"मस्सालामामा की पोटली..."

Submitted by लाजो on 3 April, 2012 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चतुर मस्सालारामा...

ऐका महाराजा आमची कहाणी, खवैय्या नगरीची राजा अन राणी
राजाच नाव 'जामुन सुलतान', राणी त्याची 'बेगम पकवान'

राजा राणी खाण्याचे शौकिन, गोड असो वा असो नमकिन
महालात त्यांच्या १०० आचारी, सदैव तत्पर बनवाया न्याहारी....

पण एक दिवस बेगम रुसली, काहितरी नवे हवे म्हणाली
असे जे नसे भाजले चुलीवर, शिजले जे न वापरता कुकर

पौष्टिक हवे राखी जे फिगर, मात्र चवीला हवे एक नंबर
पिटा दवंडी सार्‍या भुमीवर, हवे मला ते देइल कोणी जर

आले बल्लव देशोदेशीचे, आणले पदार्थ नव्या चवीचे
पण बेगमला काहीच रुचेना, सुलतानाला ही मग काही सुचेना

आणि एक दिवस मस्सालामामा आला, त्याने बंद पोटलीत खाऊ आणला
ओळखा पाहु काय आहे यात, बेगमसाहेबा म्हणे है क्या बात???

Happy

-------------------------------------

लागणारे जिन्नस:

- मसाला ग्रेव्हीसाठी -
२ कांदे,
आल्याचा छोटा तुकडा.
२-४ लसूण पाकळ्या,
टॉमेटो पेस्ट,
किचनकिंग / गरम मसाला
हळद,
लाल तिखट,
मिठ चवीप्रमाणे

- अर्धा किलो चिकन / मटण;

- भाज्या - कॅप्सिकम, ब्रोकोली, बीन्स, बटाटे इ पैकी जे उपलब्ध असेल ते.

chic1.JPG

क्रमवार पाककृती: 

तर मंडळी, तुम्हीतर सगळे महा चतुर लोक्स आहात... ओळखा बर या पोतडीत काय दडलय???

क्लु हवाय??? वर दिलाय की... 'ना चुलीवर भाजले...ना कुकरात शिजले...पौष्टिक आहे आणि चव एक नंबर'

IMG_1538.JPG

---------------------------------

क्रमवार पाककृती:

मसाला ग्रेव्ही :

१. कांदा + आले + लसूण + थोडे मिठ कच्चेच मिक्सरवर वाटुन घ्यावे;
२. किचनकिंग मसाला + हळद + तिखट थोड्या पाण्यात कालवुन पेस्ट करावी;
३. मावेसेफ बोलमधे १ चमचा तेल घेऊन १ मिनीट्/गरम होईतो मावे मधे ठेवावे;
४. गरम तेलात मसाला पेस्ट घालावी व जरा मिक्स करावे. आता परत मिनीटभर मावेमधे ठेवावे. बोलवर झाकण/किचन पेपर ठेवायला विसरु नका.
५. आता या मसाल्यात टोमेटो पेस्ट घालुन परत एखाद मिनीट गरम करावे आणि मग कांद्याचे वाटण घालुन ग्रेव्ही मावेमधे शिजवुन घ्यावी. ग्रेव्ही थोडी घट्टच असावी.

पोटली:

ओव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.

६. चिकन ब्रेस्ट स्वच्छ करुन त्याचे मोठे तुकडे करुन घ्यावेत.
७. तयार ग्रेव्ही चिकनला लावुन २० एक मिनीटे मॅरिनेट करावे.

chic2.JPG

८. सिल्व्हर फॉईलचा मोठा तुकडा ट्रेमधे पसरावा. त्यावर बेकिंग पेपरचा तुकडा पसरावा.
९. या बेकिंगपेपरवर मॅरिनेट केलेल्या चिकनपैकी ६-७ पिसेस (१ सर्व्ह) ठेवावेत. त्यावर हव्या त्या भाज्यांचे तुकडे ठेवावेत.

chic3.JPG

१०. आता समोरासमोरच्या बाजु जवळ आणुन त्याची पोटली बनवावी. पोटली सगळीकडुन घट्ट बंद (सिल) झाली पाहिजे.

chic4.JPG

११. ही पोटली आता ट्रेमधे ठेऊन ट्रे गरम ओव्हनमधे ठेवावा.
१२. साधारण २० मिनीटांनी (चिकनच्या तुकड्यांच्या साईजवर अवलंबुन) पोटली बाहेर काढावी.
१३. एखाद मिनीट थांबुन मग चिमट्याने हलकेच उघडावी.

chic5.JPG

१४. चिकन शिजले आहे की नाही हे चेक करुन (अन्यथा पोटली परत ओव्हनमधे ठेवावी) मग गरमागरम भाताबरोबर / पराठ्यांबरोबर खावे.

chic6.JPG

वाढणी/प्रमाण: 
३-४ सर्व्हज
अधिक टिपा: 

१. आपल्या आवडीची कुठलिही ग्रेव्ही वापरु शकता. मावे नसेल तर नेहमीसारखी गॅसवर ग्रेव्ही बनवु शकता.
२. या पद्धतीत कमीतकमी तेल लागते आणि चिकन वाफेवर अगदी सॉफ्ट शिजते. शिवाय पाणी न घालता ग्रेव्ही देखिल बनते.
३. चिकन ऐवजी फक्त भाज्या + पनीर, मटण, लँब, फिश फिले अश्या पद्धतीने बनवु शकता.

माहितीचा स्रोत: 
पोटली आयडिया टीव्ही प्रोग्रॅम + माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे! लाजोजी .........क्वाय चाल्लंय क्वाय? गाडी सुटलीये फाष्टात!
डिनर टायमाची वाट बघते बर्का!

'मस्साल्याचा टच' या स्पर्धेच्या प्रवेशिकेमध्ये तपशीलवार पाककृती अपेक्षित आहे, कोडे नाही. Happy

माप्रा... जरा धीर धरा की.....संपूर्ण तपशिलवार पाकृ येतेच आहे Happy

ही तर एक झलक... जाहिरात म्हणा हवं तर Happy

मस्त आहे रेसिपी Proud सवयीने लिहीले Wink

मी सकाळपासुन आठवतेय.. कुठेतरी कुठल्यातरी रेसिपीच्या हिस्टरीमधे हे राणीसाठी केलेले आणी हिट झालेले असे वाचलेय.. पण डोस्क्याचा भुगा झाला तरी आठवेना.

पहाते संध्याकाळ पर्यंत वाट आता Happy

कविता आवडली Happy

>>>'ना चुलीवर भाजले...ना कुकरात शि>>><<

मग अवन मध्ये भाजले असेच ना.<<< केक तर नाही ना Wink Proud

Pages