एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, मनस्विनी, मुक्ता बर्वे, इ. नावांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या. त्यामुळे ही 'वासरांत लंगडी गाय शहाणी' किंवा 'दगडापेक्षा वीट मऊ' असा अल्पसंतुष्ट प्रेक्षक व्हायला माझा नकार आहे.

भरत + १००००००००......माझंही हेच म्हणणं आहे की हलकीफुलकीच मालिका करायची आहे ना? मग अतिरंजित कशाला? अशी मालिका वास्तववादी असू शकत नाही का? उदा. बाकी इतर बाबतीत परंपरावादी असलेली म्हणजे मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे वगैरे म्हणणारी आत्या तिच्या सासरी काही दिवस रहायचा प्रस्ताव मांडेल हे संयुक्तिक वाटत नाही. स्वतःच्या भाचीचं लग्न स्वप्नीलशी व्हावं असं वाटणारी काकू एव्हढ्यात आमूलाग्र बदलते? राधाच्या बाजूने होते? बाकी मालिकात दाखवतात तसं अगदी कटकारस्थान करतेय असं न दाखवता थोडी धुसफूस दाखवली असती तर अधिक भावली असती. काकू खरी हाडामांसाची वाटली असती.

दुसरं उदाहरण घेऊ.....लाडेलाडे बोलल्याखेरीजही प्रेमळ सासू रंगवता येते ना? आणि ती सासूही एव्हढी अतिगोड का दाखवायची? कुठल्याही व्यक्तिच्या स्वभावाला चांगले आणि वाईट असे दोन पैलू असतात. बाकीच्या मालिकात सगळं वाईट दाखवतात म्हणून इथे सासू अतिचांगली दाखवलेय. अश्याने मालिका मेक-बिलिफ वाटते.

आणखी एक.....सगळंच हलकंफुलकं करण्याच्या प्रयत्नात काही गंभीर विषय सुध्दा पाचकळपणे हाताळले जातात. थोडं विनोदी आणि थोडं गंभीर असा तोल सांभाळणं खरंच एव्हढं कठिण आहे?

तिच्या सासरी काही दिवस रहायचा प्रस्ताव मांडेल हे संयुक्तिक वाटत नाही. स्वतःच्या भाचीचं लग्न स्वप्नीलशी व्हावं असं वाटणारी काकू एव्हढ्यात आमूलाग्र बदलते? राधाच्या बाजूने होते? बाकी मालिकात दाखवतात तसं अगदी कटकारस्थान करतेय असं न दाखवता थोडी धुसफूस दाखवली असती तर अधिक भावली असती>>
perspective आहे फक्त.

काकु मनापासून ठ्ररवून बदलते. नवरा तिला वचन देतो की मी सुमुखीचे लग्न करुन देईन. ते प्रसंगही हृद्य होते.
सुमुखीसाठीचा ड्रेस ती राधाला घालायला देते.. हे सगळे हळुहळु होते.
कुहु किंवा वल्ली वगळता पात्रे हळुहळु विकसीत झाली आहेत.
केरळमध्ये त्याच त्याच प्रकारचे जेवण मिळते ही सत्य परिस्थिती आहे
मी राहुका ही फक्त विचारादखल असू शकते. रीत आहे फक्त म्हणायची.

मालिका ग्रेट नाहीच. टाकाऊही नाही. जरा अजून बरा दिग्दर्शक असता तर सोने केले असते एवढेच.
सई परांजपे दिग्दर्शक नाहीये. Proud

मला या मालिकेतील बरीचशी पात्रं आजूबाजूला पाहिल्यासारखी वाटतात.संवाद,लकबी इ.इ. Happy अगदी घनाच्या आईसारखी सासूही पाहण्यात आहे जवळच्या लो़कांत Happy घनाचे सॉ.इ. असून आरामात असणे अजिबातच ऑड वाटत नाही Happy सतत वर्षभर काम/सतत आराम असे नसते ना सॉफ्टवेअरमधे Happy आता त्याचा आरामाचा कालावधी चालू असेल Proud राधाचे 'काही भाज्यांना मिरच्या काहींना तिखट असे का?' हे विचारणे पण वेगळे वाटले नाही,माझी स्वतःची स्टेज याहीपेक्षा वाईट होती लग्नानंतर अगदी सुरवातीला आणि हो,मी तिच्यासारखी फार हुशारही नव्हते इतर कुठल्या बाबतीत Proud तो सीन पाहिल्यानंतर मला असे अनेक बेसिक प्रश्न पडायचे स्वयंपाकाबद्दलचे आणि मीही ते निरागसपणे विचारायचे सासर-माहेर दोन्हीकडच्या लोकांना, ते आठवले Happy फार मजा आली Happy कुहूचे वागणे इरिटेटिंग वाटते कधीकधी पण enjoy करता येते बहुतांश वेळेला तिच्याबाबतीत Happy हां आता तसे लूपहोल्स बरेच काढता येतील पण current वासरांमधे ही current लंगडी गाय बरी वाटते हे खरे Proud डेली सोप म्हणजे कथेचा जीव एवढासा आणि बाकी पाणी घालणे हे आलेच ओघाने Happy
अर्थात कीस हा पडणारच त्याबद्दल काही म्हणणे नाही Happy 'गुंतता..' चा धागा बराच उशीरा चालू झाला होता हा अगदी लगेचच चालू झाला मालिका चालू झाल्याबरोबर त्यामुळे हे होणारच Happy

मायबोलीवर मालीकान वरचे अभिप्राय वाचून खूप वर्षांनी उंच माझा झोका आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिका पहायला सुरवात केली. सुरवातीचा अनुभव छानच होता...खूप वर्षांनी झोका, प्रपंच, आनंदी गोपाल, टिपरे आजोबा ह्यांच्या तोडीच्या दोन मालिका आल्यात म्हणून खूप मस्त वाटत होते.

पण आजच फारएण्ड ह्यांची संथ चालती ह्या मालिका वरची पोस्ट वाचून रंग माझा वेगळा अस तूनळी वर सेंर्च करून पाहील.....आणि विश्वास बसणार नाही अवघ्या दोन मिनिटात बंद पण केल. आत्ता विचार करते लोक कसे काय ह्या मालिका बघू शकतात? ती मुलगी इतक वाईट मराठी कस काय बोलू शकते? फक्त ते कुटुंब अमेरिकेतून भारतात गेले आहे म्हणून? हे असं नसतंच. मनोरंजनाच माहीत नाही पण ह्या मालिके मुळे गैरसमज तर नक्की पसरतील......

हे बघितल्यावर एका लग्नाची दुसरी गोष्ट जरा सहन करण्या सारखी आहे.

रैनाच्या वरच्या पोस्टला भक्कम पाठींबा.

बाकी मालिकात दाखवतात तसं अगदी कटकारस्थान करतेय असं न दाखवता थोडी धुसफूस दाखवली असती >> त्या कट कारस्थानांचे इतके अजिर्ण झाले आहे की या मालिकेत थोडी धुसफूस जरी आली असती तरी ही मालिका पण इतर मालिकांच्याच मार्गानेच जाणार म्हणून बघायचेच सोडले असते. म्हणजे मान्य आहे की गोडमिट्ट आहे मालिका पण आजच्या घडीला तरी हा कट कारस्थानांवरचा उतारा आवडतोय.

सुप्रिया काकूचे जे पात्र दाखवले आहे त्याच्या स्वभावानुसार मला तरी तिने राधाला इतक्या पटकन् स्विकारले यात काही वावगे वाटले नाही. अशी झटक्यात ऑन ऑफ करू शकणारी माणसे असतात. पण त्याला कारण भक्कम लागते आणि मालिकेत ते दिले आहे.

लाडेलाडे बोलल्याखेरीजही प्रेमळ सासू रंगवता येते ना? >> पण अशाच लाडे लाडे बोलणार्‍या बायका प्रत्यक्ष जीवनातही दिसतातच ना?

थोडं विनोदी आणि थोडं गंभीर असा तोल सांभाळणं खरंच एव्हढं कठिण आहे? >> मान्य.

ए तो काजोल, अनिल कपूरचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरचा चित्रपट आठवला, तशी स्टोरी गंडू नये म्हणजे मिळवली>?>>>>>>>> +१ हो ...ह्म आपके दिल मै रहते है अस हे त्या चित्रपटाच नाव...आधी खोट लग्न करतात..आनि मग खरंच प्रेमात पडतात.

राधाचे 'काही भाज्यांना मिरच्या काहींना तिखट असे का?' हे विचारणे पण वेगळे वाटले नाही,माझी स्वतःची स्टेज याहीपेक्षा वाईट होती >>> ते वेगळे नक्कीच नाहीये पण 'राधाच्या' व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे. सुरुवातीपासून ती स्वतः स्वयंपाकात काही करत नाही पण वडिलांच्या बाबतीत भलतीच तालेवार दाखवलीय. ह्यात हे घातलंय का, ते का घातलं नाहीये, टेबलावर नीट मांडलंय का अशी उंटावरुन शेळ्या हाकणारी Wink कुठल्या पदार्थात काय जातं हे वरवर माहीत असणारी पण स्वतः करायची वेळ आल्यावर गोंधळ घालणारी. म्हणून तिचे कणकेत बदाबदा पाणी ओतणे किंवा चहा बिघडवणे नाही खटकले पण हे खटकले.
फारच कीस झाला नाही का ? लेखकात चांगलं लिहिण्याची क्षमता आहे म्हणून तर एवढे दोष काढायचे नाहीतर काय आहेच सगळा आनंदी-आनंद Happy

अंगणात फुलली दारी माझ्या वेल..
शोधताना मी भट्कतो रानोमाळ..
मि रिन्ग टोनच लावली होती..

मालिका पाहण्यापेक्शा .'उद्याच्या भागात' जाहीरात पाहणे चांगले..

मयेकर, अगो +१! क्षमता असलेले लोक आहेत म्हणून वाटतं की इतकं इल्लॉजिकल दाखवू नका! कुहू, ज्ञाना वगैरेही चालतात, कारण ते टीपीच दाखवलेत. पण सासूबाई, सुप्रियाकाकू खूपच जास्त अती गोड! स्वप्नाचा 'मेक-बिलिव्ह' शब्द पर्फेक्ट!

स्वप्निल मात्र!!!!!! Happy

स्वप्निल मात्र मस्तच आहे. तो तिच्या अगदी प्रेमात पडलेला दाखवला आहे. काल चे त्या दोघांचे संवाद चांगले होते. तो तिला टोमणे मारतो ते रास्तच वाटतं.

स्वप्निल मात्र!!!!!! >>>>>>>> अनुमोदन . मलापण जाम आवडायला लागलाय ः) पण तुम्हि लोकं म्हणता तसं त्याच्या डोळ्यात मला राधा ( कि मुक्ता?) साठी प्रेम नाहि दिसलं राव. (माझं अज्ञान). ईथे वाचून मी गेला आठवडा त्याच्या डोळ्याकडे बारीक लक्ष ठेऊन होते पण मला कळतच नाहिये. Happy
बाकि ,स्वप्ना आणि अगो +१

ईथे वाचून मी गेला आठवडा त्याच्या डोळ्याकडे बारीक लक्ष ठेऊन होते पण मला कळतच नाहिये.>>>>>>>>> Proud

>>घनाचे सॉ.इ. असून आरामात असणे अजिबातच ऑड वाटत नाही स्मित सतत वर्षभर काम/सतत आराम असे नसते ना सॉफ्टवेअरमधे स्मित आता त्याचा आरामाचा कालावधी चालू असेल फिदीफिदी

मान्य की सतत वर्षभर काम नाहीतर सतत आराम असं नसतं. पण इतका रिकामा वेळ मिळत नाही खरंच. आणि इथे तर घना नोकरी करत नाहिये, त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. कोणीही व्यवसाय करणारा माणूस हेच सांगेल की ९ ते ५ च्या नोकरीपेक्षा जास्त काम करावं लागतं. असं तंगड्या ताणून बसता येत नाही. घना मात्र अमेरिकेला जायच्या आधी टाईमपास म्हणून हा व्यवसाय करतो आहे असं वाटतं.

घरचा डबा(तोही सुप्रियाकाकूंनी बनवलेला) ऑफिसातल्या लोकांना देऊन घनाने स्वतः रोज पिझा खाण्यामागे तो अमेरिकेला गेल्यावर तिथे मिळणार्‍या अन्नावर रहायची तयारी करतोय हे लॉजिक असल्याचा मला संशय येतोय Lol

वेगळे नक्कीच नाहीये पण 'राधाच्या' व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे >>>>अगो, असेलही तसे ! मला तो प्रसंग खूपच सहज वाटला.राधाच्या सासूने तिला ' काही भाज्यात तिखट काहीत मिरच्या असं असतं बरं' असं म्हटल्यावर तिने लगेच ' हो का? असं का?' हे विचारणे खूप उत्फूर्त,सहज,स्वाभाविकही वाटले मला तरी ! तिच्या पात्रातली विसंगती कधीकधी जाणवते मलाही पण या प्रसंगात नाही दिसली मला.यामधे त्यांचा अभिनय+माझे नॉस्टॅल्जिक होणे हेही कारण असेल Happy तुमची आधीची यावरची पोस्ट पण मी वाचली लगेच जाउन पण क्या करे दिल है के मानता नही Happy असो.

मला डेली सोप ब-याचदा त्याच्या ओव्हरऑल इफेक्टसाठी आवडतात/नावडतात. या मालिकेतील पात्रांच्या खूपच जवळ जाणारी लोकं माझ्या अगदी पाहण्यात आहेत.माझ्या चुलत सासवा या ब-याचशा सुप्रियाकाकूंसारख्या आहेत Happy प्रसंगी मॅच्युअर,प्रसंगी खेळकर,मनमोकळ्या स्वभावाच्या,तोल सांभाळणा-या ! गोड गोड बोलणारी पात्रं आहेत पण मला तरी ते नाटकी वाटत नाही(कुहू,ज्ञाना हे अपवाद्)कायम बघते अशी खरीखुरी माणसं ! घनासारखे निवांत सॉ.इ. व्यवसाय/नोकरी यापैकी काहीही असणारे लोकं तर पुष्कळच आहेत Happy ही लोकं कामाच्या वेळेला वाघ,सिंह इ. असतात Happy अर्थात राजवाडे कंपनी ते आपल्याला दाखवणार नाहीच म्हणा Happy घना राधाला म्हणतो ना ' आता काही दिवस काळे टाईम्सच्या फ्रंट पेजवर आपला हनीमून हाच विषय असणार आहे ' असे संवाद खूपच परिचयाचे ( ते हनीमून हा विषय सोडून बरं :फिदी:) आहेत.मला तर या मालिकेच्या शेवटाचीही अजिबात काळजी वाटत नाही.'गुंतता..' चा शेवट पाहता याचाही काही धाडसी वगैरे शेवट होणार नाही याची खात्री वाटते Happy तेच प्रेमात-बिमात पडणार दोघं झालं Happy ही दुसरी गोष्ट आहे लग्नाची,वेगळी नाही Happy शेवट काहीही असो, ते Adventure is in the journey....च्या चालीवर निखळ,सहज करमणूक करणारी,ब-याचदा नॉस्टॅल्जिया जागवणारी journey म्हणूनच ही मालिका मला भावते ! हुश्श..किती लिहिले आता ठेवते तसेच Happy

बाकी इथल्या कमेंटस वाचून मजा येतेच हे वेगळे सांगायला नकोच Happy

स्वप्निल मात्र मस्तच आहे. तो तिच्या अगदी प्रेमात पडलेला दाखवला आहे.
<<< दाखवणे जाउ दे, खर्रा खुरा प्रेमात पडल्याचा केंव्हाचा संशय येतोय :).

एक दोन भाग ह्या मालिकेचे बघितले मग इकडचे वाचूनच जरा पुन्हा बघायला लागले तेव्हा सर्व भाग नाही पाहिले पण आता कन्फ्युझ झालेय,

ह्यांचे लग्न का खोटंखटं असते? का? का? इतके खोट्या लग्नात राधाचे व घनाचे अडकून पडायचे कारण?

कृपया कोणीतरी ज्ञान प्रदान करा.

मग मीही नावं ठेवत ठेवत चिकाटीन बघेन मात्र ही सीरीयल.. व रोज इथे लिहित जाईन. Proud

पण घाबरु नका रोज नाही लिहिणार.. पण सांगा नक्की काय गुपित असते असे खोटंम लग्न करण्यामागे?

"राधा माझी मदत कर, एक मिनिटं, झंझटी."
मनस्विनी आणि स्वप्नील यांतल्या कोणालातरी (किंवा दोघांना+ दिग्दर्शकाला) मराठी व्याकरणाचा अभ्यास करायची गरज आहे.

वायुसंगे आलेल्या वार्तेनुसार कुहू आपल्या फॅन्सची नावे (मायबोली आयडी) आपल्या कवितेत गुंफणार आहे. (कालची कविता आठवा) Wink

<<ह्यांचे लग्न का खोटंखटं असते? का? का? इतके खोट्या लग्नात राधाचे व घनाचे अडकून पडायचे कारण>>

राधा आणि घना या दोघांना मुळात लग्नच करायचे नसते (कारणे सांगण्यासारखी आहेत पण पटण्यासारखी नाहीत). राधाने ७१ तर घनाने ६३ स्थळे नाकारलेली असतात. दोघांना एकमेकांची स्थळे सांगून येतात, तेव्हा घरच्यांच्या 'लग्न कर, लग्न कर' या कटकटीला पायबंद घालण्यासाठी हे दोघे मॅरेज ऑफ कन्व्हेनियन्स करायचे ठरवतात.

अगदि टुकार मालिका. अलिकडे "उंच माझा झोका" आणि पलिकडे "फु बाई फु / सारेगामा" असल्याने मस्तकात जात नाहि. Happy

हल्ली यातली पात्रे संवाद अगदी आठवुन आठवुन बोलल्यासारखी वाटतात. जणु दिग्दर्शकाने सांगितलेय अमुक वाक्य बोलायला अमुक एवढी मिनिटे लावलीच पाहिजेत, त्याच्या आधी वाक्य संपवायचे नाही.

मनस्विनी आणि स्वप्नील यांतल्या कोणालातरी (किंवा दोघांना+ दिग्दर्शकाला) मराठी व्याकरणाचा अभ्यास करायची गरज आहे.>>> अगदी अगदी!! एकूणच झी मराठीवर मराठी भाषा शुद्धीकरण संस्कार करायला हवे आहेत. सारगेमपच्या एका भागात अभिजीत 'तुमचे धन्यवाद' म्हणाला. Angry

मंजू, Lol अगदी अस्साच लाल चेहरा माझा होतो 'जेवण बनवलंय' हे ऐकल्यावर... डोक्यात जातो तो शब्दप्रयोग Lol

आणखी काही चुकीचे शब्दप्रयोग-

माझी मदत करशील?
नाही नको.

भरत, तुमच्या मागच्या पानावरच्या पोस्टला अनुमोदन.
उंच माझा झोका आणि एका लग्नाची गोष्ट सुरु होण्याआधी मी एकही मालिका पहात नव्हते. त्यामुळे ह्यापेक्षा ते चांगलं असा प्रश्नच नव्हता. मालिकेतील कलाकार बघुन ही नक्की चांगली असणार असं वाटुन पाहू लागले तर आता अपेक्षाभंग होतोय. Happy उंच माझा झोका मात्र छान आहे. Happy
आणि हो एलगो मधे स्वप्निल मात्र अगदी सुटलाय. मला आवडला त्याचा अभिनय. Happy

Pages