Submitted by ट्युलिप on 28 May, 2009 - 14:03
पार्ल्याची खाद्यसंस्कृती म्हणा, परंपरा म्हणा नाहीतर खादाडी म्हणा. ती चविष्ट, चारीठाव आहे ह्यात काहीच वाद नाही. अगदी बाबू वडेवाल्यापासून, शर्मा पाणीपुरीवाल्यापर्यंत आणि आरके पासून कॅफे मैलू पर्यंत ती पार्ल्याच्या गल्लोगल्ली पसरली आहे. चला तर. सगळे रेसिडेन्ट आणि नॉन रेसिडेन्ट पार्लेकर्स मिळून लिहूयात इथे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी, मंगळूरापर्यंत कुरिअर
नंदिनी, मंगळूरापर्यंत कुरिअर सर्व्हिसची शक्यता फक्त गोडबोले स्टोर्सचीच वाटतेय. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघ. फोन किंवा मेल केलीस तर लगेच माहिती मिळेल.
चमकी बघते विचारुन. पुण्याबद्दल कल्पना नाही.
विष्णू स्टोर्स परदेशात फराळ
विष्णू स्टोर्स परदेशात फराळ पाठवतात. मंगळूरला पाठवतील का ते माहित नाही.
नंदिनी- पणशीकरची वेब लिंक -
नंदिनी- पणशीकरची वेब लिंक - भारतात कोठेही दिवाळी फराळ भेट पाठवण्याची. http://www.panshikar.com/orderFrm2.asp?ID=164
ओहोहो!!! खूपच उपयुक्त
ओहोहो!!! खूपच उपयुक्त माहिती!!!
मनापासून धन्यवाद मन्डळी!!
सर्वान्ना दिवाळीसाठी हार्दिक शुभचिन्तन!!!
धन्यवाद लोक. माझा मेन दिवाळी
धन्यवाद लोक.
माझा मेन दिवाळी प्रॉब्लेम अडणार आहे, आनरसे आणि करंज्यासाठी. बाकीचं सर्व इकडे विकत मिळेल.
गजाली : मासे प्रेमींचे पार्ले
गजाली : मासे प्रेमींचे पार्ले मधे आवडते ठिकाण <<<<<<
मला एक सान्गा, गजाली मधे शाकाहारी पण मिळ्ते का? आणि चिकन पण? कि फक्त मासे?
स्पेशल लन्च साठी माहिती हवी आहे.. आमचा ग्रुप - अर्धा अट्ट्ल मासे खाऊ आणि आम्ही बाकीचे अर्धे शाकाहारी..... दोन जण फ्क्त चिकन वाले !
: आता सान्गा बरे!!
सगळं जमतं गजालीमधे.
सगळं जमतं गजालीमधे.
जुहूचं महेश लंच होम पण मस्त
जुहूचं महेश लंच होम पण मस्त आहे.
चितळे बाकरवड्या आणि श्रीखण्ड
चितळे बाकरवड्या आणि श्रीखण्ड घेतलेच झडप घालून!>>
हे तर मुंबइत बहुतेक ठिकाणी मिळत. शिवाय चिताळेंची रेडि टु कुक पण बर्याच गोष्टी मिळतात.
धन्यवाद मन्डळी!! ( .. आता हे
धन्यवाद मन्डळी!! ( .. आता हे सारखे सारखे नाही म्हणणार हा! खरच, मायबोली माझी 'माहेरा'ची उणीव भरून काढतेय! )
हे तर मुंबइत बहुतेक ठिकाणी मिळत >>> हो, आता हळू हळू दिसायला लागलेय सगळे.. इथे आल्या आल्या आधी चार महिने पाऊस.. ८ ते ८ ऑफीस.. वीक एण्ड्स ना घर आणि पिल्लू... यातून आता जरा बाहेर डोकावणे सुरु केलेय.. तोपर्यन्त कान्दिवली मधे अवती भवती 'स्वर्णिम गुजरात' पाहून पाहून रेस्ट्लेस झाले होते खरी!
अरे हो, नीधप ताई, पार्ल्यात
अरे हो,
नीधप ताई, पार्ल्यात येऊन गेले हो फराळासाठी! 'पणशी़कर' मस्त! पण प्र-च-ण्ड गर्दी आणि कमी वेळ म्हणून 'रघूवीर' मधून घेतले सगळे!.... बेसन लाडू सुरेख!! आणि 'शर्माची पाणीपुरी' पण खाल्ली! सार्थक झाले अगदी सगळ्या धडपडीचे!!
शर्माच्या पाणीपुरीबद्दलचा
शर्माच्या पाणीपुरीबद्दलचा शर्मिलाताईंचा अनुभव 'बाहेरचे खाणे' अश्या एका बाफवर आहे तो जरूर वाचून घेणे.
बाकी शर्मा पाणीपुरीची मी अजिबात फ्यान नाही बर्का..
आम्ही गणेशप्रेमी..
बादवे मी ज्या एस्व्ही रोडवरच्या इर्ला बसस्टॉप मागच्या भेळ-पापु वाल्याबद्दल मागे एकदा तोंड भरभरून कौतुक केले होते तो आता तिथून शिफ्ट होऊन इस्टात, मार्केटात आलेला आहे. सहकार भांडारचं दार आहे त्याच लायनीत. श्यामकमल मधेच.
शर्मिलाताईंचा अनुभव 'बाहेरचे
शर्मिलाताईंचा अनुभव 'बाहेरचे खाणे' अश्या एका बाफवर >>>> बापरे! न वाचलेलेच बरे....
एस्व्ही रोडवरच्या इर्ला बसस्टॉप मागच्या भेळ-पापु वाल्याबद्दल >>> पुढच्या वेळी नक्की!
आम्ही पण गणेशप्रेमीच, पण पुण्यातली 'गणेश भेळ'... "आमची कोठेही शाखा नाही" अशी पुणेरी पाटी न लावता त्यांनी पुण्यातच ठि़कठिकाणी शाखा उघडल्या आहेत...ती आणि ही एकच आहे की काय?!!
नाही ते आणि हे वेगळे. भेळेची
नाही ते आणि हे वेगळे. भेळेची चवही वेगळी.
रविवारी नाटक बघण्याच्या
रविवारी नाटक बघण्याच्या निमीत्ताने माझी आणि सासुबाईंची पार्ला वारी झाली. 'गजाली' (दुपारच जेवण) आणि 'मालवणी आस्वाद' (रात्रीच जेवण) दोन्ही ट्राय केल. पण आस्वादच वरचढ हा. कोलंबी एकदम फ्रेश तेवढी गजाली मधली वाट्ली नाही. भाकर्या पण अगदी मउसुत. तिसर्या, कोलंबी, पापलेट सगळ्याच करी एकदम छान होत्या.
गाजली चे जेवण चांगले असते पण
गाजली चे जेवण चांगले असते पण अजून A /C का नाही.... पैसे दणक्यात घेतात
गजालीला A/C आहे. दोन वेगळे
गजालीला A/C आहे. दोन वेगळे सेक्शन आहेत. पण A/C म्ध्ये थाळी मिळत नाही.
नमस्कार
नमस्कार लोकांनो..................... मी इथे जिवंत झालोय............
बागेसमोरचा वडापाव/ शर्माच्या
बागेसमोरचा वडापाव/ शर्माच्या बाहेरच्या गाडीवरचा?? खासच असतो कि..
पार्ल्यातली खादाडीची ही सगळी
पार्ल्यातली खादाडीची ही सगळी माहिती वाचून अख्खा पार्ला फिरून झालं, शालेत असताना सायकलवरून फिरायचे तस्सच.
मालवणी आस्वाद कुठे आहे?
गजालीचा दर्जा खरच खूप खालावलाय. गजाली व्हायच्या पूर्वी तिथे कॅनरा म्हणून हॉटेल होतं छोटसं त्ये एक्दम ब्येश्ट होतं मासे खायला. त्यांच्याकदे कुर्ल्या पण काय मस्त मिळायच्या, भरलेल्या आणि चवीश्ट. गजालीचं जेवण सुरुवातीला छान होतं.
हनुमान रोड्च्या रुचिचे मालक आणि चॅम्पियनचे मालक दोघेही गुजराती आहेत.
सप्रे यांच दुकान विसरले सगळे. पितळेंच्या जागी आलेलं सीसीडी सुद्धा बंद झालं. आता पार्ला कॉलेजबाजूचं (साठये नाही म्हणवत अजून सुद्धा) नॅचरल्स बंद होऊन तिथे सीसीडी सुरु झालय. परवा दिवाळीमध्ये आम्ही आमच्या बॅचचे १२ जण भेटलो होतो. आणी मग गोकुळ्वर गेलो, आयसीआयसीआय शेजारी. अरे गोकुळला सुद्धा विसरले सगळे. कटिंग चाय आणि कट्टेगिरी... ट्रेक्स्ची डिस्कशन्स, हिरवळ पाहाणे इत्यादी सगळे तिथे बसूनच करायचे ना? गोकुळच्या बाजूला सुद्धा एक कारवारी मावशींचं दुकान होतं ते आहे का नाही लक्षात नाही आलं.
फार्फार पूर्वी जीवन हे पार्ल्यातलं ब्येश्ट हॉटॅल होतं शाकाहारीं साठी.
आणि नाटक पाहाताना, दिनानाथचा वडा आणि पट्टी सामोसा...
पेट्रोलपंपासमोरच्या गल्लेतलं भोगले यांचं सिंधुसुद्धा मासे खाण्यासाठी छान होतं अजून आहे का ते?
पार्ला वेस्टची एन एम कॉलेजसमोरची खाऊ गल्ली - अमूल बटर वडापाव, ग्रिल सँडविच, डोसा.
मला आत्ताच्या आत्ता पार्ल्यात जायचय. सायकलवरून सगळं फिरायचय. खूप खूप खायचय. ( डोळ्यातून अश्रु वाहाणारी बाहुली)
वल्लरी, दीनानाथचा वडा आणि
वल्लरी,
दीनानाथचा वडा आणि पट्टी सामोसा माझाही फेवरेट कारण माझे बाबा दिनानाथ मधेच Stage Attendant म्हणून नोकरीला होते. प्रत्येकवेळी शेजार्यांसमोर फुशारक्या मारून जायचो आम्ही आज अशोक सराफना बघणार आहे तर कधी आज अंकुश चौधरी तर कधी प्रशांत दामले. बाबांच्या नोकरीमुळे खूप मराठी तारे-तारकांना जवळून पाहता आलं. आणि दरवेळी तिथे गेल्यावर स्टेशन बाहेर मिळणारं ते मसाला छास २-३ ग्लास प्यायल्याशिवाय पोटच नाही भरायचं गं. आणि नाटक बघून झालं कि खाली पाणीपुरी खायची आणि उशीर झाला असेल तर गजाली मधलं चविष्ट जेवण आणि व्हेज खायचं असेल तर गीता रिफ्रेशमेंट मधली थाळी.
खरंच खूप सुंदर होतं ते बालपण!
आशिता, कसला ग योगायोग, पार्ला
आशिता, कसला ग योगायोग, पार्ला आणि बोरिवली. आपल्यासारखे अजूनही असतील ना मनाने पार्लेकर आणि आता बोरिवलीकर.
गीता रि. च्या सांबारची चव अजून तशीच आहे.
पार्ल्यात खादाडी गटग करूया कधीतरी.
मी पार्ल्यात आलेय रहायला.
मी पार्ल्यात आलेय रहायला. वरचं सर्व वाचून काढलं. आता एकेक ट्राय करणार.
सर्वात आधी पाणीपुरी/भेळेने सुरुवात करीन.
वर्षा, पार्ल्यात स्वागत
वर्षा, पार्ल्यात स्वागत
थँक्स आडो
थँक्स आडो
वर्षा स्वागत. पाणी पुरी
वर्षा स्वागत. पाणी पुरी भेळपुरी करता नीधप नी सांगितलेल्या गणेश पासून सुरवात कर .मग तिथून हनुमान रोड ला ये तिथे शाळेच्या जवळ बाबूचा वडा-पाव/कोथिम्बिर वडी अप्रातिंम .हनुमान रोड वरच पणशीकर,डेफोडील्स . .मग वाघ बकरी ,रुची सागर. पुरेपुर कोल्हापूर , तोसा,गीता लंच होम,आरके.जोवन.शिवसागर.सम्राट वडा पाव ( नेहरू रोड ) आणखीन खूप खूप काही . धमाल कर
मी 1986-1990 पार्ल्यात
मी 1986-1990 पार्ल्यात कॉलेजला जुहूतून येत होते तेव्हाही ही बरीच ठिकाणे होती.
पितळेंच्या दुकानाच्या जागी
पितळेंच्या दुकानाच्या जागी असलेलं सीसीडी पुन्हा सुरू झालय. काल पणशीकरांकडचं पियुष प्यायले. जेवायची गरजच नाही वाटली.
पणशीकर कायच्याकाय महाग नाही
पणशीकर कायच्याकाय महाग नाही वाटत का तुम्हांला?
सुजा, रुचीसागर केव्हाच बंद झालंय. त्याच्या जागी 'मी मराठी' आहे आता.
आऊटडोअर्स हो ग हो. माझ्या
आऊटडोअर्स हो ग हो. माझ्या सारख रुची सागरच डोक्यात येत . त्यावेळी बरेच वेळा गेलो होतो त्यामुळे.
आत्ता "मी मराठी" मध्ये मात्र जात नाही त्यामुळे पुर्वीचच नाव डोक्यात बसलय खर
Pages