Submitted by मुरारी on 2 April, 2012 - 05:17
मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता,
आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू
आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे )
पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय..
करता येईल का?
हो येईल कि .. अगदी सोप्प आहे
हा माझा कार चा फोटो
त्याला फोटोशोप मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे एक लेयर
नंतर टूलबार मध्ये --- filter -- blur -- motion blur
angel -३३
distance ७७
ओके .. आता हे असं दिसेल
चला काम झालेलं आहे ...
आता आपला लाडका खोडरबर
आपल्याला कार ला कॅमेरात पकडलय असं दाखवायचय.. ठीके.. हवा त्या भागावरून रबर फिरवा
किंवा कार सोडून बाकी दृशावरून रबर फिरवून असाही उलटा इफेक्ट देता येईल
final output
गुलमोहर:
शेअर करा
हे पण मस्तच ! मी अजून फोटोशॉप
हे पण मस्तच !
मी अजून फोटोशॉप वापरलेले नाही. म्हणून एक बाळबोध शंका.
अगदी तंतोतंत कड संभाळत, खोडरब्बर कसा वापरायचा ?
सहीए
सहीए
भारी. प्रयत्न करुन पाहिन.
भारी. प्रयत्न करुन पाहिन.
हा भाग पण भारी. दिनेशचीच शंका
हा भाग पण भारी. दिनेशचीच शंका मला पण
विशेष काही कठीण नाही
विशेष काही कठीण नाही हो...
आणि चुकलंच तर CTRL + Z आहेच कि
उलट्या इफेक्ट मध्ये गाडी
उलट्या इफेक्ट मध्ये गाडी आपल्यापासून लांब जाणारी असल्यास परिणाम जास्त चांगला येईल..
ह्या फोटो साठी पहिलाच फायनल आउट पुट योग्य वाटतोय.
बहुतेक खोडरबरच्या गोलाचा
बहुतेक खोडरबरच्या गोलाचा व्यास कमी जास्त करता येतो.. आधी मोठा गोल वापरुन मधला मुख्य भाग करायचा.. मग कडेचे काम करताना लहान गोल वापरायचा... असे आहे का ?
ह्या फोटो साठी पहिलाच फायनल
ह्या फोटो साठी पहिलाच फायनल आउट पुट योग्य वाटतोय. >> SLR कॅमेरा साधारणपणे स्लो शटरस्पीडवर दुसर्या सारखेच आउटपुट देइल. पहिले आउटपुट मिळवण्याकरता पॅनिंग करावे लागेल - जे तितकेसे सोपे नाहीये. म्हणजे तंत्र कळायला अगदी सोपे आहे पण वापरायला नाही. त्यामुळे दोन्ही आउटपुट योग्य आहेत.
पण पर्सनली मला पण पहिलेच आउटपुट आवडले
छान तंत्र!
छान तंत्र!
मस्त!!! खुप उपयोगी आहे हे.
मस्त!!!
खुप उपयोगी आहे हे.
प्रसन्न अ, परत एकदा
प्रसन्न अ, परत एकदा धन्यवाद.
करून बघितलं. जमलं.
पण तो खोडरबर वापरणं हे खूप स्कीलचं काम आहे एकंदरीत.
(No subject)
अरे वा! छानच!
अरे वा! छानच!
वॉव.. सही रे प्रसन्ना.. मला
वॉव.. सही रे प्रसन्ना.. मला असेच काहीतरी पाहिजे होते.. पण फोटोशॉपच नाहीये जवळ.. शोधायला हवे आता.. असल्या इफेक्टसाठी वा ब्लॅक अँड कलर इफेक्टसाठी तरी वापरायला नक्कीच आवडेल.. थँक्स.. अजुन येउदे.
हे पण सहीच आता फोटोशॉप
हे पण सहीच आता फोटोशॉप मिळवलच पाहीजे
प्रसन्न, फारच उपयोगी
प्रसन्न,
फारच उपयोगी आहे.
शनिवारिच Photoshop Elements 10 install केले आहे. आणि आज हा धागा मिळला.
मला Portraits आणि Collage करायची आहेत. त्या साठी कही Tutorials असतिल तर सांगा.
अनेक धन्यवाद.
मस्तच, भारीये एकदम
मस्तच, भारीये एकदम