मदनबाण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 April, 2012 - 03:09

मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते. फुलाच रुपही तितकच मनमोहक असत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुले.. बापरे कित्येक वर्षात हा शब्दच कानावर पडला नव्हता..
तुझ्याकडे यायलाच पाहिजे आता.. मदनबाण पाहायला Happy वॉव्..लक्कीयेस!!!

जागू, माझ्या माहेरी आहे मदनबाण.. आमच्याकडे मिळत नाही.. Sad
खुप सुंदर फुल आहे, तुझी फोटोग्राफी पण मस्त.. Happy

जागू, फुले सुंदरच आहेत पण, तू गुंफलेला गजरा बघायचा होता.
पुर्वी लाल काठाच्या, निळ्या साडीला पण मदनबाण म्हणत असत. आता तशा साड्या
दिसत नाहीत !

मोनाली नक्की ये.

पद्मजा, वर्षू, सारीका,एकोणतीस, सुक्षम, प्रिती, धन्यवाद.

दिनेशदा तेवढी फुले नाही निघत. रोज ४-५ येतात.

मस्त ! जागु पावसाळ्यात त्याच्या फांद्या कापुन आणखीन लाव म्हण्जे मग गजरा करता येईल Happy

मोगर्‍यांच्या कुळातील >> नाही जास्मिन आहे त्यांचे कुळ/कुटुंब! खुद्द मोगरा जास्मिन वर्गात मोडतो.

मदनबाण पहिल्यांदाच बघत आहे. धन्यवाद जागो..

जागू, नाही जास्मिन म्हणजे मोगरा नाही!
जास्मिन हे कुटुंब झाले. जास्मिन वर्गात मोगरा मोडतो. ह्या वर्गात मोडणारी फुले ही शुभ्र आणि सुंगधी असतात. तू विकिचे पान वाच जास्मिनवरचे मग आणखी छान माहिती मिळेल.

अहाहा, किती वर्षांनी मदनबाणाचं फूल बघितलं!

घरी याची, नागपुरी भाषेत, 'बागड' होती. म्हणजे एक अख्खा वाफा, कुंपणासारखा. याच्या सुगंधानं कधी डोकं दुखत नाही असं आजी म्हणायची आणि ते खरंच होतं.

जागू..... तुझे एकेक विषय म्हणजे...अगदी काळजाला हात घालतात. प्राजक्त, बकुळ, अनंत, मोगरा, चाफा आणि आता मदनबाण! मदनबाण सर्वात आवडता. मुंबईत अगदी कमी जणांकडे याचे गजरे मिळायचे. नोकरी करत असताना चर्चगेटला माझी नेहमीची गजरेवाली खास माझ्यासाठी हे गजरे राखुन ठेवायची. अशी सुगंधीत आठवण करुन दिल्याबद्दल तुझे किती आभार मानु कळत नाही. मनापासुन धन्यवाद! ईथे अशी फुले मी खुप मिस करते.

अशीच फुले येणारी मोगर्‍याची वेल माझ्याकडे आहे. वेल असल्याने मदनबाण आहे की नाही माहीत नाही पण घरात अगदी मस्त सुगंध पसरलेला असतो.

व्वा जागू! सुंदर!
बालपणी मीही याचे गजरे वेणीवर(हो....मुलींना वेण्या असायच्या त्याकाळी!) मिरवलेत.
घरच्या बागेत खूप फ़ुलझाडं होती. सध्या माझ्याकडेही एका वेलीवर अगदी १०/१२ च फ़ुलं येऊन गेली. पण तो मोगरा आहे की मदनबाण लक्षात येत नाहीये. आत्ता तर वेल जरा होरपळल्यासारखाच वाटतोय. पुन्हा फ़ूल आलं की फ़ोटो टाकीनच.

बी वाचून पाहते धन्स.

कंसराज, वेका, शांकली, मृण्मयी, जिप्सि, मानुषी, सुरश धन्यवाद.

सेनापती नक्की या.

रुनी, मानुषी फोटो टाका म्हणजे कळेल.

विद्याक खरच आपण ज्या वातावरणात लहानपण घालवतो त्या वातावरणातील काही सुखद गोष्टी आपल्यामनात घर करून कायमच लपलेल्या असतात.