दोन कप फ्लॉवर, थोडे मटार (आवडीप्रमाणे) , दोन भोपळी मिरची, १ कप फ्रेंच बिन्स , १ कप गाजर, २ मोठ्या साईझ चे टोमेटो , २ कान्दे , ८ लसून पाकळ्या , ३ हिरव्या मिरच्या, ४-६ काश्मिरी मिरच्या ,१ टेबलस्पून किसलेला नारळ, १ टीस्पून धना पावडर, १/२ टीस्पून तीळ, १/४ टीस्पून राई , २/३ मेथी दाणे, ४ लवंगा, दालचिनी १ इंच , ३ वेलची सालांसकट , १/२ कप कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून खसखस, ३ तमाल पत्र
व्हेजिटेबल विथ एक्झोटिक ग्रेवी
भाज्या : दोन कप फ्लॉवर, थोडे मटार (आवडीप्रमाणे) , दोन भोपळी मिरची, १ कप फ्रेंच बिन्स , १ कप गाजर, चौकोनी कापून ५ मिनिटे पाण्यात उकळून चाळणीवर निथळत ठेवा
टोमेटो प्युरी : २ मोठ्या साईझ चे टोमेटो कुकर ला लावून दोन शिट्या काढणे, थंड झाल्यावर साले काढून मिक्सर मध्ये प्युरी करा.
एक्झोटिक ग्रेवी: एका भांड्यात खालील जिन्नस एकत्र करा
१ कांदा कापून, ८ लसून पाकळ्या , ३ हिरव्या मिरच्या, ४-६ काश्मिरी मिरच्या ,१ टेबलस्पून किसलेला नारळ, १ टीस्पून धना पावडर, १/२ टीस्पून तीळ, १/४ टीस्पून राई , २/३ मेथी दाणे, ४ लवंगा, दालचिनी १ इंच , ३ वेलची सालांसकट , १/२ कप कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून खसखस, २ तमाल पत्र
मासाल्याचे पदार्थ :
यावर १ कप उकळते पाणी टाकून अर्धा तास ठेवा. अर्ध्या तासानंतर मिक्सर वर फाईन पेस्ट करा.
3 टेबलस्पून तेल भांड्यात गरम करून त्यात तमाल पत्र आणि एक काश्मिरी मिरची कापून टाका. एक बारीक चिरलेला कांदा थोडा फ्राय झाल्यावर ग्रेवी टाकून तेल सुटे पर्यंत परता. नंतर टोमेटो प्युरी टाकून एकत्र झाल्यावर आधी शिजवून घेतलेल्या भाज्या टाका. चवीसाठी थोडी साखर टाका. भाज्या पूर्ण शिजत आल्यास आवडत असल्यास पनीर क्यूब टाकून परता . सर्वात शेवटी 1 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाका.
कोथिम्बिर घालुन सर्व करा.
Final Output:
वरील ग्रेवी च्या प्रमाणानुसार भाजी थोडी तिखट होऊ शकते. कमी तिखट हवी असल्यास मिरचीचे प्रमाण कमी करा.
ही ग्रेवी एकदा जमली कि त्यात तुम्ही वेगवेगळी वेरिएशन्स करू शकता.
वेरिएशन १: मशरूम्स, बेबी कोर्न्स आणि पनीर.
वेरिएशन २: मटार, पनीर
वेरिएशन ३: भाजी शिजल्यावर हवे असल्यास काजू पेस्ट पण घालू शकता. (पेस्ट साठी काजू भिजवायची गरज नाही , फ्रीज मधले काजू कोरडेच मिक्सर मध्ये वाटावे )
वेरिएशन ४: भाजी सर्व करताना वर बटर क्यूब ठेवा किंवा भाजी बटर मधेच बनवा
सर्वात महत्वाचे कि या भाजीचा सुगंध आणि चव रेस्तोरंट च्या भाजी प्रमाणे लागते, बनते हि झटपट. मी जेव्हा पहिल्यांदा ही भाजी ऑफिस मध्ये डब्यात घेऊन गेले तेव्हा सर्वाना वाटले कि मी खोटे सांगतेय कि भाजी घरी बनवली.
फोटोमधील भाजीत मी बेबी कोर्न्स आणि पनीर घातले आहे.
- आभारी आहे
सामी
नमस्कार मायबोलीकर.मायबोलीवर
नमस्कार मायबोलीकर.मायबोलीवर माझी ही पहिलीच रेसिपी आहे ... (टेस्टी मानून घ्या)
लिखाणात खूप चुका आहेत. Please ignore.
फोटो कुठे आहे... दिसतच नाही..
फोटो कुठे आहे... दिसतच नाही..
ग्रेव्ही करून बघितली पाहिजे
ग्रेव्ही करून बघितली पाहिजे
प्लीज फोटो टाका.
मासाल्याचे पदार्थ : Final
मासाल्याचे पदार्थ :
Final Output:
व्वा! छान वाटत्येय पाकृ
व्वा! छान वाटत्येय पाकृ
छान रंगीबेरंगी प्रकार दिसतोय
छान रंगीबेरंगी प्रकार दिसतोय हा !
या रविवारी करावी काय ?
दिनेशदा , मी तुमच्या रेसिपीज
दिनेशदा , मी तुमच्या रेसिपीज ची fan आहे (वाचल्या आहेत आणि शेअर पण केल्या आहेत.....करणार पण आहे ) मी novice आहे पण बघून वाचून आणि आई-सासुआई , बहिणी यांच्या कढून लिहून घेऊन खूप काही करायला लागले आहे.
व्वा! छान..........सही आहे
व्वा! छान..........सही आहे पाककृती!..
Thanks लाजो , shrushti14
Thanks लाजो , shrushti14
वा छान आहे की. पण मेहनत बरीच
वा छान आहे की. पण मेहनत बरीच दिसतेय.
अनघा_मीरा अग मेहनत नाही आहे
अनघा_मीरा अग मेहनत नाही आहे , झटपट होते ही भाजी. ग्रेवी पण लगेच होते.
मस्तच दिसतेय..
मस्तच दिसतेय..
या ग्रेवीत चीकन पण घालता येईल
या ग्रेवीत चीकन पण घालता येईल की... करुन बघायला पाहिजे.
आजच करुन बघते .......
आजच करुन बघते ....... मस्त!!!!!!!!
मस्त दिसतिये एक्झॉटिक
मस्त दिसतिये एक्झॉटिक ग्रेव्ही, करून बघितली पाहिजे.
Thanks आई', शांकली , मी_चिऊ,
Thanks आई', शांकली , मी_चिऊ, अनघा . अनघा सही अग चीकन घालून बघायला पहिजे....
सही वाटतेय.
सही वाटतेय.
मी ही ग्रेव्ही नेहमी करते.
मी ही ग्रेव्ही नेहमी करते. मश्रूम्स / सोया चंक्स / छोटे बटाटे / उकडलेली अंडी / पनीर / मिश्र कडधान्यं - असं बरंच काही आळीपाळीनं घालता येतं यात.
one of the best recipe in
one of the best recipe in masala comp. खुपच मस्त..नक्की करुन पाहणार..पहीला प्रयत्न खुपच चांगला आहे लिहायचा...फकत नाव थोड मराठी करता आल असत तर अजुन छान झाल असत...
आता एक प्रश्न
यावर १ कप उकळते पाणी टाकून अर्धा तास ठेवा. अर्ध्या तासानंतर मिक्सर वर फाईन पेस्ट करा. >>>>>>>अस का करायच ???? फ्लेवर अजुन वाढतात का ???
फ्लेवर अजुन वाढतात का ते
फ्लेवर अजुन वाढतात का ते माहित नाहि पण मसाले चान्गले soak होतात आणी वाटले जातात .....
मी आज ही भाजी केली ..खूपच
मी आज ही भाजी केली ..खूपच छान झाली..ग्रेवी मस्त झाली... सगळ्याना आवडली...खूप धन्यवाद