बोगोर बुदुर .. भाग १२

Submitted by अविनाश जोशी on 30 March, 2012 - 12:30

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १ http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २ http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३ http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4 http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर भाग ५ http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६ http://www.maayboli.com/node/33730
बोगोर बुदुर भाग 7 http://www.maayboli.com/node/33764
बोगोर बुदुर भाग 8 http://www.maayboli.com/node/33765
बोगोर बुदुर भाग 9 http://www.maayboli.com/node/33778
बोगोर बुदुर भाग १० http://www.maayboli.com/node/33788
बोगोर बुदुर भाग ११ http://www.maayboli.com/node/33842

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे,
कथा “सवत माझी लाडकी” http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास http://www.maayboli.com/node/33369

--२९--

समीरच्या घरी दोघेही असंख्य विषयांवर गप्पा मारत बसले.
संध्याकाळी राणे आले ते वैतागुनच.

" काय राणे ? आम्हाला दिवसभर बसायला लावले ?"

" साल्यांनो! तुम्ही मुडद्यांचे ढीग उभे करा. आम्ही घाम गाळत बसतो. आणी तुम्ही येथे एसीत बीयर ढोसत बसा. "

" राणॆ!! तुम्हाला बीयर हवी असली तर तसे सांगा "

" ते जाउदेत.”

“बघा ! मिळतीय तर घ्या”

“ समीर तुम्ही जरा मला काय झाले ते सांगाल का?"

"सांगण्यासारखे तसे काही नाही.”

“मग तुम्ही दोघे काय तारीशी पत्ते खेळायला गेला होता?

“तो सुटला तेंव्हा त्याच्याशी बोलावे म्हणुन आम्ही दोघे त्याच्या घरी गेलो होतो.”

“मग”

“तेथे तो बेशुद्धावस्थेतच सापडला. त्याला आम्ही तातडीने दवाखान्यात नेले आणी तुम्हालाही फोन केला. "

"एवढेच!"

" हो अजुन म्हणजे रात्री कुणीतरी पोरगी आली होती असे शेजारचे म्हणत होते.”

“मेरी का?”

“नाही. त्यांच्या भाषेत फारच छमकछल्लु होती "

" डोक्याला तापच आहे झाल!. "

" का काय झाल "

" एकतर हा मृत्यु नैसर्गिक नाही”

“पण आम्ही गेलो तेंव्हा तारी शुद्धीत होत. कुणी मारले असते तर त्याने निश्चीतच काही ईशारा केला असता”

“अरे !. विषप्रयोग झाला आहे.”

“कसले”

“कुठले विष अजुन कळले नाही. त्याच्या रुममधील सर्व खाण्याच्या वस्तु, पिण्याच्या वस्तु प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत"

" पण तुमच्याकडे केस कशी ?"

"शहाशी संबधीत आहे म्हणुन. पण त्याचाच अजुन पत्ता लागत नाही तर हे नव लचांड "

" या खुनांचा संबंध निश्चीतच जशची आहे.”

“कशावरुन”

“शहाचा खुन का झाला आपल्याला माहीत नाही. त्याचा आरोप तारीवर होता पण त्यातुन तो निर्दोष सुटला”

“त्याने खुन केला नाही हे तर माझे पहील्यापासुनच मत होते “

“हो पण तारीला असे काहीतरी त्या दिवशी दिसले असणार. पण दुर्देवाने त्याचा अर्थ त्याला लावता आला नाही”

“हो पण त्याकरता त्याचा खुन होइल ?”

“ राणे माझ्यापेक्षा तुम्ही क्राइम जास्त पाहीला आहेत.”

“बर तुझ्या काही कल्पना?”

“ तुम्ही त्या गणपतीची काही चॊकशी केलीत का ?"

" इतकी भुते पाठीमागे लागल्यावर देवासाठी इथे वेळ कुणाला आहे?"

" पण राणे माझी मनोदेवता सांगत आहे, की तो गणपतीच आपल्याला शेवटी रस्ता दाखवेल. "

--३०--

नंतरचे आठ दहा दिवस तसे आळसातच गेले.

एका सकाळीच राणेंचा फोन आला.

“अरे फोरेन्सिक ने तारीचा मृत्यु विषप्रयोगाने झाल्याचेच सांगीतले”

“त्याला फोरेन्सिक कशाला पाहीजे? कुठले विष होते”

“विष तसे रेअरच होते.”

“कुठले”

“पहील्यांदाच ऐकले. सिक्युटॉक्झीन प्रकारातले होते”

“कशात होते? दारुत ?”

“दारुत तरी त्या विषाचा अंश नव्हता,”

“मग”

“पण त्याच्याकडे खायला असलेल्या गाजरात मात्र त्याचा प्रचंड अंश होता.”

“काय सांगताय ? “

“गाजरात हे विष कसे आले हे मात्र कुणी सांगु शकत नव्हते. कारण काही गाजराच्या तुकड्यात ते अजीबात नव्हते तर काही तुकडे थबथबले होते.”

“त्यात काय ईंजेक्ट केले असेल”

“बाहेरुन कुठल्याही प्रकारे असे विष गाजरात घालणे अशक्यच होते.”

“कॊम्लीकेशन्स जास्तच वाढत आहेत.”

“ फोरेन्सिकच्या माहीती प्रमाणे पोटात गेल्यावर फार फार तर एखादा तास माणुस जगतो”

“एकतर त्याने गाजरे घेतली तेथुन तरी विष आले किंवा त्या छ्मकछ्ल्लुने तरी आणुन दिले”

“ बरे शहाच्या खुनाबद्दल काही नवे जुने ?”

“काही नाही”

“अरे आता तुला म्हणुन सांगतो. कुणाल, सोनल, याकुब, माखानी सर्वांच्या पाठीमागे आमचे खबरे आहेत, पण गेल्या कित्येक दिवसात घर /ऑफीस अशाच ह्यांच्या फेर्या चालु आहेत”

“ कुणाल / सोनल च्या पण “

“हो ना.. फार फारतर दोघे कुठल्यातरी हॉटेलात गप्पा मारत बसतात”

“ माझ्या मागचा खबर्या काय म्हणतो”

“समीर आमच्याकडे वाया घालवायला माणस नाहीत. “

“ राणे तुम्ही गणपतीचे काय केलेत?”

“अरे काय तु माजे डोके उठवले आहेस?”

“राणे ! गणपतीबाप्पा तुम्हाला सद्बुद्धी देवो”

“हम्म..”

राणेंचा फोन होताच समीरने कांचनला फोन केला.

“काय खबरबात?”

“अरे येत्या १२ ता. ला पत्रकार परिषद बोलावली आहे साहेबांनी . बडी बडी धेंडे बोलावली आहेत. सी एम , होम सगळ्यांनाच बोलावले आहे. ते कुणी येणार नाहीत, पण प्रोटोकॉल असतो ना?”

“कांचन एक काम कर”

“बोला”

“तु म्हणाला होतास ना या गणपती करता इंटरपोलची नोटीस आहे”

“हो”

“मग जरा राणॆ, DCP क्राइम ना फोन करुन बातमी दे. पुढे मागे उपयोग होइल”

“तुझ काहीतरी लफड दिसतय”

“छे छे उलट माझे नाव पण कुठे घेउ नकोस”

“अवघड आहे. कारण माझ्या बॉसचा इगो दुखावला जाइल”

“मग त्याला फोन करायला सांग”

“तो एक नंबरचा भित्रा आहे”

“मग”

“तु राणेंनाच बॉसना फोन करायला सांग. बॉस शेवटी मलाच बोलायला लावेल”

“अरे वा! समीरचा मित्र शोभतोस तर”

गुलमोहर: 

छान