बटरनट स्नॅप कुकिज (किंवा खोबरं असलेल्या कुठल्याही कुकिज्/बिस्किट्स);
कुकिंग व्हाईट चॉकलेट;
फ्रेश क्रिम,
इस्टर एग्ज;
चॉकलेट स्प्रिंकल्स
इस्टर ट्रीट्स
येत्या रविवारी इस्टर आहे त्यामुळे सध्या आमच्याकडे अगदी इस्टरमय वातावरण आहे. दुकानं चॉकलेट एग्ज, हॉटक्रॉस बन्स, बनी चॉकलेट्स, इस्टर ग्रिटींग कार्ड्स, गिफ्ट्स इ इ ने भरुन वहातायत. मग लेकीला इस्टर ट्रीट्स न देऊन कसे चालेल?
मागच्या वर्षी लेकीच्या डेकर मधे देण्यासाठी "चॉकलेट नेस्ट अँड इस्टर एग्ज केक" केला होता. पण यंदा जास्त वेळ न मिळाल्यामुळे लेकीच्या प्रीस्कुलमधे द्यायला ही चॉकलेटची छोटी छोटी घरटी बनवली
क्रमवार पाककृती :
१. ऑव्हन १५०डिग्री से ला तापत ठेवा.
२. कुकिज पाकिटातुन काढुन ती पॅटी पॅन्स/उथळ मफिन पॅन्स/छोट्या वाट्यांमधे ठेवा.
३. पॅन ओव्हनमधे ठेवा आणि साधारण ३ ते ४ मिनीटात (कुकिज किती जाड आहेत त्यावर अवलंबुन), बोटाला जरा नरम लागल्या की बाहेर काढा.
४. कुकिज गरम असतानाच छोट्या डावेने/गोल चमच्याने हलके दाबुन त्यांना खोलगट वाटीचा शेप द्या.
५. आता या वाट्या गार व्हायला जाळीवर्/तातलीत काढुन ठेवा.
६. मावे सेफ काचेच्या बोल मधे कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि थोडे क्रिम घ्या आणि ४०-४५ सेकंद मावेमधे गरम करा.
७. बोल बाहेर काढुन चॉकलेट आणि क्रिम नीट एकत्र करा.
८. हे मिश्रण आता चमच्याने आपल्या कुकिवाट्यांमधे भरा. चॉकलेट जरा सेट होऊ द्यात.
९. या तयार चॉककुकिवाट्यांमधे आता १-१ चॉकलेट एग ठेवा. बाजुने हवे तर चॉकलेट स्प्रिंकल्स पसरा.
१०. तयार आहेत छोटी छोटी चॉकलेट घरटी - इस्टर ट्रीट्स
१. कुकिज / बिस्किटं घेताना त्यात खोबरे आहे का ते बघा. खोबर्यामुळे बिस्किट गरम करतच पटकन मऊ होते आणि गार झाल्यावर चामट न होता खुसखुशीतच रहाते. मी वापरलेल्या बटरनट स्नॅप कुकीज मधे ओट्स पण आहेत.
२. कुकीवाट्यांमधे चॉकलेट आयत्यावेळेस भरा. नाहीतर त्या नरम पडतिल. पण नरम देखिल चाम्गल्याच लागतात
३. आमच्याकडच्या एका पाकिटात २१ कुकिज होत्या. मी एकुण ३० घरटी केली. त्यासाठी मला २५०ग्रॅम कुकिंग व्हाईट चॉकलेट आणि ५० मिली क्रिम लागले.
४. या कुकिज मिट्ट गोड होतात त्यामुळे मुलांना एका वेळेस एकच द्या. तुम्ही खा हव्या तेव्हढ्या
५. मी अश्या बिस्किटवाट्या करुन त्यात वॅनिला आयस्र्किम आणि वरुन कॅरॅमल / चॉकलेट सॉस घालुन मस्त झटपट डेझर्ट करते हवे त्याला वरुन टोस्टेड नट्स / स्प्रिंकल्स घालते.
देवा!! मी तुला कधी सांगितले
देवा!!
मी तुला कधी सांगितले आहे का? यु टोटली रॉक! हे असं इतकं भारी कसं जमतं कोणास ठाऊक!
लाजो पटकन उचलून तोंडात
लाजो पटकन उचलून तोंडात टाकावसं वाटतय मला
लेक आणि तिच्या मैत्रिणींची मज्जा आहे एकदम 
जबरदस्त कल्पनाशक्ती, लाजो.
जबरदस्त कल्पनाशक्ती, लाजो. अप्रतिम.>>>खरंच
पुन्हा एकदा __/\__
पुन्हा एकदा __/\__
लाजोजी आप महान हो!!
लाजोजी आप महान हो!!
काय डोकेबाज आहेस ग तू ! छान
काय डोकेबाज आहेस ग तू ! छान पाकृ अन टीपान्मधली बिस्कीट वाट्यात आईसक्रि म भरायची कल्पना सुध्दा ग्रेटच आहे..
बरीच मेहनत अन कलाकुसर असते तुझ्या पाकृ. मध्ये__________/\_________
जो.....कस्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल
जो.....कस्स्स्स्स्स्स्स्ल्ल्ल्या टेम्प्टींग रेसीपीज करतेस गंssssss
एकदम तोंपासु आणि तितकंच सुंदर प्रेझेंटेशन ही
कृ. शि. सा. न. अफाट!!!
कृ. शि. सा. न.
अफाट!!!
अशक्य भारी आहेस तु!
अशक्य भारी आहेस तु!
अप्रतीम
अप्रतीम
खुप खुप आभार्स सगळ्यांचे
खुप खुप आभार्स सगळ्यांचे
लेकीच्या मित्र-मैत्रिणींना तर आवडलीच ही घरटी पण तिच्या टिचर्सनी देखिल आवर्जुन सांगितले की त्यांना देखिल आवडली म्हणून
साष्टांग ___/\___ इथे रोजचा
साष्टांग ___/\___
लाजो तुस्सी ग्रेट हो.
इथे रोजचा स्वयंपाक करताना मारामार
प्रचंड क्रियेटिव्ह आहेस तू
प्रचंड क्रियेटिव्ह आहेस तू लाजो! मस्त!
लाजो.. मस्तच.. खाण्यासाठी
लाजो.. मस्तच.. खाण्यासाठी यावे लागेल
प्रचंड क्रियेटिव्ह आहेस तू लाजो! मस्त>> +१
किती क्युट! हे खायची इच्छा
किती क्युट! हे खायची इच्छा नाही होणार मला (तसंही मला देतंय कोण?)
प्रचंड क्रियेटिव्ह आहेस तू
प्रचंड क्रियेटिव्ह आहेस तू लाजो!>> +१ _/\_ स्वीकारावा
मी हे नक्की करणार. पण ते
मी हे नक्की करणार. पण ते आइसक्रीम ची आयडिया वापरून. तू खरच अशक्य आहेस.
आपण नाय बा इतकी आटाआटी
आपण नाय बा इतकी आटाआटी करणार... आयतं मिळेल तर छान... लाजो... ़खरचं छान दिसताहेत नेस्ट्स!!! --/\--
ठांकु, ठांकु लोक्स
ठांकु, ठांकु लोक्स
ग्रेटच! कसली क्युट घरटि आहेत
ग्रेटच! कसली क्युट घरटि आहेत ही!
मस्त्च आहेत नेस्ट्स्....क्या
मस्त्च आहेत नेस्ट्स्....क्या बात है...तुम्ही खुपच क्रियेटिव्ह आहात....
लै भारी....
लै भारी....
Pages