मसाला बांगडा

Submitted by मनी on 9 April, 2012 - 13:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 
  1. ४ बांगडे
  2. अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
  3. ३ टेस्पून लाल तिखट
  4. १/२ टीस्पून हळद
  5. १ टेस्पून धणे पावडर
  6. २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
  7. १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  8. १ टेस्पून मिठ
  9. केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
  10. १ टीस्पून तेल
क्रमवार पाककृती: 
  1. बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरत ठेवावे.
  2. केळीची पाने स्वच्छ करून त्यांच्या उलट बाजूला ३-४ थेंब तेल लावून ठेवावे.
  3. तव्यावर थोडेसे तेल टाकून गरम करायला ठेवावा.
  4. आता एक बांगडा एका पानाच्या तुकड्यावर ठेवावा आणि पान दुमडून घ्यावे.
  5. तापलेल्या तव्यावर ही गुंडाळी टाकून प्रत्येक बाजूने १०-१२ मिनिटे शिजवावे.
  6. सर्व्ह करावे..

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

कांदा-लसूण मसाला एक्दम झणझणीत लागतो. कमी तिखटपण बनवू शकता पण तेव्हढे छान लागणार नाहीत Happy
मसाला पेस्ट अगदी छान लागली पाहीजे बांगड्यांवर...
लिंबाऐवजी चिंच जास्त छान लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अमेरीकेतच आहे पण ते भारतात मिळतात तसे दिसले नाही. एशियन मार्केट व हाँगकाँग मधून आणले होते बर्‍याच वर्षापुर्वी. ते एकदम बेकार निघाले.

झंपी, मला Indian Mackerel मिळाले ते फार छान नाही पण ठीकठाक लागत होते म्हणूनच मालमसाला जरा जास्त लागतो. Happy