सुट्टीत या....

Submitted by स्मिता द on 9 April, 2009 - 00:16

सुट्टीत या....

सुट्टीत या..
चांदोमामाच्या गावाला मला जायच आहे
चांदण्यांशी झिम्मा खेळायचा आहे
सोनेरी कडांच्या ढगावर नाचायच आहे
छान छान आकाराचे ढग दिसतात कसे
सावरी सारखे मऊ मऊ लागतात कसे
गावाला त्यांच्या पण मला जायचं आहे
पावसात दळतं कोण
ते बघायचं आहे
कोण रडत आकाशात
म्हणुन पाउस येतो
रडता रडता हसतं कोण
म्हणुन गडगडाट होतो
आज्जी आजोबा आहेत कसे
मामी आहे कशी?
सगळ सगळ बघायला
मला जायचं आहे
सुट्टीत या..
चांदोमामाच्या गावाला मला जायच आहे

गुलमोहर: 

छान! छान!

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

शरददा, उमेश..:)