Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>अरे एव्हढा कीस का पाडता
>>>>अरे एव्हढा कीस का पाडता आणि लॉजिक तरी का लावता? त्या श्रेयस्-वैदेही, आक्कासाहेब आणि ती रडकी कल्याणी यांच्या मालिकांना असते का काही लॉजिक?...
१०० % अनुमोदन स्वरुप
त्यातल्या त्यात ही मालीका बरीच वेगळी झालीय आत्तापर्यंत...तरीसुद्धा राजवाडेने थोड पॅचवर्क केलतर बर पडेल मालीकेसाठी......
कालचा भागही छान होता... सासु
कालचा भागही छान होता... सासु सासरे फिरायला निघालेले असताना राधाने ड्रेस आणुन देणे, ते घेताना सासु ची चलबिचल.. खुप छान इतके छोटे आणि सुंदर प्रसंग आपण पण आपल्या आयुष्यात आणु शकतो.. कदाचित हेच दाखवायच असेल या मालिकेतुन.
अक्षरशः आचरटपणा चाललाय
अक्षरशः आचरटपणा चाललाय मालिकेत. अजिबात उत्साह नाही राहिला. मरुदे.
कसली बोअर मालिका आहे ही ..
कसली बोअर मालिका आहे ही .. अगदी करन जोहर टाइप काहितरी .. उगाचच ते जोक .. हसु पण येत नाही ..संपवा एक्दाची लवकर लवकर ..
घना प्रेमात पडलाय आता
घना प्रेमात पडलाय आता राधाच्या. मस्तच.
त्याचे डोळेच अभिनय करतात. मला तर बै आवडतेय मालिका अजुनतरी.
घनाच्या आईला (इला भाटेला)
घनाच्या आईला (इला भाटेला) सांगा कुणीतरी इतकं लाडं लाडं बोलायला काही तुम्ही हनिमूनला निघाला नाहीत म्हणून अगदी डोक्यात जातोय तिचा अभिनय(?)
घनाच्या आईचे लाडेलाडे बोलणं
घनाच्या आईचे लाडेलाडे बोलणं अगदीच इरीटेटिंग आहे.
घनाच्या आईचे लाडेलाडे बोलणं
घनाच्या आईचे लाडेलाडे बोलणं अगदीच इरीटेटिंग आहे.>>>>>>>> बरोबर आहे. इतर सिरियलीतल्या प्रमाणे डोळे वटारणार्या, कुजकट, नखरेल, करस्थानी आया नी सासवांची सवय झालेय ना आपल्याला मग हे प्रेम नी लाड खटकणारच.
राधाच्या अत्याला पोरं बाळं नाहीत का? कधीच उल्लेखसुद्धा नाही आला अत्तापर्यंत
खरं तर स्वतःचा बिझिनेस म्हणजे नोकरीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात. पण घना बघावं तेव्हा तंगड्या पसरून आरामात घरी बसलेला >>>>>>>>>>
लोक्स, इतका लॉजिकल कीस का पाड्ताय? इतर जे काही चालुये - माठ अरुंधती, आभास हा, पिंजरा, पवित्र रीश्ता, दोन किनारे दोघी का काही तरी असेच, पुढचं पाउल, दिल्या घरी- त्या पेक्षा अगदीच सहनेबल आणि हलकी फुलकी आहे ही सिरिअल. ह्या सगळ्या सिरियलींचा जर लॉजिकल कीस काढायच ठरवल ना तर मग रटाळ, फाल्तु, बोअर, वैताग हे ही शब्द कमी वाटतील. काहीतरी भयाण चालु असत त्यात. तेव्हा कुल अॅन्ड एन्जॉय. नाही बघायचीय तर आहेतच वरचे सगळे पर्याय.
मालिका नको पण स्वप्निल आवर !
मालिका नको पण स्वप्निल आवर !
बन्डु मला तर स्वप्निल आणि
बन्डु
मला तर स्वप्निल आणि स्वप्निलचा अभिनय दोन्ही आवडलं/ नेहमीच आवडतं.
मालिकेला काहीही म्हणा पण
मालिकेला काहीही म्हणा पण स्वप्निलला नाही! उत्तम अभिनय करतोय तो..
उत्तम अभिनय करतोय तो..>>> +१.
उत्तम अभिनय करतोय तो..>>> +१.
पौर्णिमा++++++++++१००००००००००
पौर्णिमा++++++++++१०००००००००००००००००००
भाटेकाकु किती जणांना सहन होत
भाटेकाकु किती जणांना सहन होत नाहियेत. गंमत वाटली वाचून.
घरगुती, अतिप्रेमळ, काहीशी भाबडी बाई त्यांनी चांगली रंगवली आहे की.
कदाचित तुम्ही त्यांच्या जास्त मालिका पाहिल्या असणार.
मला तर तो एक नं. चा चोमडा
मला तर तो एक नं. चा चोमडा वाटतो नेहमीच. अभिनय आणि स्वप्निल हा हा हा फ़ारच विनोदी आहात तुम्ही !
घरगुती, अतिप्रेमळ, काहीशी
घरगुती, अतिप्रेमळ, काहीशी भाबडी बाई त्यांनी चांगली रंगवली आहे की.>>>>>>>>>>+१
अशीही व्यक्ती असु शकते जगात.
पण इतकी फसवणुक, कट कारस्थान स्वतःबरोबर होउनही अतिच्शय चांगुलपणा दाखवुन आपल्या पाताळयंत्री सावत्र बहिणिला आपल्याच घरात ठेउन तिच लग्न करुन देणार्या आनंदी सारखी कुणि अती माठ असेल तर नवलच. इतकी काळजी होती बहीणिची तर कशाला त्या इरला तिला सोडायला लावलीस. राहुन द्यायचे की त्याच्या बरोबर. सॉरी चुकीच्या ठीकाणी राग काढला
मला तर तो एक नं. चा चोमडा
मला तर तो एक नं. चा चोमडा वाटतो नेहमीच.>>>>>>>>>>
हे एक नवीनच
सस्मित मी सहमत आहे
सस्मित मी सहमत आहे तुमच्याशी.. ते कुरघोड्या, उगाचच अति रागाचे भाव, आणि बरच काही बघायची सवय झालेय इतरांना.. एलदुगो कशी आवडणार? ...
मला फार आवडते. हलके फुलके प्रसंग खुप छान वाटतात..
घरगुती, अतिप्रेमळ, काहीशी
घरगुती, अतिप्रेमळ, काहीशी भाबडी बाई त्यांनी चांगली रंगवली आहे की.>>>>>>>>>>+१
मला फार आवडते ही सिरीयल....
मला फार आवडते ही सिरीयल.... बाकिच्या महा टुकार , इललॉजिइल मालिकान पेक्शा फारच छान आहे ही मालिका.
<माठ अरुंधती, आभास हा,
<माठ अरुंधती, आभास हा, पिंजरा, पवित्र रीश्ता, दोन किनारे दोघी का काही तरी असेच, पुढचं पाउल, दिल्या घर> यातली एकही मालिका पहात नाही . पण सतीश राजवाडे, चिन्मय मांडलेकर, मनस्विनी, मुक्ता बर्वे, इ. नावांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या. मुळात ही सगळी नावं बघून काही वर्षांनी मराठी मालिका बघू लागलो (यापूर्वी पाहिलेली 'मंथन').या मालिकेसाठी मार्केट टुडे आणि मार्केट टुमॉरोला टांग दिली. त्यामुळे ही 'वासरांत लंगडी गाय शहाणी' किंवा 'दगडापेक्षा वीट मऊ' असा अल्पसंतुष्ट प्रेक्षक व्हायला माझा नकार आहे.
सगळ्या अभिनेत्यांचा मागणीनुसार योग्य अभिनय ही एक जमेची बाजू आहे (त्यातही मोहन जोशी गळले).
साधारण अशाच पार्श्वभूमीच्या 'ससुराल गेंदा फूल'मधल्या कोणत्याही पात्राचे वर्तन किमान त्या पात्राच्या स्वभावाशी/पार्श्वभूमीशी विसंगत वाटत नाही. तसंच प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतंत्र कहाणीही आहे. इथे अख्ख्या जगाला राधा आणि घना, त्यांचे लग्न, मग हनीमून याव्यतिरिक्त काही उद्योगधंदा असल्याचे दिसत नाही.
निखळ विनोदी मालिका म्हणून बघायची तर ज्यातल्या मॅडनेस मधेही एक सिस्टम होती अशा हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या मालिकांबरोबर तुलना केल्याशिवाय रहावत नाही. खिचडीतला गधा प्रफुल पारिख सॉफ्टवेअर इंजिनीयर नव्हता.
असो.
भरत +१ ईथे हि मालिका आवडायलाच
भरत +१
ईथे हि मालिका आवडायलाच पाहिजे अशी जबरदस्ती का? आणि ह्या मालिकेसाठीच हा बाफ आहे ना मग त्यावर सविस्तर लिहिणारच ना. त्याला किस पाडणे असं का संबोधलं जातय? का फक्त छान मालिका आहे हो, असच म्हणत रहायचं?
मलाहि हि मालिका आवडते , पण सध्या खरच काहिहि दाखवतायत.
आणि ईतर मालिकांशी तुलना कशाला? ह्यात कट कारस्थानं नाहित म्हणून हि चांगलीच असं थोडच असतं. जर हि मालिका बघायचं सोड्लं तरी बाकिच्या मालिका बघायलाच पाहिजेत असं माझ्यावर बंधन नाहि
ज्यांना जे वाटतय ते लिहुदे कि रावः)
आता मालिकेबद्दलः राधा टिकली लावून छान दिसतेय. आणि सासूबाई खूप लाडेलाडे बोलतायत. आत्या एकदाची बसमध्ये बसलीय. आणि मालिका प्रचंड गंड्लीय.
ईथे हि मालिका आवडायलाच पाहिजे
ईथे हि मालिका आवडायलाच पाहिजे अशी जबरदस्ती का?>>>>>>>>>> कोण करतयं जबरदस्ती?? फक्त अगदीच लॉजिकल कीस नका काढु असं लिहिलयं. राधाची आत्या अजुन इथे काय करतेय?? तिच्या घरी कुणी नाही का? तिच्या घरचे कुणीच लग्नाला का आले नाहीत?? घना २४ तास घरीच असतो, आणि अगदीच म्हणजे स्वप्निल्-राधा वांगी, भोपळी, पोती वैवै.
बाकी काय कुणाला एलदुगो आवडेल तर कुणाला आभास हा-ज्याची त्याची आवड. असो.
ए तो काजोल, अनिल कपूरचा
ए तो काजोल, अनिल कपूरचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरचा चित्रपट आठवला, तशी स्टोरी गंडू नये म्हणजे मिळवली
मला तर बाबा सध्या उंच माझा
मला तर बाबा सध्या उंच माझा झोका आणि हीच शिरेल भारी आवडते.
मस्त चाल्लय की आणि परत डोक्याला ताप नाही.
काजोल नाही त्यात श्रीदेवी आणि
काजोल नाही त्यात श्रीदेवी आणि उर्मिला होत्या - जुदाइ.
नाही माधव बागेश्री वेगळ्या
नाही माधव बागेश्री वेगळ्या चित्रपटाविषयी बोलतिये.. त्यात काजोल च होती.. खुप्प मोठे नाव होते त्याचे.. हा आठवले.. हम आपके दिल मैं रहते है.. किंवा असेच काहितरी...
@हेकायनितेकाय : एक्दम बरुबर
@हेकायनितेकाय : एक्दम बरुबर ....!
भान >> +१
भान >> +१
सस्मितला अनुमोदन आपण तर
सस्मितला अनुमोदन
आपण तर एंजॉय करतोय ही मालिका बघणं. मस्त टाइमपास होतोय. काही ठिकाणी अतिरेक होतोय पण एकूण मजा येतेय मालिका बघायला. स्वप्निलने मस्त काम केलय.. अगदी सहज..
मी सध्या फक्त दोन मालिका बघतो.. उंच माझा झोका आणि ए.ल.दु.गो.
Pages