Submitted by मी अभिजीत on 8 April, 2012 - 08:03
येउदे शिशिर कशास खंत पाहिजे
आपुल्या मनामधे वसंत पाहिजे
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मूर्तिमंत पाहिजे
आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे
पाहतो उगाच का तुला पुन्हा पुन्हा
ह्रुदय सांगते मला उसंत पाहिजे
जन्मठेप, शृंखला सुखावतीलही
सूर पण अनादि अन् अनंत पाहिजे
सागराकडून का तहान भागते
कातळातला झरा निरंत पाहिजे
आणशील स्वर्गही धरेवरी उद्या
बस तुझ्यातला कवी जिवंत पाहिजे
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
भेसळीशिवाय सौख्य जर हवे
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मुर्तिमंत पाहिजे....... खल्लास!
आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे.....क्या बात!
सागराकडून का तहान भागते
कातळातला झरा निरंत पाहिजे......सही
आणशील स्वर्गही धरेवरी उद्या
बस तुझ्यातला कवी जिवंत पाहिजे........येस्स्स्स्स्स्स!
मस्त रे!!
मस्त रे!!
वाह!
वाह!
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
भेसळीशिवाय सौख्य जर हवे
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मुर्तिमंत पाहिजे
आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे>>
छान शेर
व्वा!!
व्वा!!
मस्त आणि सुरेख..........
मस्त आणि सुरेख..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात है! बोहोत खूब!
क्या बात है! बोहोत खूब!
>>सागराकडून का तहान
>>सागराकडून का तहान भागते
कातळातला झरा निरंत पाहिजे
व्वा !
क्या बात है अभिजीत ... जियो !
क्या बात है अभिजीत ... जियो !
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मुर्तिमंत पाहिजे
आग जीवनासही क्षणात लागते
तेवढा विषय तुझा ज्वलंत पाहिजे
पाहतो उगाच का तुला पुन्हा पुन्हा
ह्रुदय सांगते मला उसंत पाहिजे
शेवटचा शेरही टॉप
अभिजीत नावावरून लक्षात नाही आलं. पण गझल वाचतानाच वाटलं अभिजीत दाते असणार नाव...आणि खरंच निघालं. तुमच्या गझला सहज असतात.
मस्त गझल भेसळीशिवाय सौख्य जर
मस्त गझल
भेसळीशिवाय सौख्य जर हवे तुला
कनवटीस दु:ख मुर्तिमंत पाहिजे
आणि शेवटचा शेर.. दोन्ही खूपच आवडले.. लिहीत रहा असाच
खुपच छान
खुपच छान
गझल आवडली अभिजीत! ज्वलंत शेर
गझल आवडली अभिजीत! ज्वलंत शेर तर फारच...
पुलस्तिशी सहमत! अनादि-अनंत चा
पुलस्तिशी सहमत!
अनादि-अनंत चा शेर खास!
जयन्ता५२
हाय आभिजीत! तुझी गझल आवडली.
हाय आभिजीत! तुझी गझल आवडली. काही ठिकाणी –हस्वदीर्घाच्या चुका दिसल्या. कृपया त्या टाळाव्यात. गझलेत असे दोष बोचरे वाटतात. काही शेरात अर्थबोध होत नाहीत. तुझा पूर्ण आदर करून मी खालील शेर देत आहे. तुझ्या मनातील भाव ताडून ते लिहित आहे. काही ठिकाणी संपूर्ण शेर बदलतो. पण पहा कसे वाटते ते. हे फक्त पर्यायी शेर आहेत. तू तुझ्या गझलेवर परत चिंतन करावेस, निश्चितच तुझी गझल सुरेख होईल! पर्यायी शेर असे:
पानगळ असो, कशास खंत पाहिजे?
आपल्या मनामधे वसंत पाहिजे!
पाहिजे तुला खरेच सौख्य जीवनी?
कनवटीस दु:ख मूर्तिमंत पाहिजे!
जाणवेल आगही तुझ्या उरातली;
मात्र शब्दही तुझा ज्वलंत पाहिजे!
केवढे विचारतेस प्रश्न तू मला?
श्वास घ्यायला मला उसंत पाहिजे!
जन्मठेपही मजेत घालवीन मी;
ध्यास मात्र अंतरी अनंत पाहिजे!
मृगजळाकडून का तहान भागते?
काळजामधे झरा निरंत पाहिजे!
या जगास आणशील जाग तूच रे....
बस, तुझ्यातला कवी जिवंत पाहिजे!
..........................................................
गझल आवडली .
गझल आवडली .
अभिजीत, एक नितांत सुंदर
अभिजीत, एक नितांत सुंदर गझल... सगळे म्हणजे सगळे शेर आवडलेत.
सतीश, पर्यायी शेरही सुरेख आहेत. पण मला ते बर्याच ठिकाणी, अभिजीतच्या आशयापासून दूर जाणारेच वाटतायत. तो एक वादाचा विषय होऊ नये.
अभिजीतच्या र्हस्वं-दीर्घाच्या चुका मात्रं मलाही जाणून घ्यायच्यात. (अभिजीतने त्या नंतर गजल बदलली नसेल आणि आता त्याची हरकत नसेल तर). माझ्यासाठी (आणि इथे अनेकांसाठीही) ही एक शिकण्याची संधी असेल.
वा! खुपच सुंदर
वा! खुपच सुंदर गझल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सौख्याचा,सागराचा आणि शेवटचा शेर फार फार आवडला
दाद साहेब! माझ्या
दाद साहेब! माझ्या प्रतिक्रियेत मी स्पष्ट उल्लेख केला आहे की काही ठिकाणी संपूर्ण शेर बदलतो. हे पर्यायी शेर फक्त चिंतनासाठी दिले आहेत. ‘मुर्तिमंत’शब्द
‘मूर्तिमंत’ असा हवा. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
सतीशदा,
सतीशदा, धन्यवाद..!
‘मुर्तिमंत’ टायपो चूक होती. सुधारली आहे.
तुमचे शेरही छान आलेत..