Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>दहा मित्रांच्या दहा डिस्कवर
>>दहा मित्रांच्या दहा डिस्कवर ह्याचा डेटा आहे म्हणे प्रोजेक्टचा
का?का?का? हा सेम डेटा दहा डिस्कवर आहे का वेगवेगळा डेटा दहा डिस्कवर आहे? एका डिस्कवर डेटा टाकून ती आपल्याजवळ ठेवायला कायद्याने बंदी आहे का? हा क्लायन्ट डेटा असेल आणि मित्रांकडे तो ठेवला तर क्लायन्टची प्रायव्हसी काय राहिली? प्रोजेक्टचा डेटा दहा डिस्कवर आहे तर code किती डिस्कवर आहे? हा अफलातून प्रोजेक्ट कसला आहे? हा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट आहे का अख्ख्या पृथ्वीच्या जनगणनेचा डेटा? हा माणूस कोणत्या कॉलेजातून सॉफ्टवेअर इंजिनियर झाला?
आणखी एक मिलियन डॉलर प्रश्न -
आणखी एक मिलियन डॉलर प्रश्न - तो डेटा दहा डिस्कवर असण्याचा आणि घना-राधा केरळला जाण्याचा काय संबंध? तेव्हढ्या वेळात इएमएफ फिल्ड निर्माण होऊन तो डेटा डिलिट होणार आहे काय?
मालिका हळुहळु गंडायला लागली
मालिका हळुहळु गंडायला लागली आहे
त्या आत्याच्या घरी तिच्या
त्या आत्याच्या घरी तिच्या लग्नाची दुसरी गोष्ट चालु आहे काय??? आधी इतके दिवस भावाच्या घरी ठाण मांडलेले, आता घनाकडे राहायचा हट्ट.. घनाच्या घरात भरपुर बाया आहेत त्याची काळजी घ्यायला.. हिच्या नव-याच्या घरी कोण आहे??????????? तिने आतातरी जायला हवे.
ही मालिका regularly follow
ही मालिका regularly follow करणार्या माझ्या ओळखीच्या एका बाईंनी मला विचारलं की घना Software Engineer असून जर का घरात इतका वेळ देऊ शकतो तर मग तुम्ही मुलं का सारखं Office Office करत असता???????????
>>आधी इतके दिवस भावाच्या घरी
>>आधी इतके दिवस भावाच्या घरी ठाण मांडलेले, आता घनाकडे राहायचा हट्ट
अगदी अगदी. मी आईला हेच विचारलं की ही अजून घरी गेली नाही का. आणि मध्ये मध्ये डोक्यात हिंदीचा किडा चावल्यासारखी मराठी अॅक्सेन्टमध्ये हिंदी बोलते....ऐकवत नाही अगदी.
पुन्हा राधा-घना निघाले
पुन्हा राधा-घना निघाले अस्ताना सुप्रियाकाकू तहानलाडू-भूकलाडू म्हणून काहीतरी बांधून देते. काय तर म्हणे केरळमध्ये डोसे खाऊन खाऊन कंटाळा येईल. केरळमध्ये कधीपासून नुस्ते डोसे मिळायला लागले? आणि हे तिच्यासारखं कुकबुक लिहिणार्या बाईने म्हणावं? एनडीटीव्ही गुड टाईम्स पहात जावं जरा मधून्मधून.....आपण वर्गणी काढून राजवाड्यांना गॉड्स ओन कन्ट्री मध्ये फिरवून आणायचं का केसरींबरोबर?
<<कुहू या पात्राच्या कवितांचा
<<कुहू या पात्राच्या कवितांचा अतिरेक होतो. खर्या मनुष्याच्या आयुष्यात एव्हाना डॉ. कडे ट्रीटमेंट सुरु झाली असती >>अगदी अगदी . आचरट पणाची कमाल
पाहिल्या पहिल्यांदी जरा बरी वाटलेली होती .आता आजकाल फारच बोअर व्हायला लागल्येय
मग तुम्ही मुलं का सारखं
मग तुम्ही मुलं का सारखं Office Office करत असता??????????? >>>
बांधीव पटकथा असलेल्या सिरियली इतिहासजमा झाल्यात बहुद्धा.
त्यामुळे एकेक धागे आधी उसवायचे मग ते जागी बसवायचे अस सुरु आहे.
अरुण
अरुण
मला कंटाळा आला. यापेक्षा
मला कंटाळा आला. यापेक्षा खिचडीचे रिरन्स बघेन.
यापेक्षा खिचडीचे रिरन्स बघेन.
यापेक्षा खिचडीचे रिरन्स बघेन. >>>>>> कधी ????? कुठे????? किती वाजता ??????
मला पण खिचडी, साराभाई यांचे रिरअन्स बघायला आवडतात.
सध्या कुठेही नाहीत
सध्या कुठेही नाहीत
खरच कंटाळा येतोय आता.
खरच कंटाळा येतोय आता.
बरं झालं मी ही सिरीयल बघणं
बरं झालं मी ही सिरीयल बघणं सोडून दिलं ते
स्वप्ना, एवढे प्रश्न मालिकेशी
स्वप्ना, एवढे प्रश्न मालिकेशी संबंधित लोकांना पडत नाहीत.
डेटा कसला ते माहीत नाही, पण त्याला म्हणे त्याच्या जॉब विंटरव्युसाठी (हो हो अमेरिकेतला जॉब बरं) हवाय. अमेरिकन कंपनीला पण कळलंय की याला काँप्युटरमधलं काही येत नाही, त्यामुळे स्काइपवर इंटरव्युचा प्लान बारगळलाय. विंटरव्यु घेणारा अधिकारी हैद्राबादला येणार आहे म्हणे. (नक्की सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब आहे की रोज काँप्युतरवर फडकी मारायचीत?)
बरं. क्षणभर मान्य करू की दहा मित्रांकडच्या दहा हार्ड डिस्कवर महत्त्वाचा डेटा आहे. कसा, तर घनश्याम फार उदार आहे, त्यामुळे आपल्या हार्डडिस्क त्यातल्या महत्त्वाच्या डेटासकट तो आपल्या मित्रांना देतो (ते तरी त्या हार्ड डिक्सच वापर पेपरवेट म्हणून करत नसतील कशावरून). पण दहा मित्रांकडून डिस्क्स घ्यायच्या तर आधी एकाकडे जायचे , डिस्क आणायची कॉपी करायची, परत करायची, मग दुसर्याकडे जायचे....असं दहाव्या मित्रापर्यंत..... असा म्हणे त्याचा प्लान आहे. ठीक आहे. काँप्युटरमधलं काही कळत नाही, मालिकावाल्यांना पेन ड्राइव्ह, इमेल कधी ऐकलं नाही. पण दहा मित्रांना सरळ डिस्क्स घेऊन बोलवायचं की याच्या घरी नाहीतर हापिसात (म्हणजे जिथे बसून तो रोज पिझ्झा ऑर्डर करतो ती जागा)...अरे हो पण मालिकेचे बजेट कमी आहे ना? त्यामुळे जे मित्र थाटामाटाच्या लग्नाला आले नाहीत ते हार्डडिस्क घेऊन कसे येतील?
बरं आता याला बेड रेस्ट आहे, तर त्या डिस्क्स आता कसा आणणार? आणि विंटरव्युचा कॉल आला तर जाणार कसा?
घनश्याम पडल्याने आपल्याला टेन्शन आले पाहिजे याचा राधाला साक्षात्कार होतो याशिवाय शनिवारच्या भागात एकही गोष्ट धड नव्हती.
घनश्याम पडल्यावर मला आता त्याची आई तिथे येईल आणि आई आई म्हणुन कळवळणार्या सोनुल्या बाळुल्याच्या गळ्यात गळा घालून भोकाड पसरेल याचेच मला टेन्शन आले होते
मग तुम्ही मुलं का सारखं
मग तुम्ही मुलं का सारखं Office Office करत असता???????????
अगदी बरोबर आहे.;)
खरंतर एका लग्नाची दुसरीच गोष्ट सुरु आहे.
आत्याबाईंना म्हणावं आता जा आपल्या घरी.
कंटाळा आलाय या मालिकेचा.
घना पडला त्या प्रसंगात आई किती उशिरा आली.
लग्नाचा इतका तिटकारा असलेल्या दोघांना नको नको ते जवळीकीचे प्रसंग पार पाडावे लागतायत म्हणून आपल्याला ते पटत नाही.;)
स्सॉल्लीड् बोअर होत आहे
स्सॉल्लीड् बोअर होत आहे
हायला, इथल्या प्रतिसादांचा
हायला, इथल्या प्रतिसादांचा प्रिंटआऊट काढून तो मालिकावाल्यांना वाचायला दिला पाहिजे. एक जरा बरी मालिका सुरु होती त्याची पण वाट लावली.
घना बाहेरुन पाय बांधुन आणि
घना बाहेरुन पाय बांधुन आणि राधाच्या गळ्यात हात घालुन येतो आणि आई काहीतरी विचारते त्यावर मला काही आठवत नाहीय म्हणतो त्यावर आईची प्रतिक्रिया मस्त होती. बहुतेक लोक आता कंटाळले असल्याने ती प्रतिक्रिया सगळ्यांनी बहुतेक मिस केली.
आज आई पहिल्यांदा काहितरी सुसंबद्ध बोलली.
ती राधा तर ४ ते फार तर गेला
ती राधा तर ४ ते फार तर गेला बाजार ५ एक्स्प्रेशन वर काम चालवत आहे.
अरे एव्हढा कीस का पाडता आणि
अरे एव्हढा कीस का पाडता आणि लॉजिक तरी का लावता?
त्या श्रेयस्-वैदेही, आक्कासाहेब आणि ती रडकी कल्याणी यांच्या मालिकांना असते का काही लॉजिक?....
निदान इथे उगा दहा लोकांचे दहा कोनातुन क्लोजअप्स, ढ्याण ढ्याण बॅकराउंड म्युझिक आणि नात्यानात्यातली भांडणे आणि कुरघोडी नाही.... इथे सगळ कस मानवी पातळीवर आणि हसत खेळत चाललेले असते.... दिवसभर ऑफिसात अति-लॉजिकल वागून घरी आल्यावर थोडस लॉजिक खुंटीवर टांगून मस्त मनोरंजन करणारच काहीतरी हव असतं... सो चिल माडी.... यंजोय
पुन्हा राधा-घना निघाले
पुन्हा राधा-घना निघाले अस्ताना सुप्रियाकाकू तहानलाडू-भूकलाडू म्हणून काहीतरी बांधून देते. काय तर म्हणे केरळमध्ये डोसे खाऊन खाऊन कंटाळा येईल. केरळमध्ये कधीपासून नुस्ते डोसे मिळायला लागले? आणि हे तिच्यासारखं कुकबुक लिहिणार्या बाईने म्हणावं?
>>>
ए पार असहमती बर
खरच केरळ ला तेवढच मिळत (जे अॅट्लिस्ट आपण खाऊ शकतो असं)
मग तुम्ही मुलं का सारखं Office Office करत असता???????????
>>>
कुहु आणि आत्याबद्दल जोरदार अनुमोदन
बरं झालं मी ही सिरीयल बघणं सोडून दिलं ते
>>
मी पण
राधाच्या अत्याला पोरं बाळं
राधाच्या अत्याला पोरं बाळं नाहीत का? कधीच उल्लेखसुद्धा नाही आला अत्तापर्यंत
ही मालिका regularly follow
ही मालिका regularly follow करणार्या माझ्या ओळखीच्या एका बाईंनी मला विचारलं की घना Software Engineer असून जर का घरात इतका वेळ देऊ शकतो तर मग तुम्ही मुलं का सारखं Office Office करत असता??????????? >>
>>बरं आता याला बेड रेस्ट आहे,
>>बरं आता याला बेड रेस्ट आहे, तर त्या डिस्क्स आता कसा आणणार? आणि विंटरव्युचा कॉल आला तर जाणार कसा?
हो ना, नाहीतर डिस्क्स आणायला जायचा आणि स्लिपडिस्क व्हायची खरं तर स्वतःचा बिझिनेस म्हणजे नोकरीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात. पण घना बघावं तेव्हा तंगड्या पसरून आरामात घरी बसलेला. कालचा एपिसोड नुसता ऐकला असता तर घना म्हणजे आईचं शोनुल, कुक्कुल ७-८ वर्षांचं बाळ आहे असं वाटलं असतं एखाद्याला. काय ते सारखं 'बाळा, बाळा'.....आता तर काय 'हनिमून बुडला' म्हणून सगळे गळा काढत आहेत. आद्य हनिमूनकार अॅडम आणि इव्ह ह्या जोडगोळीच्या 'झालेल्या' हनिमूनवर जेव्हढा गहजब झाला नसेल तेव्हढा राधा आणि घनाच्या 'न झालेल्या' हनीमूनवर होतोय.;-)
आद्य हनिमूनकार अॅडम आणि इव्ह
आद्य हनिमूनकार अॅडम आणि इव्ह ह्या जोडगोळीच्या 'झालेल्या' हनिमूनवर जेव्हढा गहजब झाला नसेल तेव्हढा राधा आणि घनाच्या 'न झालेल्या' हनीमूनवर होतोय >>
पाहताना येवढे क्रेझी वाटत नाही. अतिरंजित आहेच. पण इतर फालतू मालिकांच्या तुलनेत अजूनही पहायला हरकत नाही.
स्वरूप +१ . <तू कुठल्या सिरीयलींबद्दल बोलतो आहेस ते नाही माहित, पण तसल्याच बहुतेक सगळ्या त्यामुळे जोरदार अनुमोदन.>
अरे एव्हढा कीस का पाडता आणि
अरे एव्हढा कीस का पाडता आणि लॉजिक तरी का लावता?
त्या श्रेयस्-वैदेही, आक्कासाहेब आणि ती रडकी कल्याणी यांच्या मालिकांना असते का काही लॉजिक?....
निदान इथे उगा दहा लोकांचे दहा कोनातुन क्लोजअप्स, ढ्याण ढ्याण बॅकराउंड म्युझिक आणि नात्यानात्यातली भांडणे आणि कुरघोडी नाही.... इथे सगळ कस मानवी पातळीवर आणि हसत खेळत चाललेले असते.... दिवसभर ऑफिसात अति-लॉजिकल वागून घरी आल्यावर थोडस लॉजिक खुंटीवर टांगून मस्त मनोरंजन करणारच काहीतरी हव असतं... सो चिल माडी.... यंजोय >>>>> +१०००० अनुमोदन..
मलाही ही मालिका बरी वाटतेय.. आणि कालच्या एपिसोड मधे जेव्हा राधा म्हणते की ती फक्त तुझी माणसं आहेत माझी कुणीच नाहीत का? हे वाक्य तर अगदी सहज आल्यासारखं वाटल. ती कितीही प्रक्टिकल दाखावली असली तरी तिच्यात पण एक साधी मुलगी जिने खरखुर लग्न करुन काळेंच्या घरात प्रवेश केला आहे.. तिच्या मनात आता काळे परिवाराबद्द्ल आपुलकी निर्माण होतेय.. बघुया पुढे काय होत ते..
रैना तो पुढ्च पाऊल आणि
रैना तो पुढ्च पाऊल आणि स्वप्नांच्या पलिकडले (सगळं आपण स्वप्नात पण विचार करणार नाही इतक भयानक घडतय यात) या दोन मालिकांबद्द्ल बोलतोय..
रैना + १
रैना + १
Pages