फोटोशॉप किडे - भाग १

Submitted by मुरारी on 27 March, 2012 - 01:50

फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न
आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू

फोटोशोप उघडा
file --- open --- तुम्हाला हवी असलेली image

हा फोटो मी घेतलाय

आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा

आता एकावर एक असे २ layer बनतील
आता त्याच window मध्ये सर्वात शेवटी जो भाग गोल वर्तुळाने highlight केलाय , त्या बटनावर क्लिक करून " black न white " option सिलेक्ट करा '

आता आपली कार अशी blackn white दिसेल
त्यानंतर डाव्या बाजूला तो टूल बॉक्स आहे त्यातला खोडरबर (इरसेर) सिलेक्ट करा

आता काम सोप्पय ... जेवढा भाग आपल्याला रंगीत हवाय तेवढ्या भागावर तो इरसेर फिरवा , म्हणजे कृष्णधवल भाग निघून जाईल

हे final output

आहे कि नाही एकदम सोप्प
असो भेटूच पुढील भागात काहीतरी नवीन घेऊन Happy

गुलमोहर: 

आडो - असे होत नाही शक्यतो पण नाहीच सापडले तर सॅच्युरेशन लेव्हल शून्य करून पण ब्लॅक एँड व्हाईट करता येते. त्यात पाहिजे तर टिंट पण देता येते...फोटो जुना वाटावा अशी

प्रसन्न, आशु>>>>आडोला अनुमोदन
माझ्या इथेही ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटचा ऑप्शन दिसतच नाही. माझ्याकडे CS version आहे.

आशुचँप, अरे खरंच नाही दिसत मला सीएस २ मध्ये. अगदी बरोब्बर तोच ऑप्शन गायब आहे Uhoh

तू म्हणतोयस वर, तसंही करून बघते मी आता.

सॅच्युरेशन लेव्हल शून्य करून पण ब्लॅक एँड व्हाईट करता येते. त्यात पाहिजे तर टिंट पण देता येते..>>>>येस्स, हे होतंय. Happy

म्हणजे मलाच दिसत नाहीए Sad

थोडंफार का म्हणे. >>>>थोडंफार यासाठी कि त्याची किनार तेव्हढी शार्प नाही आली आहे.

हो माधव, फारच किचकट आहे ते काम. कालच्या दिवसात अधे-मधे तेच करत होते, त्यात लॅपटॉपचा माऊस मेला.

हा जो सांगितलेला ऑप्शन आहे त्यात जर Black & white असा ऑप्शन दिसत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे image मध्ये जाऊन तिथून रंग बदलणे... अगदी बरोबर काय ऑप्शन आहे ते बघून सांगतो.. हे करताना.. दोन पैकी जो लेयर निवडलेला असेल त्याचाच रंग बदलतो.

जिप्सी, अडो.. मस्तच दिसताहेत दोन्ही फोटो..

हा माझा प्रयत्न...माझ्या भाचीचा फोटो....
अर्थात...इरेजर टूल नाही वापरले...हिस्ट्री ब्रश वापरून केलाय

Pages