मधालय !

Submitted by प्रकाश काळेल on 1 April, 2012 - 14:02

कूर्ग मधासाठी एवढे का प्रसिध्द आहे, माहीत आहे ? Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान फोटो.
मी मध चाखलाय कुर्गचा.
त्यांचे खास तांदुळ, त्यांचीच वेलची आणि खोबरे यांचा एक सांदणासारखा प्रकार करतात आणि त्यावर
मध घालून खातात. मस्त लागतो तो.

प्रकाश, फारच सुंदर.
<< ते फोटो मधलं निळं हिरवं बघून मला वाटलं कुठे तरी परदेशात असेल... >> कूर्गने भारताला खूप लढवय्ये [ जन.करिअप्पा, जन.थिमय्या इ.], प्रशासक, हॉकी खेळाडू [ गणेश, अपैय्या, उथैय्या, सोमय्या इ.इ.] दिले आहेत. सोमय्याचे [ जो भारतीय संघाचा कर्णधार होता] वडील मला ज्येष्ठ असूनही खूप जवळचे मित्र होते व मुंबईत त्यांचा पाहुणचार घेण्याचा व 'फॅमिली आल्बम' पहायचा योग मला लाभला. कूर्गचा निसर्गच नाही तर त्यांची संस्कृतिही कुठल्यातरी परदेशातील वाटावी इतपत वेगळी व छान आहे ![ हवामान हें मुख्य कारण असावं].
[खूप इच्छा असूनही माझं कूर्गला जाणं मात्र अजूनही झालं नाही, हें खूप खटकतं. ]

कसला सुंदर फोटो आहे! इतकी पोळी एका झाडावर कधीच नव्हती बघितली.

कूर्गी कॉफी प्रसिध्द असल्याचं बघितलंय, मधाचं नव्हतं माहीती.

सुंदर कलर्स.
फक्त एकच गोष्ट थोडीशीच खटकत आहे. तो रस्ता. त्याच्या लिडिंग लाईन्स भलतीकडे घेऊन जात आहेत. (खालून वर बघितले तर) ४/५ क्रॉप केले तर वेगळे डायमेंशन येईल का?

झाडाची खालची बाजू घेऊन नुस्ता रस्ता -लाईन्स सहित पण मस्त कॉम्पोझिशन होईल. काढले आहेस का?

बापरे !! एकाच झाडावर किती ती दाटीवाटीने

तुळजापुर च्या मंदिराच्या आवारातल्या झाडावर पुर्वी हा प्रकार होता. झाडाची छाटणी केल्यानंतर आता संख्या कमी झाली आहे.

बापरे! त्या झाडाखालुन जाताना भिती वाटत नसेल का मधमाश्या चावण्याची? कारण त्यांचं चावणं मी अनुभवलय Happy आजुबाजुचा परिसर खरच छान फिल देतोय.

मस्तच.

प्रकाश, कूर्गबद्दल राहण्याची ठिकाणे अथवा इतर फिरण्याच्या सोयी बद्दल जरा माहिती दे ना. आम्ही एप्रिल एंडला अथवा मेच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसाकरता जाणार आहोत.

मस्त!!!
कॉम्पोझिशन मधे मागचे; उजव्या हातचे झाड पण पकडायचा प्रयत्न केला आहेस का? त्या झाडावर पण पोळी आसावित असे वाटते.

अगदी नाविन्य पुर्ण प्र.ची. मस्त ! याआधी एवढी पोळी नव्हती पाहिली एकाच झाडाला. प्रकाश जी फर्म्माइश >>
सविस्तर लिहा कुर्ग बद्दल Happy अन प्र.ची. आजून हवेत Happy

Pages