बीटः १ (४ इंच, मध्यम आकाराचा)
बटाटे: ३ मध्यम आकाराचे
गाजरः २ मध्यम
हरा चना (ताजा वा गोठवलेला) : एक वाटी
Bread Crumbs (whole wheat चे): ३ वाट्या
मसाल्याचे पदार्थः २ इंच आलं, ५-६ लसूण पाकळ्या, ४ मिरच्या, मीठ
इतरः तेल
१. बटाटे व बीट उकडून किसून घ्यावे.
२. हरभरे उकडून जाड्सर भरडून घ्यावे.
३. गाजर किसून् घ्यावे.
४. 'मसाल्याचे पदार्थ' वाटून घ्यावे.
५. १-४ मधील सर्व गोष्टी हलक्या हातांनी एकत्र करून त्यात दीड वाटी Bread Crumbs आणि चवीपुरते मीठ मिसळावे.
६. थोडे Bread Crumbs ताटात पसरवावे.
७. कट्लेटच्या मिश्रणाचे ३ इंचाचे गोळे करून त्याची हलक्या हाताने Bread Crumbs मध्ये थापून कट्लेटस करावी आणि मध्यम आचेवर तव्यावर् तेल सोडून परतून घ्यावी.
ही कट्लेट्स चिंचेच्या चटणीबरोबर, पावाबरोबर (वडापावासारखी) खायला अप्रतिम लागतात शिवाय अतिशय पौष्टिकही आहेत (गाजर, बीट, बटाटा सर्व न तळता उकड्ल्याने, कट्लेट्स deep fry न केल्याने) !!
छान पाकृ नावं आवडले पण
छान पाकृ नावं आवडले
पण फोटु???
मला ही नाव आवडले ..छान आहे
मला ही नाव आवडले ..छान आहे पाककृती:)
नांव फारच आवडले.सोप्प आहे
नांव फारच आवडले.सोप्प आहे करायला.