Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्या मालिकांमध्ये पात्रे
सगळ्या मालिकांमध्ये पात्रे संवादाची सुरवात 'कसं असतं ना....' ह्या शब्दांनी करतात. प्रत्यक्षात तसे बोलताना मी तरी कोणाला ऐकले नाही, मीही कधी हे शब्द वापरले नाही.
अगदी सुटलाय. मला आवडला त्याचा
अगदी सुटलाय. मला आवडला त्याचा अभिनय.>> अमृता, इथे 'स्वप्निल अगदी सुटलाय, तरी मला आवडला त्याचा अभिनय' असं लिहायचंय ना तुला?
'कसं असतं ना....' ह्या
'कसं असतं ना....' ह्या शब्दांनी करतात. प्रत्यक्षात तसे बोलताना मी तरी कोणाला ऐकले नाही, मीही कधी हे शब्द वापरले नाही. >>> अगदी !!
खाना बनाया है --> जेवण बनवलंय
वो क्या है ना --> कसं असतं ना
अगं सुटलाय म्हणजे तसा नाही ग.
अगं सुटलाय म्हणजे तसा नाही ग. सुटलाय म्हणजे अगदी अॅट इझ काम करतोय. एक सहजता आहे त्याच्या अभिनयात.
हो गं.. स्वप्निल झकास काम
हो गं.. स्वप्निल झकास काम करतोय. जामच आवडलाय मलाही
पण सुटलेलाही आहेच की!
स्वयंपाक केला हे जास्त बरोबर
स्वयंपाक केला हे जास्त बरोबर आहे अस वाटतं. एवढं सुद्धा कळु नये !
कालचा भाग अगदीच कै च्या कै
कालचा भाग अगदीच कै च्या कै होता. त्या घनाच्या पायावरून उगाचच केवढा गदारोळ! स्वप्निल खरंच झकास पण. मुक्ताचा अभिनय त्याच्यामानाने कृत्रिम वाटतो.
कालचा भाग अगदीच कै च्या कै
कालचा भाग अगदीच कै च्या कै होता. त्या घनाच्या पायावरून उगाचच केवढा गदारोळ! >>>१०० % अनुमोदन.. बोअर झाला कालचा भाग..
मुक्ता( राधा )अभिनेत्री
मुक्ता( राधा )अभिनेत्री होण्यापेक्षा सरकारी नोकरी करताना बरी वाटली असती .
अपर्णा, राखी+१. बोर होता
अपर्णा, राखी+१. बोर होता कालचा भाग.
बन्डु- चिल.
बन्डु- चिल >> नै तर कै.
बन्डु- चिल >>
नै तर कै.
मला वाटतं, मुक्ता बर्वेनं ते
मला वाटतं, मुक्ता बर्वेनं ते अवघडलेलं, आखडू बेअरिंग मुद्दाम घेतलंय.
सध्या त्या मालिकेची जी फेज आहे, ती 'ठेहराव' या क्याटेगरीत मोडतेय. साध्या, साध्या आणि छोट्या प्रसंगांतून अगदी नकळत मुख्य दोन पात्रांच्या (आणि प्रेक्षकांच्याही) मनावर ठसवलं जातंय, की लग्नसंस्था, कुटुंबसंस्था म्हणजे पोरखेळ नाही, ६ महिने करून बघू आणि नंतर आपापल्या वाटेनं निघून जाऊ असं यात करता येत नाही.
मला नेटवर च बघावे लागतात
मला नेटवर च बघावे लागतात एपिसोड
छत्रेकाकुंना मोत्याचा कंठा.
छत्रेकाकुंना मोत्याचा कंठा.
मला नेटवर च बघावे लागतात एपिसोड >> मला पण. त्यात काय.
रैना मी भारतात असुन सुध्दा
रैना मी भारतात असुन सुध्दा मला बघावे लागतात नेट वर.......एअरटेल वर झी मराठी चालतच नाही
रैना, हाँगकाँगात 'मोत्याचा
रैना, हाँगकाँगात 'मोत्याचा कंठा' म्हटल्यावर, कळेल ना गं दुकानदाराला?
एअरटेल वर झी मराठी चालतच नाही
एअरटेल वर झी मराठी चालतच नाही >>> चालतं की. 'मराठी चॅनेल पॅकेज' घ्यावे लागते. तेही फ्रीच आहे.
रैना छत्रे काकु जिंदाबाद.
रैना छत्रे काकु जिंदाबाद.
चला कुहु ने खरंच अशी कविता
चला कुहु ने खरंच अशी कविता केली(आय्डी ची) तर माझ नाव हव मग त्यात
ललिता- होहो, तू इकडे
ललिता- होहो, तू इकडे येईपात्तुर तेवढं मॅंडरिन मी शिकुन घेईन.
दीप्स- क्रेक्ट. छत्रेकाकु.
उदय सॉरी. तुम्ही भारतातच आहात हे लक्षात नाही आलं.
कुहु ने खरंच अशी कविता
कुहु ने खरंच अशी कविता केली(आय्डी ची) तर माझ नाव हव मग त्यात >>>
नावांचं माहित नाही पण ती मायबोलीतली भाषा मात्र थोडीशी बोलते. काल म्हणाली, " मला आत्ताच 'विरह' कविता झालीये."
नावांचं माहित नाही पण ती
नावांचं माहित नाही पण ती मायबोलीतली भाषा मात्र थोडीशी बोलते. काल म्हणाली, " मला आत्ताच 'विरह' कविता झालीये." >>> सुमेधा, हा शब्द मायबोलीवर निर्माण झालाय का? मला वाटलं तो आधीपासूनच प्रचलित आहे. काव्यातिरेक, कविता होणे, वगैरे विनोद मला मायबोलीवर नसतांनापासून माहितीयेत.
मुक्ताच्या सासुचं -चुलत
मुक्ताच्या सासुचं -चुलत सासुचं तिच्याशी गोड मिट्ट वागणं, वर्किंग सुनेची लाइफ स्टाइल समजुन घेणं, सासु सुनेचं जबरी अंडरस्टँडिंग , लग्नात मुला कडच्यांनी 'आम्ही जास्त खर्च करणार म्हणणं' टाइप जे दाखवतायेत ते बिलिव्हेबल वाटत नसलं तरी अगदी तस्सच दाखवु देत , अगदी मारा करु देत उलट अशा सीन्स चा :).
ह्जारात एखाद्या सासरच्यांना असा लग्नात खर्च करावा इतपत अक्कल आली, एखादी सासु जरी इतकी हेल्दी /लिंग निरपेक्ष वागणुक सुनेला देउ शकली तरी यशस्वीच झाला शो !
नाही तर नुसते ते नॉन सेन्स यु.पी स्टाइल टॉर्चर-डोमेस्टिक व्हॉयलेन्स वाले शोज ढिग भर चालुच असतात
अनुमोदन डीजे!
अनुमोदन डीजे!
कालच्या भागातले राधा अणि
कालच्या भागातले राधा अणि सॉनियामधले संवाद प्रेडिक्टेबल वळणाने जाणारे होते तरी एक्झिक्युशन मस्त जमवले होते.
परवा मानवसमोर घनाच्या पायाचे बिंग फुटल्यावर त्याने राधासमोर शरणागती पत्करली तो सीन अगदी आई-मुलामधला वाटत होता. स्वप्नीलला त्याच्या अभिनयाचे विविध पैलू दाखवायची चांगली सोय झालीय. त्याने वजन या मालिकेसाठी मुद्दाम वाढवलेय की आधीपासूनच वाढलेले आहे? नायकाच्या वाढलेल्या वजनावर, आळशीपणवर विनोद ही मराठी मालिकांतली क्रांतीकारक घटना समजायला हरकत नसावी.
पाहिले बा दोन-चार एपिसोडस..
पाहिले बा दोन-चार एपिसोडस.. मजा आली.
प्रेक्षकांपेक्षा नटमंडळीच जास्त एंजॉय करतायत हे अगदी नक्की. नाहीतर तेच ते बोरिंग कृत्रिम संवाद, तीच ती कटकारस्थाने, जर्रा म्हणून उपरोध आणि सटलटी ला वाव नाही असलं सगळं करून कंटाळले असणार सगळे.
आजचं चंपीप्रकर्ण पाहिलं.
आजचं चंपीप्रकर्ण पाहिलं. राधाला हाताला तेल लावायचं नाहिये का दुसर्याच्या केसांना हात लावायचा नाहिये? हाताला तेल लावायचा प्रॉब्लेम असेल तर ही स्वतःच्या डोक्याला तेल कसं लावते? का ते पण तिचे बाबा लावून द्यायचे?
'जेवण बनवलंय' अगदी सहमत.
'जेवण बनवलंय'
अगदी सहमत. स्वयंपाक झालाय हे अजिबात अवघड नाहिये.
आजच्या भागात तर काय झाले ते समजले नाही. आपली मराठीवर पळवत पळवत ३ मिनिटात संपवला भाग.
स्वप्ना, राधाला दुसर्या
स्वप्ना, राधाला दुसर्या कोणाच्या डोक्यात/केसांत आपले हात खुपसायचे हे पसंत नाही. त्याबद्दल तिला वाटणारी किळस मुक्ताने छान दाखवली.
त्याबद्दल तिला वाटणारी किळस
त्याबद्दल तिला वाटणारी किळस मुक्ताने छान दाखवली. >>> हो, हो
तिच्या अभिनयात मधूनच नकळत (की जाणूनबुजून?) 'फायनल ड्राफ्ट'मधल्या लकबी डोकावतायत. (पण ते खटकत नाही.)
Pages