसन +तांदूळ अस पीठाच combination करून घ्या ..एखाद दुसरा आवडत पीठ पण घालू शकता...
कोथिंबीर बारीक चिरून , लाल तिखट , ओवा , मीठ, जिरे पूड, तीळ , थोडसं दही ( आंबट १-२ चमचे ) , हिंग , तेल,
नाव पाहून वेगळे वाटतंय न ...
खर तर ही न फुगणारी थालीपीठ आहेत...तरीपण ह्याला असा का म्हणतात ते अजून कळलंच नाही.
आजीला पण उत्तर देता येत नाही... माग लागली कि वैतागून म्हणते....मुकाट्याने खायचं काम कर....
मी पण मग थालीपीठ आणि दही यावर concentrate करायचे .
ही थालीपीठे प्रवासात न्यायला पण उपयोगी आहेत...३-४ दिवस राहतात .
भाजणीमध्ये २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. त्यात कोथिंबीर, तिखट, मिठ, ओवा, हिंग, तीळ, दही आणि हळद घालून मिक्स करावे.
१५-२० मिनीटे तसेच ठेवावे. पीठाचे छोटे गोळे करावे, हे थालीपीठ हातावर थापायचे असते.... मध्ये एक छिद्र पाडून सावकाश तेलात सोडावे... सोनेरी रंगावर खरपूस तळून काढावीत...हे थालीपीठ थोडेसे जाडच असते...
सायीखालाचे दही घेऊन गट्टम करून टाकावीत..
प्लास्टिकचा कागदावर पण हाताने थापून करता येईल...
आता पाऊस पडायला सुरवात झालीय.... सर्व कुटुंबीय सिंहगड वर जाऊन तिथे पण फुग्याची थालीपीठे गट्टम करण्याचा Plan करतोय....
रेग्युलर थालीपीठात आणि यात
रेग्युलर थालीपीठात आणि यात काय फरक आहे?

नेहेमीच्या थापी साठीही मी असेच पीठ भिजवते (+ बारीक चिरलेला कांदा हे अॅडिशन). आणि थापून तव्यावर तेल सोडून खरपूस भाजायचे. तुम्ही ते तेलात तळायचं म्हणताय तसे आम्ही भाजणीचे वडे करतो. पण ते मस्त फुगतात. फुगले नाही तर कच्चे राहणार नाहीत का?
हो,, थालीपीठाचेच पीठ
हो,, थालीपीठाचेच पीठ असलयामुळे फार फरक पडत नाही....पण चवीत बद्ल नक्किच जाणवतो....
ज्वारी +गहू+ बेसन +तांदूळ पोट
ज्वारी +गहू+ बेसन +तांदूळ
पोट नै ना फुगणार ? नावावरूब शंका येते. धिरडं म्हणतात ते हेच का ?
नाही, धिरडं करायला पातळ
नाही, धिरडं करायला पातळ भीजवावं लगतं पिठ.
आणि थालिपीठाला भाकरी सारखं घट्ट.
तळलेले म्हणजे भाजणीचे वडे
तळलेले म्हणजे भाजणीचे वडे वाटत आहेत हे. फुगतात की ते.