४ औस बिटरस्वीट चॉकलेट चिप्स
१/३ कप स्विटन्ड कंडेन्स्ड मिल्क
२ अंड्याचा बलक
३ अंड्यातले फक्त पांढरे
रॅमिकिन्सना आतुन लावण्यासाठी थोडे बटर आणि १ टे स्पून ग्रॅनुलेटेड साखर ( बारीक दळलेली साखर)
थोडी आयसिंग शुगर वर भुरभुरवण्यासाठी
ओवन ३७५ फॅ. ला तापत ठेवा. ४ औस मापाच्या रॅमिकिनला आतून बटर लावून घ्या. नंतर त्यात थोडी ग्रॅनुलेटेड साखर घालून रॅमिकिन हळू हळू फिरवा आतून साखरेचा थर बसेल. जास्तीची साखर झटकून टाका. असे चारही रॅमिकिन्सला करा.
मायक्रोवेव मधे चालेल अशा बोलमधे चॉकलेट चिप घालून १५-२० सेकंदाच्या अवधीसाठी गरम करा. ढवळून पुन्हा १५-२० सेकंद गरम करा. असे साधारण एक ते दिड मिनीट केल्यावर चिप्स वितळतील. मावेतून बाहेर काढून वितळलेल्या चॉकलेट मधे कंडेन्स्ड मिल्क घालून वायर विस्क वापरून ढवळा. आता त्यात दोन अंड्याचे बलक घालून ढ्वळून एकजीव करा.
आता अंड्यातील पांढरे हँड किंवा स्टँड मिक्सर वापरुन फेटायला घ्या. ३-४ मिनिटे फेटल्यावर मिश्रण मिडीयम स्टीफ होईल. यातले १/३ पांढरे चॉकलेटच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने ढवळा. एकजीव झाले की त्यात उरलेले पांढरे घाला. आता रबर स्पॅट्युला वापरुन अंड्याचे पांढरे हलक्य हाताने मिश्रणात फोल्ड करा. तयार मिश्रण ४ रॅमिकिन्स मधे हलक्या हाताने घाला. वरुन थोडी आयसिंग शुगर भुरभुरवा.
आता रॅमिकिन्स कूकी शीट वर ठेऊन ओवन मधे ११-१३ मिनिटे बेक करा. रॅमिकिनच्या कडेच्या साधारण १ इंच वर सुफ्ले आला पाहिजे. बेक करताना ओवन मधे उघडू नका
ओवन मधून बाहेर काढून लगेच वाढा. १-२ मिनिटात सुफ्ले फ्लॅट होतो.
ही शॉर्टकट रेसिपी आहे.
मिश्रण रॅमिकिनमधे घालून प्लॅस्टिक व्रॅप लावून फ्रीज मधे तयार करुन ठेवता येते. आयत्या वेळी व्रॅप काढून बेक करायचे.
अंड्याचे पांढरे फेटण्यासाठी वापरणार तो बोल स्वच्छ कोरडा हवा. फेटताना चिमूटभर क्रिम ऑफ टार्टर वापरल्यास तसेच अंडी रूम टेंप ला असतील तर पांढरे छान हलके फेटले जाते.
मस्त. आधी रॅमिकिन्स म्हणजे
मस्त. आधी रॅमिकिन्स म्हणजे काय विचारणार होते पण फोटो बघितल्यावर आलं लक्षात.
व्रॅप???
छान दिसते आहे. सुफले असे जमणे
छान दिसते आहे. सुफले असे जमणे जरा कौशल्याचे काम आहे !!
वॉव...
वॉव...
मस्तं, स्वाती२
मस्तं, स्वाती२
धन्यवाद सायो, दिनेशदा,
धन्यवाद सायो, दिनेशदा, स्नेहश्री, रैना.
दिनेशदा, सॉस बेस तयार करुन सुफ्ले करायला कौशल्य लागते. पण यात कंडेन्स्ड मिल्क वापरल्याने खूप सोप्पा आहे. टीन एजर्सनासुद्धा जमतो.
मस्तं,...............
मस्तं,...............
रॅमिकिन्स म्हंजे????
रॅमिकिन्स म्हंजे????
धन्यवाद सृष्टी! टोकूरिका,
धन्यवाद सृष्टी!
टोकूरिका, रॅमिकिन म्हणजे सिरॅमिक किंवा काचेचा बोल. वर फोटोत आहे तसला.
http://www.amazon.com/b?ie=UTF8&node=289672