एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्यांचा फक्त विंग्रजीला विरोध असेल.
नाय हो, हिंदीला पण विरोधच आहे. पटकन आठवलं नाही. तुम्ही सांगितलंत त्याबद्दल खरंच धन्यवाद.
>>नको तिथे हिंदी कशाला? आँ?
अगदी बरोबर Happy

>>आता तुम्हाला का नारळ आठवतो ते सांगा ना..
त्याचा चेहरा, आणि मुख्य म्हणजे केशरचना विचित्र आहे. नारळाच्या शेंड्यासारखी. म्हणून म्हटलं नारळ आठवतो.

झंपी, वरणभात Rofl

खरंच हा स्वप्निल मला आधी आवडायचा... एल्दुगो पाहून पाहून जामच बोअर वाटायला लागलाय.

मात्र मी यातले छोटो छोटे विनोदी प्रसंग खुप एन्जॉय करते... काल सॉनियासमोर राधा ज्या प्रकारे अ‍ॅग्रेसिव्हली डिफेन्सिव्ह झाली, तो प्रसंग तर खुप्प्प्प्प्पच आवडला. Happy

मानव आणि सॉनिया फार हसवतात बुवा Lol आणि ते घनाचे मित्र त्यांची काय ती नावं भुसन्या-बिसन्या... Biggrin

(जसं, कहानी घर घर की आणि क्यूं की... नंतर गुज्जु लोक आपांपसांत भेटले की किंवा फोनवर बोलताना 'जय श्री कृष्ण' म्हणायला लागले. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी कुठे होती ही पध्दत? )>>>>

ही पध्धत गुजराथी आणि कच्छी लोकांत फार पुर्वी पासुन आहे. साधारणतः जे कच्छी सिंध प्रांतातले असतात किंवा सौराष्ट्र मधले असतात त्यांच्यात ही पध्धत आहे. ते लोक फक्त क्रुष्णाला मानतात. मी ज्या कंपनीत काम करते त्यांच्या मालक लोकांत ( जे कच्छी भाटीया आहेत) ही पध्धत आहे. त्यांच्या शी बोलताना किंवा त्यांचा फोन आला की ते " जय श्री क्रुष्ण" म्हणतातच. त्यांच्या प्रोफाइल कडे बघुन ते टी.व्ही. सीरीयल पहात असतिल असे चुकुनही वाटत नाही. दुसरे म्हणजे त्यांचे एक मेहुणे दुबईत व एक जण कॅनडात रहातात. ते ही हे संबोधन वापरतातच. आणि आमच्या ऑफीस मध्येपण हे सर्रास वापरलं जातं. हे लोक नाथद्वाराच्या श्रीनाथजींना खुप मानतात. त्यांच्या टेबल वर, घरात आणि कधी कधी त्यांच्या संस्थांच्या ऑफीस मध्ये पण राधा क्रुष्णा ची मुर्ति असतेच.

त्यामुळे कोणी फॅशन म्हणुन म्हणत असतिल, पण हे संबोधन प्रचलित आहे. फक्त सीरीयल बघुन आलेले नाही.

झंपी.. आम्ही मुम्बैकर देखिल अशा पोरांना "तूप-मीठ-मऊभात" म्हणतो Proud पण स्वप्नील तेवढापण नाहीये!

उंमाझो बघताना मला नीची भारी आठवण येते.. साड्यांच्या सेफ्टीपिना, राखाडी फिरत्या इंग्लिश रंगाची साडी इ. इ. बाकी सगळे यथा तथाच.. !

एलदुगो.. बरेचदा पकवते.. पण काही प्रसंग बरे असतात.

मला सॉन्या जाम आवडते हल्ली Happy . खरं नांव काय तिचं ? ह्या सीरियलमध्येच पहिल्यांदा बघतेय मी तिला Happy

ए मुलांनो.........त्या स्वप्निल जोशीचं चक्क लग्न झालं......खरं खुरं.......... फेसबुकावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो झळकतोय Happy

ए मुलांनो.........त्या स्वप्निल जोशीचं चक्क लग्न झालं......खरं खुरं.>>>>

हे दुसरं आहे. पहिलं २ वर्षांपुर्वी मोडलं. आधीची डेंटीस्ट होती अत्ता ची पण डेंटीस्ट आहे.

आधीची डेंटीस्ट होती अत्ता ची पण डेंटीस्ट आहे.>>>>>> याला दातांचा प्रोब्लेम आहे का ? फुकटात उपचार करुन घेण्यासाठी बायको करतोय का ?

उदय Rofl

आणि ते घनाचे मित्र त्यांची काय ती नावं भुसन्या-बिसन्या>>>>>>>आणि कुम्या!>>>> हीहीही आणि राधाचे ते म्हणणे ' भुसन्या.... ही असली नावं आहेत तुझ्या मित्रांची?' जाम धमाल Happy

आणि ते घनाचे मित्र त्यांची काय ती नावं भुसन्या-बिसन्या>>>>>>>आणि कुम्या!>>>> हीहीही आणि राधाचे ते म्हणणे ' भुसन्या.... ही असली नावं आहेत तुझ्या मित्रांची?' जाम धमाल Happy

स्वप्नील जोशीला अभिनय येतो हे काही पटत नाही. आजकाल नट, नट्यांना किती फिट रहावं लागतं तसाही तो नाही. उगीच जाड व्हायचं आणि सॉफ्टवेअर ईंजि. असल्याच्या नावाखाली ते लपवायचं.:)

झंपी,
विशिष्ट शहरात वरणभात मॉडेल असा एक शब्द प्रयोग पण वापरात आहे.
तो लिंगनिरपेक्ष आहे ते आजच कळले. Happy

मोडलं म्हणजे ठरलेलं लग्न मोडलं, की काडीमोड झाला?>>>>

काडीमोड झाला. एका मुलाखतीत त्याने सांगीतलं होतं. मटा मध्ये आली होती मुलाखत.

बाप्रे.

हि बातमी जुनी झाली.
पहिले लग्न झाले तेव्हा मटात दिवाळीला अक्ख पानभर मुलाखत होती की स्वप्नील एकदम ह्यांव आहे, त्यांव आहे, सिनेमात काम केले तरी बिलकूल फ्लर्ट नाहीये वगैरे वगैरे. काय कौतुक गायलेले.
ती पण दाताचीच डॉक्टर होती, बालपणाची मैत्रीण का काय ते.

(मी फक्त पेपरात आलेली माहीती पुरवलीय.)

स्वप्निल चं हे दुसरं लग्न अ‍ॅरेंज्ड आहे. घरच्यांनी, पत्रिका वगैरे बघुन जमवलेलं. स्टार माझा च्या, एका मुलाखतीत त्याने स्वतःच हे सांगितलय. तुनळी वर आहे. त्याच्या दुसर्‍या बायकोचं नाव लीना आराध्ये. ती औरंगाबाद ची आहे. डिसेंबर २०११ मध्ये झालं हे लग्न.

मंडळी : नट नट्यांच्या पर्सनल लाईफ वर कॉमेंट करण्यापेक्षा ते काम करत असलेल्या मालिकेवर कॉमेंट्स करुयात का? मला वाटतं या धाग्याचा उद्देश पण तोच आहे.

कालच्या भागावरून असं वाटतय की कहानी मे थोडा थोडा (पण अपेक्षित असा) ट्विस्ट येऊ घातला आहे.
कालचा भाग संपताना दाखवलेली राधाची चिडचिड नैसर्गिक वाटली.

काल चा मस्त होता............. वडील आणि राधा मधले संवाद छान होते...............जास्त मेलोड्रामा न करता दोघांनी सुंदर निभावले

Pages