Submitted by Geetanjalee on 23 April, 2012 - 06:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो दोडक्याच्या शिरा , कड़ी पाला , लसूण, शेगादाण्याचा कूट, तेल , मीठ , मिरची , हिंग , जिरे
क्रमवार पाककृती:
पाव किलो दोडक्याच्या शिरा कडून तेलावर खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या .
नंतर तेलावर हिंगाची फोडणी टाकून परतून घ्या. शिरा परतताना मिरची पण परतावी.
ह्यात कांदा बारीक चिरून फोडणीत घातला आणि परतले तरी खूप छान लागते....
वाढणी/प्रमाण:
आवडेल तसे
माहितीचा स्रोत:
आजी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा प्रकार मस्त आहेच!
हा प्रकार मस्त आहेच!
इथे या पाकृवर चर्चा आहे.
इथे या पाकृवर चर्चा आहे. दोडक्याच्या (शिराळ्याच्या) शिरांची चटणी
हे मस्त लागतं! मी तव्यावर
हे मस्त लागतं! मी तव्यावर थोड्याशा तेलात जीरं मोहरी, तिखट फोडणी देउन व दोडक्याच्या शिरा खरपुस भाजते. चवीपुरतं मीठ घातलं की तशाच कुरकुरीत छान लागतात.
कढीपत्ता, लसूण न घालता, भरपूर
कढीपत्ता, लसूण न घालता, भरपूर तीळ फोडणीत घालून पण मस्त लागते ही चटणी. मी पोळ्या झाल्यावर तव्यावर शिरा आधी कोरड्याच खमंग भाजून घेते. आता या प्रकाराने पण करून पाहीन.
आम्ही ही चटणी तव्यावर शिरा
आम्ही ही चटणी तव्यावर शिरा तळून घेतल्यावर त्याच तव्यात खोबर, बडीशेप, जिर, मिरची, चिंचेचा कोळ, किंचीत गुळ, तिळ असे टाकून ते वाटून त्याची चटणी करतो. पावसाळ्यातील अगदी आवडती चटणी असते ही आमच्याकडे.
माझी आजी सुदधा असच करते:) छान
माझी आजी सुदधा असच करते:) छान लागते...मला दोड्का आवडत नाही ही चटणी मात्र आवडीने खाते
माझी आई करायची चटणी त्यात
माझी आई करायची चटणी त्यात लसूण न घालता सुक खोबरं, तीळ घालायची. खुप मस्त लागयची अशी चटणी.
भाजीपेक्षा हि चटणीच आमच्याकडे
भाजीपेक्षा हि चटणीच आमच्याकडे जास्त आवडते. पण आमच्याकडे हि वाटत नाहीत.
आमची दोडक्याच्या शिरांची चटणी
आमची दोडक्याच्या शिरांची चटणी अशी असते:
तेलाची मोहोरी, हिंग, कढिपत्ती, हि.मिरच्याचे बारीक तुकडे घालून फोडणी करायची. त्यात तीळ भरपूर घालायचे. त्यावर शिरा(दोडक्याच्या!) घालायच्या, चवीपुरते मीठ घालून कुरकुरीत होईपर्यंत परतायचं.
होत आलं की अगदी थोडं दाण्याचं कूट आणि १ चिमूट साखर! झालं.
मी पण वेग्ळी पद्ध्त करून
मी पण वेग्ळी पद्ध्त करून पाहीन.....
Geetanjalee
http://pot-puja.blogspot.in/