ANZAC DAY
२५ एप्रिल हा ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमधे 'ANZAC DAY' म्हणून ओळखला जातो.
ANZAC DAY बद्दल मी LEST WE FORGET! - the ANZACs - एक शौर्य गाथा इथे माहिती लिहीली आहे ती जरूर वाचा.
यंदाच्या ANZAC DAY ला ANZAC बिस्किटांच्या बदल्यात या "अॅन्झॅक गोल्डीज" केल्या.
लागणारे जिन्नसः
१२५ ग्रॅम बटर,
दीड कप मैदा,
१/४ टीस्पून बेकिंग पावडर,
३ अंडी (हलकी फेटुन),
१ कप साखर,
१/२ कप ओट्स,
१/२ कप डेसिकेटेड कोकोनट,
१/४ कप गोल्डन सिरप (टीपा बघा),
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स,
२/३ कप व्हाईट कुकिंग चॉकलेट,
आयसिंग शुगर
१. सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सें ला तापत ठेवा. ऑव्हनप्रुफ ट्रे/लॅमिंगटन ट्रे ला बटर्/ऑईल्स्प्रे मारुन ग्रीस करुन त्यावर बटर पेपर पसरा.
२. एका मायक्रोवेव्हप्रूफ काचेच्या बोल मधे नरम बटर आणि व्हाईट चॉकलेट घ्या आणि १ - १ मिनीटाच्या इंटर्व्हल्स मधे जस्ट वितळून एकत्र होण्याइतपत गरम करा. मिश्रण बाहेर काढुन नीट मिक्स करुन घ्या.
३. बटर्+चॉकलेट मिश्रण जरा थंड होऊ द्या. यात आता साखर + व्हॅनिला + हलकी फेटलेली ३ अंडी आणि गोल्डन सिरप घाला आणि स्पॅट्युला/लाकडी चमच्याने नीट एकत्र मिक्स करा.
४. वरच्या मिश्रणात आता चाळलेला मैदा + बेपा हळुहळु मिक्स करा.
५. आता या मिश्रणात ओट्स आणि डेसिकेटेड कोकोनट मिसळा. सगळे नीट एकजीव होऊ द्या.
६. हे मिश्रण आता तयार ट्रे मधे ओता. वरतुन हवे तर व्हाईट चॉकलेट चे तुकडे पसरा.
७. १८० डिग्रीला साधारण २०-२५ मिनीटात सोनेरी रंगाच्या झाल्यावर आणि सुई/सुरी घातल्यावर क्लिन निघाल्या वर या 'गोल्डीज' बाहेर काढा.
८. गोल्डीज पूर्ण गार होऊ द्या. त्यावर आयसिंग शुगर भुरभुरवा आणि त्याचे चौकोनी तुकडे करुन चहा/कॉफी बरोबर गट्टम करा
१. गोल्डन सिरप म्हणजे खरतर साखरेचा पाकच. पण यात पाणी वापरलेले नसते. गोल्दन सिरप नसेल तर साखरेचे प्रमाण दीड कप करा किंवा १ कप साधी साखर +अर्धा कप ब्राऊन शुगर,
२. मुळ रेसिपीमधे व्हाईट चॉकलेट नाहिये. त्यामुळे चॉकलेट घातले नाही तरी चालेल.
३. अयसिंग शुगर भुरभुरताना ती बारीक जाळीच्या गाळण्यात घाला आणि मग हलकेच पसरा. एकसारखी सगळीकडे पसरेल.
तरीच म्हटले आज लाजो कुठे गायब
तरीच म्हटले आज लाजो कुठे गायब झाली.
अजुन एक जबरी रेसीपी. माझ्या इथे शेफला सांगतो कशी करायची ते. कदाचीत येत असेल त्याला..
अंड खात नाही गं मी दुसरं
अंड खात नाही गं मी
दुसरं काही टाकता येत नाही का?
एक मस्त पाककृति...दिसायला
एक मस्त पाककृति...दिसायला बरेचसे केक सारखेच पण चव केक पेक्षा सुंदर असेल ना?करुन पाहीन कधीतरी जमेल तेव्हा.
कसलि आहेस तु!!! एक्दम मस्त
कसलि आहेस तु!!! एक्दम मस्त दिसत आहेत गोल्डीज
मस्त!!!
मस्त!!!
छान, पोटभरीचा प्रकार आहे हा.
छान, पोटभरीचा प्रकार आहे हा.
खूपच छान पाककृती. दिसायला
खूपच छान पाककृती. दिसायला सुंदर तर आहेच , चवही छान असेल यात शंका नाही!
बिना अंड्याचा होइल का?
बिना अंड्याचा होइल का?
धन्यवाद आश, रिया, अॅन्झॅक
धन्यवाद
आश, रिया, अॅन्झॅक बिस्किटे बीना अंड्याची असतात. हवी असल्यास पाकृ देइन
मस्त लाजो. नक्की बनवणार.
मस्त लाजो. नक्की बनवणार.
खूपच छान
खूपच छान पाककृती....................कधि वेळ मिळतो ?? .....
वॉव! लाजो कधी ग वेळ मिळतो
वॉव! लाजो कधी ग वेळ मिळतो तुला.
जळजळ होतेय माझी
नेक्स्ट टाईम घेऊन ये माझ्यासाठी.
आत्ताच करुन पहिला. फार मस्त
आत्ताच करुन पहिला. फार मस्त झाला होता. फक्त साखरेच प्रमाण कमी केले. धन्यवाद लाजो
स्स्स्लर्प .......लाजो ..क्या
स्स्स्लर्प .......लाजो ..क्या बात है!!!!!!!!!
आगागागा लाजो!
आगागागा लाजो!
लाजो, ____/\_____
लाजो, ____/\_____
अगं काय पट्टीने इंच इंच मोजून
अगं काय पट्टीने इंच इंच मोजून तुकडे काढलेस की काय? कस्सले सारख्या मापाचे आहेत!
बाकी पाकृ बेष्टच!
लाजो, मला ईंटरनेटवर कुकीजची
लाजो, मला ईंटरनेटवर कुकीजची रेसीपी मिळाली, पण केक जास्त आवडतो कुकीजपेक्शा
म्हणुन विचारत होते.
आजच या रेसिपीनं मी ब्राउनी
आजच या रेसिपीनं मी ब्राउनी केली - कारण चॉकलेट चिप्स वापरल्या आणि मैद्याऐवजी कणिक वापरली. मिश्रण थोडं घट्टं वाटलं म्हणून दूध घातलं. कणिक वापरली म्हणून बेकिंग पावडर थोडी जास्त घातली.
महाप्रचंड यम्मी झाल्या आहेत. लाजो, या रेसिपीकरता धन्यवाद.
आवनमध्ये ठेवण्यापूर्वी :
तयार झाल्यावर :