Submitted by आनंदयात्री on 4 April, 2012 - 00:45
काय म्हणे तर तिचा एकदा नकार आला
बेघर दु:खाला मोठा आसरा मिळाला
सौंदर्याची व्याख्या त्यांना पटली नाही
त्यांना ठाउक होती केवळ 'ती' मधुबाला!
खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या
हळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला!
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला
कायम झटलो ज्यांच्यासाठी, तेही फसले
म्हणून गेले जाताना, "नौटंकी साला!"
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post_27.html)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा वा......... मस्तच..... मी
वा वा......... मस्तच.....
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!
हे अतिशय सुंदर........
भारी...
भारी...
शेवटच्या शेरातला खयाल
शेवटच्या शेरातला खयाल आवडला.
बाकी बर्याच शेरात टीकेचा सूर, अस्पष्टता आणि मिसर्यांमधे क्षीण संबंध असे बरेच काही...
नेहमीचे आनंदयात्री दिसले नाहीत गझलेतून.
चुभूद्याघ्या.
शुभेच्छा!!
मर्जीवरती तुझ्या चालले आहे
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!>> व्वा व्वा पहिली ओळ फारच आवडली. 'इलाज नाही' चा ग्रूव्ह लक्षात आला नाही.
कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला>> दुसरी ओळ अप्रतिम
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!>> मस्त मस्त, खयाल आवडला.
काही / बरेच शेर मलाही संदिग्ध वाटले किंवा लक्षात आले नाहीत नीटसे.
धन्यवाद
खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या
खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या
हळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला!
>>
व्वा
हाही आवडला.
आधीच्या प्रतिसादात मी जे 'संदिग्ध ' म्हणालो आहे त्यापेक्षा मला काही शेर आपल्या टचचे वाटले नाहीत असे म्हणायचे आहे. मधुबाला अथवा नौटंकी असे
झेपली नाही.
झेपली नाही.
काही शेर छान
काही शेर छान
मी दु:खाच्या चर्येवर आणतो
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला! >>>>
वा नचिकेत - क्या बात है.......
कल्हईवाला अत्यंत दर्जेदार
कल्हईवाला अत्यंत दर्जेदार शेर, नचिकेत! फार आवडला!
कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला>> क्या बात!
अ फ ला तू न!!! मतल्यातील
अ फ ला तू न!!!
मतल्यातील दुसरा मिसरा वगळून आख्खीच्या आख्खी गझल आवडली
शेवटचा शेर तर क्या कहेने!
-सुप्रिया.
तुझ्या नेहमीच्या स्टाईलहून
तुझ्या नेहमीच्या स्टाईलहून जरा वेगळी गझल...
शेवटचा मस्तच
हव्यासाला पण छान...
पण प्रत्येक शेरात काहीतरी राहून गेले असे वाटले.. आलेत त्या शब्दांऐवजी अजून वेगळे शब्दही बसू शकले अस्ते त्याडृष्टीने सगळे संदिग्ध म्हणत असावेत
मर्जीवरती तुझ्या चालले आहे
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
वा वा ! क्या बात है...
शेवटचा शेरही भारी.
पहिला , दुसरा शेर झेपला नाही
पहिला , दुसरा शेर झेपला नाही
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
>>>
छान
कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला
>>>
व्वा!
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!
>>>
हा अप्रतिम आहे
खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या
खरडत गेला, गर्दी जमली, टाळ्या पडल्या
हळूच त्याचा व्यासंगी साहित्यिक झाला!
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
मी दु:खाच्या चर्येवर आणतो झळाळी
येइल तुमच्याही दारी हा कल्हईवाला!
>>>>>>>>>>>>>>>>>>
हे शेर आवडले. मस्त.
'साहित्यिक', 'कल्हईवाला' हे
'साहित्यिक', 'कल्हईवाला' हे शेर आणि "मर्जीवरती तुझ्या.." ही ओळ, खूप आवडले!
मर्जीवरती तुझ्या चालले आहे
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
कौतुक व्हावे यासाठी ही धडपड हल्ली
ओळखही आवश्यक नसते हव्यासाला
>>>
जबरदस्त!
आनन्दयात्रीजी एकेक शेर
आनन्दयात्रीजी एकेक शेर अप्रतिम !!
बाय दि वे कल्हईवाला हे तखल्लुस नवे घेतले काय ......... मस्त आहे !!!;)
नचि, माझ्या कुवतीनुसार मला
नचि, माझ्या कुवतीनुसार मला समजली आणि प्रचंड आवडली. एकुणातच जबरदस्त ! अप्रतिम जमली आहे रे गजल कल्हईवाल्या
धन्यवाद दोस्तहो! बाकी
धन्यवाद दोस्तहो!
बाकी बर्याच शेरात टीकेचा सूर, अस्पष्टता आणि मिसर्यांमधे क्षीण संबंध असे बरेच काही...
अॅक्चुअली, प्रत्येक शेरातच टीका/तक्रार अपेक्षित होती मला.. ते जमलेले नाही. मिसर्यांमधला क्षीण संबंध मलातरी जाणवला नाही बर्याच शेरांमध्ये.
मला काही शेर आपल्या टचचे वाटले नाहीत असे म्हणायचे आहे. मधुबाला अथवा नौटंकी असे
तुझ्या नेहमीच्या स्टाईलहून जरा वेगळी गझल...
हो. माझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडा वेगळा प्रयत्न आहेच. मला तो करायचाच होता.
'इलाज नाही' चा ग्रूव्ह लक्षात आला नाही.
माझा खूप आवडता शेर आहे म्हणून स्पष्टीकरण लिहितोय. हतबलता दाखवायची होती. या नात्याला नाव असतं तर कदाचित त्यानिमित्ताने तरी काही नियम लागू झाले असते. पण इथे सगळं तुझ्या मर्जीनुसार सुरू आहे. त्याला इलाज नाही, कारण या नात्याला नावच नाहीए!!
पण प्रत्येक शेरात काहीतरी राहून गेले असे वाटले.. आलेत त्या शब्दांऐवजी अजून वेगळे शब्दही बसू शकले अस्ते त्याडृष्टीने सगळे संदिग्ध म्हणत असावेत
असेलही...
पुन्हा एकदा धन्यवाद..
सुंदर....
सुंदर....
छान. आवडली.
छान. आवडली.
आवडली
आवडली
आवडेश
आवडेश
आवडली
आवडली
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
आज थोपु वर वाचली म्हग इथल्या
आज थोपु वर वाचली म्हग इथल्या प्रतिक्रिया वाचायला मुद्दाम आलो
मला तरी वरील सगळे म्हणताय्त तसे संदिग्धता अस्पष्टता क्षीण संबंध जाणवले नाहीत
शेर माझ्यापर्यंत व्यवस्थित पोचलेत असेच वाटते आहे
यात्रीजी तुमच्या स्टाईल बद्दल मला फारसे तपशीलवार वगैरे माहीत नाही .मी आवर्जून यात्री वाचलाच नाही कधी जितके समोर येईल ते वाचले आजवर
आता वाचत जाईन तुमचे इथले जुने नवे लेखन
जमलीतर आजच वाचून वाचून पाठच करावी म्हणतोय मी ही गझल !!!!
ही गझल अतीशय म्हणजे अतीशय खास क्लास म्हणावी अशी गझल आहे ..
प्रत्येक शेर खूप वेगळा ..अप्रतीम असा खयाल अतीशय सुंदर पद्धतीने व्यक्त करणारा... व उच्च दर्जाचाही आहे असे मी माझी लायकी (/ वकूब ?) नसतानाही आवर्जून सांगू इच्छितो
वरील चर्चेत आपलेही मत मांडावे म्हणून या प्रतिसादातला एकही शब्द लिहिला नाही आहे मला आज लिहावे वाटले तेच लिहिले
मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे बडबडावे वाटते आहे
चूक भूल द्यावी घ्यावी
________________________
अजून एक सांगायचे म्हणजे ..........
मर्जीवरती तुझ्या चालले आहे सारे
इलाज नाही! नावच नाही या नात्याला!
<<<<<<< मलातरी या शेरत विठ्ठल दिस्तो
एक ओळ आठवली .....
एकतर्फी प्रेमिकांचा इश्क आहे तो विठोबा !!!
:).....सहजच ...
धन्यवाद वैवकु ही वरती
धन्यवाद वैवकु ही वरती काढल्याबद्दल. छान प्रतिसादही.
तिरकस,खोचक,आशयघन गझल.शल्य लपवणारी.
कायम झटलो ज्यांच्यासाठी, तेही फसले
म्हणून गेले जाताना, "नौटंकी साला!"
जियो आनंदयात्री.