Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"जेवण बनवणे" एक वेळ चालू
"जेवण बनवणे" एक वेळ चालू शकते.
पण एका बाफ़वर एका आयडीने मला चक्क "जेवण करायचा फ़ार कंटाळा येतो" असं लिहिलं होतं त्यावर मी गंमतीत ,"अरे अशी कशी गं तू ? आम्हाला नाही बाई जेवण करायचा कंटाळा येत.....एक वेळ जेवण बनवण्याचा येईल." तर तिला बिचारीला पन इंटेंडेड कळलंच नाही. तिला जरा राग आला.
ती म्हणाली,"मानुषीताई कधी कधी येतो माणसाला कंटाळा.तुम्हाला नाही येत का कधी?"!!!!!!!!!
भाषेतले कंगोरे झिजत चाललेत.
उदा. त्याची मदत केली.
साधना>>>>>>कस आहे ना>>>>>>>>> +१००
खरंच अस कुणी म्हणत नाही.
कसं आहे ना, कसं असतं ना.. हे
कसं आहे ना, कसं असतं ना.. हे मी ऐकलंय, माझ्या बोलण्यातही असतं.
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी प्रकरण आहे. मला सुरूवातीला कानाला चावायचं ते. आता अंगवळणी पडलं.
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी प्रकरण आहे.>> हो हो अगदी खरं. मी पक्की मुबैकरीण आहे. मी पण असच बोलते.
फायनल ड्राफ्टच्या लकबी>>
फायनल ड्राफ्टच्या लकबी>> अनुमोदन
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी
जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी प्रकरण आहे >>> काही वर्षांपूर्वी मुंबईत काय, कुठेच हे ऐकू येत नव्हतं. टी.व्ही.मालिकांमुळे इतर अनेक गोष्टी जशा सहीसही उचलल्या गेल्या, तसंच हे.. त्याचा वापर इतका वाढला की तेच बरोबर आहे असं वाटायला लागलं. (जसं, कहानी घर घर की आणि क्यूं की... नंतर गुज्जु लोक आपांपसांत भेटले की किंवा फोनवर बोलताना 'जय श्री कृष्ण' म्हणायला लागले. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी कुठे होती ही पध्दत? )
नाही लले जेवण बनवणे हे
नाही लले जेवण बनवणे हे कोकणातून मुंबईत आलेल्या बहुसंख्य मराठी (कदाचित ब्राह्मणेतर) घरांमधे आहेच. मालिकांचा संबंध नाही.
अर्थात एलदुगो मधल्या कुटुंबात ते बरोबर वाटत नाही.
एफेमवरच्या मराठी उद्घोषिका
एफेमवरच्या मराठी उद्घोषिका कार्यक्रम संपवताना 'क्ष आपली अनुमती घेते/ कार्यक्रम संपवण्याची क्षला अनुमती द्या' असे म्हणतात. हिंदीतल्या आज्ञा दीजिए प्रमाणे.
त्यांना मराठीतले निरोप /रजा पुरत नाहीत.
फायनल ड्राफ्टच्या लकबी >>>
फायनल ड्राफ्टच्या लकबी >>> हुश्श !! मला काय ते नेमकं कळत नव्हतं तिचा अभिनय बघताना ! थँक्यू सो मच ललिता ! अचूक ओळखले तुम्ही
नीधप, १००% अनुमोदन. >>जेवण
नीधप, १००% अनुमोदन.
>>जेवण बनवणे हे खास मुंबई मराठी प्रकरण आहे. मला सुरूवातीला कानाला चावायचं ते. >>>>> मला पण माझ्या मुंबईच्या मैत्रिणी बोलतात तेव्हा चावतं ते. पण आता मी पण कधी कधी बोलते तसं.
"कसं आहे ना" हे सुध्दा बरेचजण सर्रास बोलतात. त्यात काही गैर नाही.
फायनल ड्राफ्ट काय आहे? मुक्ताचे नाटक की सिनेमा??
आज मानव हा अमानवी प्राणी आणि
आज मानव हा अमानवी प्राणी आणि सोनिया (सॉनिया) यांनी मला त्रास देण्याच्या आतच मालिका बंद केली.;)
काल सॉनियासमोर राधाने आक्रमण
काल सॉनियासमोर राधाने आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग अवलंबिताना बिग बी सारखा स्टान्स घेतला होता.
फायनल ड्राफ्ट - नाटक आहे.
फायनल ड्राफ्ट - नाटक आहे.
भरत मयेकरांना
भरत मयेकरांना अनुमोदन.
स्वप्निल जोशी अभिनय करतो आणि छान करतो असा समज असणार्यांपुढे माझा साष्टांग दंडवत.
तो डोक्यात जायला लागलाय.
मालिकेकडून असलेल्या अपेक्षांची अजिबात पुर्ती झाली नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणी प्रमाणे गत आहे.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'उंच माझा झोका' बघावी, तीच चांगली आहे. (या मालिकेपेक्षा चांगली असे तूलनात्मक म्हणणार नाही कारण हे म्हणजे अमिताभ बच्चन हा विश्वजीतपेक्षा उत्तम अभिनय करतो असं म्हटल्यासारखं होईल. तूलनाच नाय हो!!)
स्वप्निल जोशी अभिनय करतो आणि
स्वप्निल जोशी अभिनय करतो आणि छान करतो असा समज असणार्यांपुढे माझा साष्टांग दंडवत.
तो डोक्यात जायला लागलाय. <<
अनुमोदन
मालिकेकडून असलेल्या अपेक्षांची अजिबात पुर्ती झाली नाही. हिंदीतल्या "खोदा पहाड निकला चूहा" या म्हणी प्रमाणे गत आहे.<<<
तुम्ही मालिकांकडून अपेक्षा ठेवता.. अतिच स्वप्नाळू बा तुम्ही...
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'उंच माझा झोका' बघावी, तीच चांगली आहे. <<<
उंमाझो चांगली.... हा उत्तम विनोद आहे. ऐतिहासिक काळ दाखवल्यासारखं करून सुनेचे हाल इत्यादी मसालाच आहे. विषयाचा, काळाचा अभ्यास कुठेही नाही. अर्थात त्या दिग्दर्शकाकडून अपेक्षाही नाही.
त्यापेक्षा एलदुगो टाइमपास म्हणून बरी आहे.
मं जो : 'डोंगर पोखरून उंदीर
मं जो : 'डोंगर पोखरून उंदीर काढणे' असा प्रयोग मराठीत आहे बरं का!
भरत धन्यवाद
भरत धन्यवाद
हा उत्तम विनोद आहे. ऐतिहासिक
हा उत्तम विनोद आहे. ऐतिहासिक काळ दाखवल्यासारखं करून सुनेचे हाल इत्यादी मसालाच आहे. विषयाचा, काळाचा अभ्यास कुठेही नाही. अर्थात त्या दिग्दर्शकाकडून अपेक्षाही नाही.
त्यापेक्षा एलदुगो टाइमपास म्हणून बरी आहे
सहमत.. उगीच जुने वातावरण दाखवण्यासाठीचे म्हणुन लिहिलेले संवाद, जे कानाला टोचतात आणि घरी परतलेल्या विधवांनी घरच्या इतरांचा केलेला छळ यापेक्षा दुसरे काय आहे त्यात?? अर्थात काहीतरी वैचारीक पाहायला मिळेल ही अपेक्षा नाहीयेच टिवीकडुन. त्यापेक्षा एल्दुगो आवडते. मी कथेपेक्षा त्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगाकडे पाहते. काल राधा गिरक्या घेत असताना दिगाकाकाही हळूच गिरकी घेतो. सॉनी नी मानव बिचारे प्रचंड चिंतेत पडलेत. मला तरी आवडते ही मालिका. पुढे काय हा विचार कधीचाच सोडुन दिलाय. फक्त जे जे दाखवतात ते ते पाहात राहणे...
रच्याकने, जेवण बनवणे हा शब्दप्रयोग मीही मुंबईत आल्यावर ऐकला. माझ्या शेजारची मुले जेव्हा 'जेवण करायला जातोय' म्हणायची तेव्हा मी हसायचे.. जेवण आईने केलेय आणि आपण ते हादडायचे एवढेच माहित होते.
स्वप्निल जोशी अभिनय करतो आणि
स्वप्निल जोशी अभिनय करतो आणि छान करतो >> आजचा उत्तम विनोद .
काल काय भयाण जाडा दिसलाय
काल काय भयाण जाडा दिसलाय तो..... पण तो यात मला बराच सुसह्य वाटला. आधी तर मी त्याला बघितले की टिवीच बंद करायचे.
स्वनील जोशीला बघितल्यावर मला
स्वनील जोशीला बघितल्यावर मला नारळाची का आठवण होते?
स्वप्नील जोशी लोकांना आवडू
स्वप्नील जोशी लोकांना आवडू शकतो... हाच माझ्यासाठी गहन अभ्यासाचा विषय आहे.
वरण भात दिसतो तो. काय बोलतो, काय हसतो... कैच्यकै.
वरण भात दिसतो म्हणजे?
वरण भात दिसतो म्हणजे?
वरण-भात = बावळट. एकंदरीत
वरण-भात = बावळट. एकंदरीत गोलगरीत चेहरा, सुटलेले पोट अश्या मुलांना( खास पुणेरी शब्द आहे तो, जपून वापरा)
झंपी
झंपी
मंदार, झाली खात्री वरण-भात
मंदार, झाली खात्री वरण-भात म्हणजे काय ते?
आता तुम्हाला का नारळ आठवतो ते सांगा ना..
>>>मं जो : 'डोंगर पोखरून
>>>मं जो : 'डोंगर पोखरून उंदीर काढणे' असा प्रयोग मराठीत आहे बरं क>>><<
नको तिथे हिंदी कशाला? आँ?
त्यांचा फक्त विंग्रजीला विरोध
त्यांचा फक्त विंग्रजीला विरोध असेल.
मंदार, ह. घ्या.
मंदार, ह. घ्या.
वरण भात दिसतो तो. >>> मला तर
वरण भात दिसतो तो.
>>> मला तर 'पछाडलेला' मधला तात्या विंचु चा बाहुला आठवतो, स्वप्निल ला बघुन !!
Pages